< יחזקאל 46 >
כה אמר אדני יהוה שער החצר הפנימית הפנה קדים יהיה סגור ששת ימי המעשה וביום השבת יפתח וביום החדש יפתח | 1 |
१प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसात बंद असेल. पण शब्बाथ व चंद्रदर्शन या दिवशी ते उघडले जाईल.
ובא הנשיא דרך אולם השער מחוץ ועמד על מזוזת השער ועשו הכהנים את עולתו ואת שלמיו והשתחוה על מפתן השער ויצא והשער לא יסגר עד הערב | 2 |
२अधिपती, त्या द्वाराच्या द्वारमंडपाच्या वाटेने बाहेरून आत येईल आणि तो द्वाराच्या खांबाजवळ उभा राहील तेव्हा याजक त्याचे होमार्मण व शांत्यर्पण करील. मग त्याने दाराच्या उंबरठ्यावरून परमेश्वरास दंडवत घालून बाहेर जावे. पण द्वार संध्याकाळपर्यंत बंद केले जाणार नाही.
והשתחוו עם הארץ פתח השער ההוא בשבתות ובחדשים--לפני יהוה | 3 |
३देशातील लोकांनी शब्बाथ व नवचंद्रदिनी या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करावी.
והעלה אשר יקרב הנשיא ליהוה ביום השבת ששה כבשים תמימם--ואיל תמים | 4 |
४शब्बाथ दिवशी अधिपतीने परमेश्वरास जे अर्पण करायचे ते सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा यांचे होमार्पण असे करावे.
ומנחה איפה לאיל ולכבשים מנחה מתת ידו ושמן הין לאיפה | 5 |
५त्याने मेंढ्यासाठी एक एफा अन्नार्पण करावे व कोकरांसाठी जसे त्यांची देण्याची इच्छा आहे तसे त्यांनी अन्नार्पण द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे.
וביום החדש פר בן בקר תמימם וששת כבשים ואיל תמימם יהיו | 6 |
६नवचंद्रदिनी त्याने एक निर्दोष गोऱ्हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा अर्पण करावा.
ואיפה לפר ואיפה לאיל יעשה מנחה ולכבשים כאשר תשיג ידו ושמן הין לאיפה | 7 |
७त्याने बैलासाठी व मेंढ्यासाठी प्रत्येकी एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे. एका कोकरांसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे.
ובבוא הנשיא--דרך אולם השער יבוא ובדרכו יצא | 8 |
८जेव्हा अधिपती दरवाजा व देवडीच्या मार्गाने आत प्रवेश करील तेव्हा त्याने त्याच मार्गाने बाहेर जावे.
ובבוא עם הארץ לפני יהוה במועדים הבא דרך שער צפון להשתחות יצא דרך שער נגב והבא דרך שער נגב יצא דרך שער צפונה לא ישוב דרך השער אשר בא בו--כי נכחו יצאו (יצא) | 9 |
९पण देशातले लोक नेमलेल्या सणांच्या दिवसात परमेश्वरासमोर येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. तर सरळ पुढे बाहेर जावे.
והנשיא--בתוכם בבואם יבוא ובצאתם יצאו | 10 |
१०आणि ते प्रवेश करीत असता अधिपती त्यांच्यामध्ये आत जाईल ते बाहेर जात असता त्याने त्यांच्याबरोबर बाहेर जावे.
ובחגים ובמועדים תהיה המנחה איפה לפר ואיפה לאיל ולכבשים מתת ידו ושמן הין לאיפה | 11 |
११सणांच्या आणि उत्सवाच्या दिवशी, एका गोऱ्ह्यामागे एक एफा अन्नार्पण व एक एडक्यामागे अन्नार्पण करावे. एक कोकरामागे जी काही त्याची देण्याची इच्छा असेल तसे करावे. आणि एफासाठी एक हीनभर तेल द्यावे.
וכי יעשה הנשיא נדבה עולה או שלמים נדבה ליהוה ופתח לו את השער הפנה קדים ועשה את עלתו ואת שלמיו כאשר יעשה ביום השבת ויצא וסגר את השער אחרי צאתו | 12 |
१२जेव्हा अधिपती परमेश्वरासाठी स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली व शांत्यर्पणे करील तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडावे. मग शब्बाथाच्या दिवसाप्रमाणे त्याने होमार्पणे व शात्यर्पणे करावी. मग त्याने बाहेर जावे आणि तो बाहेर गेल्यावर दार बंद करावे.
וכבש בן שנתו תמים תעשה עולה ליום--ליהוה בבקר בבקר תעשה אתו | 13 |
१३“परमेश्वरास रोज होमार्पण करण्यासाठी तू एक वर्षांचे निर्दोष असे कोकरु द्यावे. तू दररोज सकाळी हे करावे.
ומנחה תעשה עליו בבקר בבקר ששית האיפה ושמן שלישית ההין לרס את הסלת מנחה ליהוה--חקות עולם תמיד | 14 |
१४आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्नार्पण द्यावे. गव्हाचे पीठ एफाचा सहावा भाग व ते नरम करण्यासाठी हीनाचा तिसरा भाग तेल, असे अन्नार्पण परमेश्वरास करावे. हा सर्वकाळचा विधी सतत चालावयाचा आहे.
ועשו (יעשו) את הכבש ואת המנחה ואת השמן בבקר בבקר עולת תמיד | 15 |
१५याप्रमाणे ते रोज सकाळी निरंतरच्या होमार्पणासाठी कोकरू, अन्नार्पण व तेल रोज सकाळी सिद्ध करतील.”
כה אמר אדני יהוה כי יתן הנשיא מתנה לאיש מבניו--נחלתו היא לבניו תהיה אחזתם היא בנחלה | 16 |
१६प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जर अधिपतीने आपल्या मुलापैकी एकाला काही इनाम दिले तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या मुलाचे होईल. ते त्याचे वतन आहे.
וכי יתן מתנה מנחלתו לאחד מעבדיו--והיתה לו עד שנת הדרור ושבת לנשיא אך נחלתו--בניו להם תהיה | 17 |
१७पण त्याने जर आपल्या वतनाचा काही भाग, आपल्या एखाद्या सेवकाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत तो त्या सेवकाचा होईल. मग तो अधिपतीकडे परत जाईल. त्याचे वतन त्याच्या मुलासच मिळेल.
ולא יקח הנשיא מנחלת העם להונתם מאחזתם--מאחזתו ינחל את בניו למען אשר לא יפצו עמי איש מאחזתו | 18 |
१८आणि अधिपतीने लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यास घालवून देऊ नये. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना द्यावा. म्हणजे माझ्या लोकांपैकी प्रत्येक मनुष्य आपआपल्या वतनातून विखरला जाऊ नये.”
ויביאני במבוא אשר על כתף השער אל הלשכות הקדש אל הכהנים הפנות צפונה והנה שם מקום בירכתם (בירכתים) ימה | 19 |
१९मग त्या मनुष्याने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. आणि पाहा! तेथे अगदी पश्चिमेकडे एक जागा दिसली.
ויאמר אלי--זה המקום אשר יבשלו שם הכהנים את האשם ואת החטאת אשר יאפו את המנחה לבלתי הוציא אל החצר החיצונה לקדש את העם | 20 |
२०तो मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवतील, ज्यात ते अन्नार्पण भाजतील ते हेच आहे यासाठी की, लोकांस पवित्र करायला त्यांनी ती अर्पणे घेऊन बाहेरच्या अंगणात जाऊ नये.”
ויוציאני אל החצר החיצונה ויעברני אל ארבעת מקצועי החצר והנה חצר במקצע החצר חצר במקצע החצר | 21 |
२१मग मला त्याने बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याने मला अंगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. आणि पाहा! अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अंगण होते.
בארבעת מקצעות החצר חצרות קטרות--ארבעים ארך ושלשים רחב מדה אחת לארבעתם מהקצעות | 22 |
२२अंगणाच्या चारी कोपऱ्यात चाळीस हात लांब व तीस हात रुंदीची आवारे होती. चारी कोपरे सारख्याच मापाचे होते.
וטור סביב בהם סביב לארבעתם ומבשלות עשוי מתחת הטירות סביב | 23 |
२३त्यामध्ये चाऱ्हींच्या भोवताली दगडाची भिंत होती. त्या भिंतीत दगडाच्या रांगाखाली स्वयंपाकासाठी जागा केलेली होती.
ויאמר אלי אלה בית המבשלים אשר יבשלו שם משרתי הבית את זבח העם | 24 |
२४तो मनुष्य मला म्हणाला, “या पाकशाला आहेत, त्यामध्ये येथे मंदिराचे सेवक लोकांकडचा यज्ञ शिजवतील.”