< Mahukunta 15 >
1 Daga baya, a lokacin girbin alkama, Samson ya ɗauki ɗan akuya ya tafi yă ziyarci matarsa. Sai ya ce, “Zan in shiga ɗakin matata.” Amma mahaifinta ya hana shi shiga.
१काही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या पत्नीला भेटण्यास गेला; तेव्हा तो स्वत: शी म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जाईन” परंतु तिच्या पित्याने त्यास आत जाऊ दिले नाही.
2 Ya ce wa, “Na tabbata ba ka sonta sam-sam, don haka na ba da ita ga abokinka. Ba ƙanuwarta ta fi kyau ba? Ka ɗauke ta a maimako.”
२तिचा पिता म्हणाला, “मला वाटले तू तिचा अगदी द्वेष करतोस, म्हणून मी तिला तुझ्या मित्राला देऊन टाकली; तिची लहान बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे, आहे की नाही? तिच्याऐवजी तिला घे.”
3 Samson kuwa ya ce musu, “A wannan lokaci ina da iko in rama a kan Filistiyawa; tabbatacce zan ji musu.”
३तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “या वेळेस मी पलिष्ट्यांची हानी केली, तरी त्यासंबंधी मी निर्दोष राहीन.”
4 Saboda haka ya tafi ya kama yanyawa ɗari uku ya ɗaura wutsiyoyinsu wutsiya da wutsiya. Sa’an nan ya daure acibalbal a tsakanin ko waɗanne wutsiya biyu,
४शमशोन गेला आणि त्याने जाऊन तीनशे कोल्हे पकडले, आणि शेपटाला शेपूट अशी एकएक जोडीच्या बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या.
5 sai ya sa wa acibalbal wuta, ya saki yanyawan suka shiga gonakin Filistiyawa. Suka ƙone dammunan hatsi da hatsin da yake tsaye, tare da gonakin inabi da na zaitun.
५मग मशाली पेटवून त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात सोडले, आणि त्यांनी दोन्ही उभे पिके आणि धान्याच्या रचलेल्या सुड्यांसह जाळली आणि त्याबरोबर जैतूनाचे मळेही जाळले.
6 Filistiyawa suka yi tambaya suka ce, “Wane ne ya yi wannan abu?” Sai aka ce musu, “Ai, Samson ne surukin mutumin Timna, domin an ba wa abokinsa matarsa.” Saboda haka Filistiyawa suka haura suka je suka ƙone ta da mahaifinta ƙurmus da wuta.
६तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” नंतर त्यांनी म्हटले, “तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची पत्नी घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ट्यांनी जाऊन तिला व तिच्या पित्याला आग लावून जाळून टाकले.
7 Samson ya ce musu, “Tun da kun aikata wannan, ba zan bari ba har sai na ɗau fansa a kanku.”
७शमशोन त्यांना म्हणाला, जरी तुम्ही हे केले, तरी त्याचा मी तुमच्याविरुध्द सूड घेईन, आणि ते केल्यानंतरच मग मी थांबेन.”
8 Ya kuwa fāɗa musu ya kuma karkashe su da yawa. Sa’an nan ya gangara ya zauna a kogo a dutsen Etam.
८नंतर त्याने त्यांना मांडीवर व कंबरेवर मारून त्यांचे तुकडे तुकडे करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली गेला आणि उंच कड्याच्या एटाम दरीत गुहेमध्ये जाऊन राहिला.
9 Filistiyawa suka haura suka yi sansani a Yahuda, suka bazu kusa da Lehi.
९मग पलिष्टी बाहेर आले आणि त्यांनी यहूदामध्ये येऊन लढाईची तयारी केली, आणि त्यांनी लेहीत त्यांच्या सैन्याची व्यूहरचना केली.
10 Mutanen Yahuda suka ce, “Me ya sa kuka zo mana da yaƙi?” Sai suka ce, “Mun zo ne mu kama Samson, a matsayin fursunan yaƙi, mu yi masa kamar yadda ya yi mana.”
१०तेव्हा यहूदी माणसे म्हणाली, “तुम्ही आमच्यावर का हल्ला केला आहे?” तेव्हा ते म्हणाले, “शमशोनाला पकडण्यासाठी म्हणून आम्ही हल्ला केला आहे; त्याने आमच्याशी जसे केले, तसेच त्याच्याशी करण्यासाठी आम्ही आलो आहो.”
11 Sa’an nan mutane dubu uku daga Yahuda suka gangara wajen Samson a kogo a dutsen Etam. Suka ce masa, “Ba ka san cewa Filistiyawa ne suke mulkinmu ba? Me ke nan ka yi mana?” Ya ce musu, “Na ɗan yi musu abin da suka yi mini ne.”
११नंतर यहूदातली तीन हजार माणसे खाली एटाम दरीच्या उंच कड्याजवळ जाऊन शमशोनाला म्हणाली, “पलिष्टी आमच्यावर राज्य करतात, हे तुला माहीत नाही काय? तर तू हे काय केले?” शमशोन त्यांना म्हणाला, “जसे त्यांनी माझे केले, तसे मी त्यांचे केले आहे.”
12 Suka ce masa, “To, mun zo ne mu daure ka mu kai wa Filistiyawa.” Samson ya ce, “Ku rantse mini ba za ku kashe ni da kanku ba.”
१२ते शमशोनाला म्हणाले, “आम्ही तुला बांधून पलिष्ट्यांच्या हाती देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला,” तुम्ही स्वत: मला मारून टाकणार नाही, “अशी माझ्याजवळ शपथ घ्या.”
13 Suka ce, “Mun yarda, za mu dai daure ka mu ba da kai gare su. Ba za mu kashe ka ba.” Saboda haka suka daure shi da sababbin igiyoyi biyu, suka saukar da shi daga dutsen.
१३मग त्यांनी त्यास सांगितले की, “नाही, आम्ही फक्त तुला दोरीने बांधू आणि तुला त्यांच्या हाती सोपवू. आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही.” तेव्हा त्यांनी दोन नव्या दोरांनी त्यास बांधून खडकातून वर नेले.
14 Yayinda ya zo gab da Lehi, sai Filistiyawa suka sheƙo a guje da ihu suka nufo shi. Ruhun Ubangiji kuwa ya sauko da iko a kansa. Igiyoyin da suke daure a hannuwansa kuwa suka zama kamar abin da wuta ta babbaka, suka tsintsinke suka zuba daga hannuwansa.
१४जेव्हा तो लेहीस पोहचला, तेव्हा पलिष्ट्यांनी त्यास पाहून पलिष्टी आनंदाने ओरडू लागले; आणि परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातांना बांधलेले दोर ताग जळतो तसे झाले आणि दोर हातातून गळून पडले.
15 Da ya samo muƙamuƙin jaki, ya ɗauka, sai ya karkashe mutane dubu ɗaya.
१५नंतर त्यास गाढवाचे ताजे जाभाड सापडले आणि त्याने ते उचलले आणि त्याच्याने एक हजार माणसे मारली.
16 Sa’an nan Samson ya ce, “Da muƙamuƙin jaki na mai da su jakuna. Da muƙamuƙin jaki na kashe mutum dubu.”
१६शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने ढिगावर ढिग, गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे मारली.”
17 Da ya gama magana, sai ya jefar da muƙamuƙin; aka ba wa wannan wuri suna Ramat Lehi.
१७शमशोनाने बोलणे संपवल्यावर, आपल्या हातातून ते जाभाड फेकून दिले, यावरुन त्या ठिकाणाचे नाव रामाथ-लेही ठेवले.
18 Saboda ƙishirwa ta kama shi ƙwarai, sai ya ce wa Ubangiji, “Ka ba bawanka wannan babbar nasara. To, sai in mutu da ƙishirwa, har in shiga a hannun marasa kaciyan nan su kashe ni?”
१८तेव्हा शमशोनाला फार तहान लागली आणि त्याने परमेश्वरास हाक मारून म्हटले, “तू आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे; परंतु आता मी तहानेने मरत आहे आणि न्यायासाठी बेसुंती लोकांच्या हाती पडत आहे.”
19 Sa’an nan Allah ya buɗe wani rami a Lehi, ruwa kuwa ya fito daga ciki. Da Samson ya sha, sai ƙarfinsa ya dawo, ya kuma wartsake. Aka sa wa wannan maɓulɓula suna En Hakkore, yana nan a Lehi har wa yau.
१९तेव्हा देवाने लेहीमधील खोलगट जागा दुभंगून फोडली, आणि त्यातून पाणी निघाले; जेव्हा तो ते प्याला, तेव्हा त्यास परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरुन त्या जागेचे नाव एन-हक्कोरे पडले; ती जागा आजपर्यंत लेहीमध्ये आहे.
20 Samson kuwa ya shugabanci Isra’ila shekara ashirin a zamanin Filistiyawa.
२०शमशोनाने पलिष्ट्यांच्या काळात इस्राएलाचा वीस वर्षे न्याय केला.