< Zabura 108 >
1 Waƙa ce. Zabura ta Dawuda. Zuciyata tsayayyiya ce, ya Allah; zan rera in kuma yi kiɗi da dukan raina.
१दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.
2 Ku farka, garaya da molo! Zan farkar da rana.
२हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. मी पहाटेला जागे करीन.
3 Zan yabe ka, ya Ubangiji, a cikin al’ummai; zan rera game da kai cikin mutane.
३हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन; मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन.
4 Gama ƙaunarka da girma take, bisa fiye da sammai; amincinka ya kai sarari.
४कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.
5 A ɗaukaka ka, ya Allah, a bisa sammai, bari kuma ɗaukakarka ta kasance a bisa dukan duniya.
५हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे. आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो.
6 Ka cece mu ka kuma taimake mu da hannunka na dama, domin waɗanda kake ƙauna su kuɓuta.
६म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे, तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे.
7 Allah ya yi magana daga wurinsa mai tsarki, “Ciki nasara zan raba Shekem in kuma auna Kwarin Sukkot.
७देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
8 Gileyad nawa ne, Manasse nawa ne; Efraim shi hulan kwanona, Yahuda ne sandana na sarauta.
८गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे. एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. यहूदा माझा राजदंड आहे.
9 Mowab shi ne kwanon wankina, a kan Edom zan jefa takalmina; a bisa Filistiya zan yi kirari cikin nasara.”
९मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.”
10 Wa zai kawo ni birni mai katanga? Wa zai jagorance ni zuwa Edom?
१०तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल?
11 Ba kai ba ne, ya Allah, kai da ka ƙi mu ba ka kuwa fita tare da mayaƙanmu?
११हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का? तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.
12 Ka ba mu taimako a kan abokin gāba, gama taimakon mutum banza ne.
१२आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.
13 Tare da Allah za mu yi nasara, zai kuma tattaka abokan gābanmu.
१३देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.