< Ƙidaya 25 >
1 Lokacin da Isra’ila suke a sansani a Shittim, sai maza suka fara yin lalata da matan Mowabawa,
१इस्राएली शिट्टीमात राहत असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले.
2 waɗanda suka gayyace su zuwa wajen hadayu na allolinsu. Mutane suka ci suka kuma yi wa waɗannan alloli sujada.
२मवाबाच्या स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या देवांच्या अर्पणात आमंत्रण दिले. तेव्हा लोक जेवले व त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले.
3 Ta haka Isra’ila suka sa kai a bautar gumaka Ba’al-Feyor. Ubangiji kuwa ya husata da su.
३इस्राएल लोकांनी बआल-पौराच्या देवांची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वराचा राग इस्राएलांवर भडकला.
4 Ubangiji ya ce wa Musa, “Ka kama dukan shugabannin mutanen nan, ka kashe su, ka kuma bar su a tsakar rana a gaban Ubangiji, don Ubangiji yă huce daga fushin da nake yi da Isra’ila.”
४परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरता भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलावर भडकलेला राग जाईल.”
5 Saboda haka Musa ya ce wa alƙalan Isra’ila, “Dole kowannenku yă kashe mutanen nan da suka haɗa kai cikin bautar Ba’al-Feyor.”
५मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या ताब्यातील पुरुष बआल-पौराच्या देवांची उपासना करतात त्या सर्वांना तुम्ही मारून टाका.”
6 Sa’an nan wani mutumin Isra’ila ya kawo wata Bamidiyana a iyalinsa a idon Musa da dukan taron jama’ar Isra’ila, yayinda suke kuka a ƙofar Tentin Sujada.
६त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी जमली होती. एका इस्राएली मनुष्याने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भावाच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडीलधारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते तर दर्शनमंडपाशी रडत होते.
7 Da Finehas ɗan Eleyazar, ɗan Haruna, firist, ya ga haka, sai ya bar taron, ya ɗauki māshi
७जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला.
8 ya bi mutumin Isra’ilan nan cikin tenti, ya soke dukansu biyu, māshin ya ratsa jikin mutumin Isra’ilan har zuwa jikin macen. Sa’an nan aka tsai da annoban nan a kan Isra’ilawa.
८तो त्या इस्राएली मनुष्याचा मागे त्याच्या तंबूत गेला आणि त्याने त्या दोघांच्या म्हणजे इस्राएली मनुष्याच्या व त्या स्त्रीच्या पोटात भाला आरपार खुपसला. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी बंद झाली.
9 Waɗanda suka mutu a wannan annoba, sun kai mutum 24,000.
९या मरीमुळे एकून चोवीस हजार लोक मरण पावले.
10 Ubangiji ya ce wa Musa,
१०परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
11 “Finehas ɗan Eleyazar, ɗan Haruna, firist, ya kawar da fushina daga Isra’ilawa; saboda ya yi kishi irin nawa a gabansu, don haka saboda ɗaukakata ban kawo ƙarshensu ba.
११एलाजाराचा मुलगा फिनहास याजक अहरोनाच्या नातवाने इस्राएल लोकांस माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएलावरील माझा राग दूर केला. म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी त्यांचा नाश केला नाही.
12 Saboda haka ka faɗa masa cewa zan yi alkawarin salama da shi.
१२फिनहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतीचा करार करीत आहे.
13 Shi da zuriyarsa za su kasance da alkawari na zama firist har abada, saboda kishinsa domin ɗaukakar Allahnsa, ya kuma yi kafara domin Isra’ilawa.”
१३हा त्यास आणि त्याच्यामागे त्याच्या वंशजाना सर्वकाळ याजकपणाचा करार होईल. कारण तो आपल्या देवाबद्दल खूप आवेशी झाला. आणि त्याने इस्राएलाच्या वंशासाठी प्रायश्चित केले.
14 Sunan mutumin Isra’ilan da aka kashe tare da macen nan Bamidiyana kuwa Zimri ne, ɗan Salu, shugaban mutanen Simeyon.
१४“मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली मनुष्य मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता.”
15 Sunan macen nan Bamidiyana da aka kashe kuwa Kozbi ne,’yar Zur, wani basaraken iyalin Midiyawa.
१५आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबी होते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.
16 Ubangiji ya ce wa Musa,
१६परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणालाः
17 “Ka ɗauki Midiyawa a matsayin abokan gāba, ka kuma kashe su,
१७“तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानाचे लोक तुझे शत्रू आहेत.
18 gama sun ɗauke ku a matsayin abokan gāba, sa’ad da suka ruɗe ku a kan al’amuran Feyor da’yar’uwarsu Kozbi’yar shugaban Midiyawa, macen da aka kashe a annoba ta dalili Feyor.”
१८कारण त्यांनी तुला आपल्या कपटाने शत्रूसारखे वागवले. त्यांनी तुला पौराच्या वाईट गोष्टींच्या बाबतीत आणि मिद्यानाच्या अधिपतीची मुलगी कजबी, त्यांची बहीण, जी पौराच्या प्रकरणात मरी पसरली तेव्हा ती मारली गेली, तिच्या गोष्टीने ते तुम्हास जाचतात.”