< יחזקאל 14 >
ויבוא אלי אנשים מזקני ישראל וישבו לפני | 1 |
१इस्राएलाच्या वडीलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे आले व माझ्यापुढे बसले
२नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला की,
בן אדם האנשים האלה העלו גלוליהם על לבם ומכשול עונם נתנו נכח פניהם האדרש אדרש להם | 3 |
३मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी आपल्या दृष्टी समोर पापाला अडखळण ठेवले आहे, अशा पापीष्ट लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारु देईन?
לכן דבר אותם ואמרת אליהם כה אמר אדני יהוה איש איש מבית ישראל אשר יעלה את גלוליו אל לבו ומכשול עונו ישים נכח פניו ובא אל הנביא אני יהוה נעניתי לו בה (בא)--ברב גלוליו | 4 |
४याकरिता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो, त्यास माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल.
למען תפש את בית ישראל בלבם אשר נזרו מעלי בגלוליהם כלם | 5 |
५मी इस्राएल घराण्याला परत माघारी आणिन, कारण त्यांच्या मूर्तीपुढे त्यांनी मला अगदी परके केले आहे, असे परमेश्वर देव म्हणतो.
לכן אמר אל בית ישראל כה אמר אדני יהוה שובו והשיבו מעל גלוליכם ומעל כל תועבתיכם השיבו פניכם | 6 |
६तथापि इस्राएल घराण्याशी बोल, प्रभू परमेश्वर देव म्हणतो, मूर्तीपुजेपासून मागे फिरा आणि पश्चाताप करा, आपल्या अमंगळ गोष्टीपासून आपले तोंड फिरवा.
כי איש איש מבית ישראל ומהגר אשר יגור בישראל וינזר מאחרי ויעל גלוליו אל לבו ומכשול עונו ישים נכח פניו ובא אל הנביא לדרש לו בי--אני יהוה נענה לו בי | 7 |
७इस्राएलाच्या घराण्यातील प्रत्येकजण आणि इस्राएलात जे मला योग्य तेच आहे आणि ज्यांनी मूर्तीपुजेत अशा पापाचा अडखळण धोंडा आपल्या मनापासून आपल्यात वागवला. आणि माझा शोध घेण्यास भविष्यवक्तांकडे येतात, मी परमेश्वर देव आहे स्वतः त्यांना उत्तर देईन.
ונתתי פני באיש ההוא והשמתיהו לאות ולמשלים והכרתיו מתוך עמי וידעתם כי אני יהוה | 8 |
८माझे मुख त्याच्या पासून लपवीन, त्यांना चिन्ह व लोकांसाठी निंदेचा विषय करीन आणि माझ्या लोकांमधून त्यांना हुसकावून देईन, तेव्हा त्यांन समजेल की मी परमेश्वर देव आहे.
והנביא כי יפתה ודבר דבר--אני יהוה פתיתי את הנביא ההוא ונטיתי את ידי עליו והשמדתיו מתוך עמי ישראל | 9 |
९जर कुणी संदेष्टा भुलथापांनी बोलून संदेश देईल तर समजावे की मीच परमेश्वर देव त्यास भ्रमात पाडून संदेश देण्यास भाग पाडले आहे, त्याच्या विरोधात मी माझा हात उचलीन आणि माझ्या इस्राएलातून त्यांना हुसकून देईन
ונשאו עונם כעון הדרש--כעון הנביא יהיה | 10 |
१०ते त्यांच्या घोर अन्यायाचे फळ भोगतील संदेष्ट्यांचा घोर अन्याय आणि ज्यांनी प्रश्न विचारला ते दोघेही घोर अन्यायाचे फळ भोगतील.
למען לא יתעו עוד בית ישראל מאחרי ולא יטמאו עוד בכל פשעיהם והיו לי לעם ואני אהיה להם לאלהים--נאם אדני יהוה | 11 |
११यासाठी इस्राएल घराणे माझ्यापासून परागंदा होणार नाही ते आपल्या पातकामुळे स्वतःला अशुद्ध करणार नाहीत, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन, असे परमेश्वर देव म्हणतो.
ויהי דבר יהוה אלי לאמר | 12 |
१२नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
בן אדם ארץ כי תחטא לי למעל מעל ונטיתי ידי עליה ושברתי לה מטה לחם והשלחתי בה רעב והכרתי ממנה אדם ובהמה | 13 |
१३मानवाच्या मुला, एखाद्या देशाने माझ्या विरोधात पाप केले, त्यांच्या विरोधात मी माझा हात उचलेन, त्यांना अन्नाचा तुटवडा पडेल त्यांच्यावर दुष्काळ आणिन त्यांच्यातून मानव व पशू ह्यांना हुसकून देईन.
והיו שלשת האנשים האלה בתוכה--נח דנאל (דניאל) ואיוב המה בצדקתם ינצלו נפשם נאם אדני יהוה | 14 |
१४जरी देशात नोहा दानीएल आणि ईयोब हे तिघे असेल तरी पुरे ते त्यांच्या धार्मीकतेमुळे वाचतील असे परमेश्वर प्रभू म्हणतो.
לו חיה רעה אעביר בארץ ושכלתה והיתה שממה מבלי עובר מפני החיה | 15 |
१५जर मी देशात क्रुर हिंस्र पशू पाठविले आणि जमीन नापीक झाली क्रुर पशुमुळे कोणी मनुष्य जाणारे येणार नसल्यामुळे देश निर्जन होईल.
שלשת האנשים האלה בתוכה--חי אני נאם אדני יהוה אם בנים ואם בנות יצילו המה לבדם ינצלו והארץ תהיה שממה | 16 |
१६जरी त्यामध्ये ते तिघे असले तरी त्याचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही. मात्र त्याचा स्वतःचा बचाव होईल, मात्र देश ओसाड होईल असे परमेश्वर देव म्हणतो.
או חרב אביא על הארץ ההיא ואמרתי חרב תעבר בארץ והכרתי ממנה אדם ובהמה | 17 |
१७जर मी देशा विरुध्द तलवार चालवीली आणि म्हणालो, देशातील दोन्ही मनुष्य आणि पशू नष्ट करीन.
ושלשת האנשים האלה בתוכה--חי אני נאם אדני יהוה לא יצילו בנים ובנות כי הם לבדם ינצלו | 18 |
१८जरी हे तीन मनुष्य देशात असतील असे परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही, मात्र त्यांच्या जीवाचा बचाव होईल.
או דבר אשלח אל הארץ ההיא ושפכתי חמתי עליה בדם להכרית ממנה אדם ובהמה | 19 |
१९जर मी देशावर क्रोध मरी पाठवीली, त्यांचे रक्त सांडल्यामुळे मनुष्य आणि पशू हे नष्ट करीन.
ונח דנאל (דניאל) ואיוב בתוכה--חי אני נאם אדני יהוה אם בן אם בת יצילו המה בצדקתם יצילו נפשם | 20 |
२०जरी देशात नोहा, दानीएल आणि ईयोब असले प्रभू परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांच्या मुलगा मुलगी यांचा बचाव करु शकणार नाही पण ते त्यांच्या धार्मिकतेने स्वतःचा बचाव करतील.
כי כה אמר אדני יהוה אף כי ארבעת שפטי הרעים חרב ורעב וחיה רעה ודבר שלחתי אל ירושלם--להכרית ממנה אדם ובהמה | 21 |
२१कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चित शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरूशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल, तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे परमेश्वर देव म्हणतो.
והנה נותרה בה פלטה המוצאים בנים ובנות--הנם יוצאים אליכם וראיתם את דרכם ואת עלילותם ונחמתם על הרעה אשר הבאתי על ירושלם--את כל אשר הבאתי עליה | 22 |
२२त्यांच्यामध्ये तरी काही उरलेले राहतील, त्यांच्या मुला मुलींना मी बाहेर आणिन, पाहा ते तुम्हाकडे येतील; तुम्ही त्यांचे मार्ग आणि काम पाहाल; तेव्हा यरूशलेमेवर संकट आणल्याबद्दल त्यांना दिलासा देईन.
ונחמו אתכם כי תראו את דרכם ואת עלילותם וידעתם כי לא חנם עשיתי את כל אשר עשיתי בה--נאם אדני יהוה | 23 |
२३तेव्हा त्यांचे मार्ग आणि कार्य पाहून तुम्हास दिलासा मिळेल, त्यांचे मी जे काही केले ते सगळे मी निरर्थक केले नाही. हे तुम्हास कळेल असे परमेश्वर देव म्हणतो.