< איוב 36 >
१अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला,
כתר-לי זעיר ואחוך כי עוד לאלוה מלים | 2 |
२“तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे कारण मला देवाच्या बाजूने आणखी बोलायचे आहे.
אשא דעי למרחוק ולפעלי אתן-צדק | 3 |
३मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.
כי-אמנם לא-שקר מלי תמים דעות עמך | 4 |
४खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत, कोणीतरी ज्ञानाने समजूतदार असा तुम्हाबरोबर आहे.
הן-אל כביר ולא ימאס כביר כח לב | 5 |
५देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.
לא-יחיה רשע ומשפט עניים יתן | 6 |
६तो दुष्टांना वाचवीत नाही, तर तो त्याऐवजी जे दुःखात आहेत त्यांच्यासाठी चांगले ते करतो.
לא-יגרע מצדיק עיניו ואת-מלכים לכסא וישיבם לנצח ויגבהו | 7 |
७जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांस राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो.
ואם-אסורים בזקים ילכדון בחבלי-עני | 8 |
८जर, साखळदंडानी ठेवले, जर त्यांना त्रासाच्या दोऱ्यांनी बांधून ठेवले
ויגד להם פעלם ופשעיהם כי יתגברו | 9 |
९आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.
ויגל אזנם למוסר ויאמר כי-ישובון מאון | 10 |
१०तो त्यांचे कान त्याच्या सूचना ऐकण्यास उघडतो, तो त्यांना अन्यायापासून मागे वळवतो.
אם-ישמעו ויעבדו יכלו ימיהם בטוב ושניהם בנעימים | 11 |
११जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील, तर ते त्यांचे दिवस सुखाने घालतील.
ואם-לא ישמעו בשלח יעברו ויגועו בבלי-דעת | 12 |
१२परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील, त्यांना ज्ञान न होता मरण येईल.
וחנפי-לב ישימו אף לא ישועו כי אסרם | 13 |
१३जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना बांधले तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.
תמת בנער נפשם וחיתם בקדשים | 14 |
१४ते अगदी तरुणपणी मरतील, त्यांचे जीवन कंलकीत होऊन संपेल.
יחלץ עני בעניו ויגל בלחץ אזנם | 15 |
१५परंतु देव दु: खी लोकांस त्यांच्या दु: खातून सोडवील विपत्तीच्या द्वारे कानउघडणी करतो.
ואף הסיתך מפי-צר-- רחב לא-מוצק תחתיה ונחת שלחנך מלא דשן | 16 |
१६खरोखर, त्यास तुला दुःखातून काढायला आवडते व अडचण नसलेल्या मोकळ्या जागी नेतो, आणि तुझ्या जेवणाच्या टेबलावर भरपूर पौष्टीक अन्न ठेवले असते.
ודין-רשע מלאת דין ומשפט יתמכו | 17 |
१७परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, दोषारोप व न्याय तुलाच धरतात.
כי-חמה פן-יסיתך בספק ורב-כפר אל-יטך | 18 |
१८तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. लाच तुला न पकडो आणि न्यायापासून दूर घेवून जावो.
היערך שועך לא בצר וכל מאמצי-כח | 19 |
१९आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस किंवा तुझ्या सर्व सामर्थ्याचा तुला काही उपयोग होईल काय?
אל-תשאף הלילה-- לעלות עמים תחתם | 20 |
२०दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस, लोक रात्री पसार होण्याची वेळ प्रयत्न करतात.
השמר אל-תפן אל-און כי-על-זה בחרת מעני | 21 |
२१काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस. कारण तुझी त्रासातून परीक्षा झाली आहे, म्हणून तू पापापासुन दूर रहा.
הן-אל ישגיב בכחו מי כמהו מורה | 22 |
२२पाहा, देव त्याच्या सामर्थ्याने सर्वोच्च आहे. त्याच्या समान कोण शिक्षक आहे?
מי-פקד עליו דרכו ומי-אמר פעלת עולה | 23 |
२३त्याच्या मार्गाबद्दल त्यास कोण सुचीत करील? ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कोणी त्यास म्हणू शकत नाही.
זכר כי-תשגיא פעלו-- אשר שררו אנשים | 24 |
२४त्याने जे काही केले त्याबद्दल लोकांनी त्याच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.
כל-אדם חזו-בו אנוש יביט מרחוק | 25 |
२५त्याने कार्य केले ते प्रत्येक मनुष्याला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांसही देवाचे महान कार्य दिसतात.
הן-אל שגיא ולא נדע מספר שניו ולא-חקר | 26 |
२६होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आम्ही त्याच्या वर्षाची संख्या पाहाणे अशक्य आहे.
כי יגרע נטפי-מים יזקו מטר לאדו | 27 |
२७तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यामध्ये रुपांतर करतो.
אשר-יזלו שחקים ירעפו עלי אדם רב | 28 |
२८अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.
אף אם-יבין מפרשי-עב תשאות סכתו | 29 |
२९खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो?
הן-פרש עליו אורו ושרשי הים כסה | 30 |
३०बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यामध्ये येतो.
כי-בם ידין עמים יתן-אכל למכביר | 31 |
३१तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.
על-כפים כסה-אור ויצו עליה במפגיע | 32 |
३२तो आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्यास हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.
יגיד עליו רעו מקנה אף על-עולה | 33 |
३३मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.”