< אסתר 3 >

אחר הדברים האלה גדל המלך אחשורוש את המן בן המדתא האגגי--וינשאהו וישם את כסאו מעל כל השרים אשר אתו 1
या सर्व घडामोडी झाल्यानंतर अहश्वेरोश राजाने हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान ह्याला बढती देऊन गौरव केला. त्याच्याबरोबरच्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वरचे आसन त्यास दिले.
וכל עבדי המלך אשר בשער המלך כרעים ומשתחוים להמן--כי כן צוה לו המלך ומרדכי--לא יכרע ולא ישתחוה 2
राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखय त्यास नमन किंवा मुजरा करीत नसे.
ויאמרו עבדי המלך אשר בשער המלך--למרדכי מדוע אתה עובר את מצות המלך 3
तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयाला विचारले, “राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?”
ויהי באמרם (כאמרם) אליו יום ויום ולא שמע אליהם ויגידו להמן לראות היעמדו דברי מרדכי--כי הגיד להם אשר הוא יהודי 4
राजाचे सेवक त्यास दररोज हेच विचारू लागले तरी त्याने मुजरा करायची राजाज्ञा पाळली नाहीच. तेव्हा असे झाले की, मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहावे म्हणून त्यांनी हामानाला सांगितले; आपण यहूदी असल्याचे त्याने या सेवकांना सांगितले होते.
וירא המן--כי אין מרדכי כרע ומשתחוה לו וימלא המן חמה 5
जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा तो संतापला.
ויבז בעיניו לשלח יד במרדכי לבדו--כי הגידו לו את עם מרדכי ויבקש המן להשמיד את כל היהודים אשר בכל מלכות אחשורוש--עם מרדכי 6
पण फक्त मर्दखयाला जिवे मारणे त्यास अपमानकारक वाटले. कारण मर्दखयाचे लोक कोण होते, ते त्यांनी हामानाला सांगितले होते, म्हणून अहश्वेरोशाच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहूदी लोकांस कसे मारता येईल याचा विचार तो करु लागला.
בחדש הראשון הוא חדש ניסן בשנת שתים עשרה למלך אחשורוש הפיל פור הוא הגורל לפני המן מיום ליום ומחדש לחדש שנים עשר--הוא חדש אדר 7
अहश्वेरोश राजाच्या कारकीर्दीच्या बाराव्या वर्षीच्या पहिल्या महिन्यामध्ये, हामानाने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या, त्या चिठ्ठ्या ते रोज व प्रत्येक महिन्यांमध्ये टाकत होते त्यानुसार अदार हा बारावा महिना त्यांनी निवडला.
ויאמר המן למלך אחשורוש--ישנו עם אחד מפזר ומפרד בין העמים בכל מדינות מלכותך ודתיהם שנות מכל עם ואת דתי המלך אינם עשים ולמלך אין שוה להניחם 8
मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे राजाच्या हिताचे नाही.
אם על המלך טוב יכתב לאבדם ועשרת אלפים ככר כסף אשקול על ידי עשי המלאכה להביא אל גנזי המלך 9
“जर राजाची मर्जी असल्यास, या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी आणि दहा हजार किक्कार रुपे राजाच्या खजिन्यात आणावे, म्हणून मी ते तोलून राजाचे काम पाहणाऱ्यांच्या हातांत देतो.”
ויסר המלך את טבעתו מעל ידו ויתנה להמן בן המדתא האגגי--צרר היהודים 10
१०तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामानाला दिली.
ויאמר המלך להמן הכסף נתון לך והעם לעשות בו כטוב בעיניך 11
११राजाने हामानास म्हटले, “तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत; तुला बरे वाटेल तसे त्यांचे करावे.”
ויקראו ספרי המלך בחדש הראשון בשלושה עשר יום בו ויכתב ככל אשר צוה המן אל אחשדרפני המלך ואל הפחות אשר על מדינה ומדינה ואל שרי עם ועם מדינה ומדינה ככתבה ועם ועם כלשונו בשם המלך אחשורש נכתב ונחתם בטבעת המלך 12
१२त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यांस त्यांनी हामानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठविण्यात आली. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली.
ונשלוח ספרים ביד הרצים אל כל מדינות המלך--להשמיד להרג ולאבד את כל היהודים מנער ועד זקן טף ונשים ביום אחד בשלושה עשר לחדש שנים עשר הוא חדש אדר ושללם לבוז 13
१३जासुदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. एकाच दिवशी म्हणजे अदार महिन्याच्या, बाराव्या महिन्याच्या तेराव्या दिवशी तरुण व वृध्द माणसे, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूद्यांचा नाश करावा, त्यांना ठार करावे व त्यांचा नायनाट करावा. त्यांची सर्व मालमत्ता लुटून घ्यावी म्हणून लिहून पाठवले.
פתשגן הכתב להנתן דת בכל מדינה ומדינה גלוי לכל העמים--להיות עתדים ליום הזה 14
१४हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून प्रत्येक प्रांतातून हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांस तो कळवण्यात आला, जेणेकरून त्या दिवशी सर्व लोकांनी तयार असावे.
הרצים יצאו דחופים בדבר המלך והדת נתנה בשושן הבירה והמלך והמן ישבו לשתות והעיר שושן נבוכה 15
१५राजाच्या हुकूमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र गोंधळून गेले.

< אסתר 3 >