< עמוס 7 >

כה הראני אדני יהוה והנה יוצר גבי בתחלת עלות הלקש והנה לקש--אחר גזי המלך 1
परमेश्वराने मला असे दाखविले की पाहा, वसंत ऋतुचे पीक वर येत असताच त्याने टोळ निर्माण केले. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे पीक होय.
והיה אם כלה לאכול את עשב הארץ ואמר אדני יהוה סלח נא מי יקום יעקב כי קטן הוא 2
टोळांनी देशातील सर्व गवत खाऊन झाल्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हास क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही, कारण तो फारच लहान आहे.”
נחם יהוה על זאת לא תהיה אמר יהוה 3
मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”
כה הראני אדני יהוה והנה קרא לרב באש אדני יהוה ותאכל את תהום רבה ואכלה את החלק 4
प्रभू परमेश्वराने, मला पुढील गोष्टी दाखविल्या, पाहा, परमेश्वर देवाने अग्नीला न्याय करण्यास बोलावले. त्याने महासागर कोरडा केला व भूमीही खाऊन टाकणार होता.
ואמר אדני יהוה חדל נא--מי יקום יעקב כי קטן הוא 5
पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, याकोब कसा वाचेल? करण तो खूपच लहान आहे.”
נחם יהוה על זאת גם היא לא תהיה אמר אדני יהוה 6
मग परमेश्वराचे या गोष्टीबाबत हृदयपरिवर्तन झाले. प्रभू परमेश्वर म्हणाला, “हे ही घडणार नाही.”
כה הראני והנה אדני נצב על חומת אנך ובידו אנך 7
परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पाहा, परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता.
ויאמר יהוה אלי מה אתה ראה עמוס ואמר אנך ויאמר אדני הנני שם אנך בקרב עמי ישראל--לא אוסיף עוד עבור לו 8
परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो ओळंबा, मग प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या मनुष्यांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.
ונשמו במות ישחק ומקדשי ישראל יחרבו וקמתי על בית ירבעם בחרב 9
इसहाकाच्या उच्च स्थानाचा नाश होईल, इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील, आणि मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
וישלח אמציה כהן בית אל אל ירבעם מלך ישראל לאמר קשר עליך עמוס בקרב בית ישראל--לא תוכל הארץ להכיל את כל דבריו 10
१०बेथेल येथील याजक अमस्या ह्याने, “इस्राएलाचा राजा, यराबामाला निरोप पाठविला. आमोसाने इस्राएलाच्या घरामध्ये तुझ्याविरुध्द कट केला आहे. त्याचे सर्व शब्द देशाला सहन करवत नाही.
כי כה אמר עמוס בחרב ימות ירבעם וישראל--גלה יגלה מעל אדמתו 11
११कारण आमोस असे म्हणतो, यराबाम तलवारीने मरेल, आणि इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”
ויאמר אמציה אל עמוס חזה לך ברח לך אל ארץ יהודה ואכל שם לחם ושם תנבא 12
१२अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात पळून जा आणि तेथेच भाकर खाऊन तुझे प्रवचन दे.
ובית אל לא תוסיף עוד להנבא כי מקדש מלך הוא ובית ממלכה הוא 13
१३पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ नकोस. कारण ही राजाचे पवित्रस्थान आहे व राज घराणे आहेत.”
ויען עמוס ויאמר אל אמציה לא נביא אנכי ולא בן נביא אנכי כי בוקר אנכי ובולס שקמים 14
१४मग आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नव्हतो व संदेष्ट्याचा मुलगाही नव्हतो. मी गुरांचे कळप राखणारा आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.
ויקחני יהוה מאחרי הצאן ויאמר אלי יהוה לך הנבא אל עמי ישראל 15
१५मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले, आणि मला म्हटले, ‘जा, माझ्या लोकांस, इस्राएलाला, भविष्य सांग.’
ועתה שמע דבר יהוה אתה אמר לא תנבא על ישראל ולא תטיף על בית ישחק 16
१६म्हणून आता परमेश्वराचे वचन ऐक, ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस.
לכן כה אמר יהוה אשתך בעיר תזנה ובניך ובנתיך בחרב יפלו ואדמתך בחבל תחלק ואתה על אדמה טמאה תמות וישראל גלה יגלה מעל אדמתו 17
१७पण परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी पत्नी गावची वेश्या होईल; तुझी मुले-मुली तलवारीने मरतील, तुझी भूमी सूत्राने विभागीत करण्यात येईल, तू अपवित्र जागी मरशील, इस्राएलाच्या लोकांस निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”

< עמוס 7 >