< Fitowa 32 >

1 Sa’ad da mutane suka ga Musa ya daɗe bai sauko daga dutse ba, sai suka taru kewaye da Haruna suka ce, “Zo, ka yi mana alloli waɗanda za su yi mana jagora. Game da wannan Musa wanda ya fitar da mu daga Masar dai, ba mu san abin da ya faru da shi ba.”
मोशेला पर्वतावरून उतरण्यास बराच विलंब लागला आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्यास म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले आहे. परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांला कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर.”
2 Haruna ya amsa musu ya ce, “Ku tuttuɓe zoban zinariya waɗanda suke kunnuwan matanku, da na’ya’yanku maza da mata, ku kawo mini.”
तेव्हा अहरोन लोकांस म्हणाला, “तुम्ही तुमच्या स्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातील सोन्याची कुंडले मजकडे आणा.”
3 Saboda haka dukan mutane suka tuttuɓe’yan kunnensu suka kawo wa Haruna.
मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली.
4 Sai ya karɓi abubuwan da suka ba shi, ya yi gunki na siffar ɗan maraƙi, ya sassaƙa shi da kayan aiki. Sa’ad da mutane suka gani, sai suka tā da murya suka ce, “Waɗannan su ne allolinku, ya Isra’ila, waɗanda suka fitar da ku daga Masar.”
अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून व कोरणीने कोरून त्यापासून वासरू केले. मग लोक म्हणाले, “हे इस्राएला, ज्या देवाने तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे तो हाच देव आहे.”
5 Da Haruna ya ga haka, sai ya gina bagade a gaban ɗan maraƙi, ya yi shela ya ce, “Gobe akwai biki ga Ubangiji.”
अहरोनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या वासरापुढे एक वेदी बांधली आणि जाहीर करून तो म्हणाला, “तुमच्या परमेश्वराकरता उद्या उत्सव होणार आहे.”
6 Saboda haka kashegari, mutane suka tashi da sassafe suka miƙa hadaya ta ƙonawa, da hadaya ta salama. Bayan haka suka zauna suka ci, suka sha, suka kuma tashi suka yi rawa.
लोक दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले; त्यांनी होमार्पणे अर्पिली व शांत्यर्पणे आणली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले.
7 Sai Ubangiji ya ce wa Musa, “Sauka, gama mutanenka, waɗanda ka fitar da su daga Masar sun ƙazantu.
त्या वेळी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांस तू मिसर देशातून बाहेर आणले ते बिघडले आहेत.
8 Sun yi saurin juyawa daga abin da na umarce su, sun kuma yi wa kansu gunki na siffar ɗan maraƙi. Sun yi sujada ga ɗan maraƙi, suka yi hadaya gare shi, suka kuma ce, waɗannan su ne allolinka ya Isra’ila, waɗanda suka fito da kai daga Masar.”
ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते त्या मार्गापासून किती लवकर ते बहकून गेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ती केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्यास बली अर्पणे वाहत आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएला, याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.”
9 Ubangiji ya ce wa Musa, “Na ga waɗannan mutane, mutane ne masu taurinkai.”
परमेश्वर मोशेला म्हणाला, “या लोकांस मी पाहिले आहे; ते ताठ मानेचे लोक आहेत;
10 Yanzu ka bar ni kurum fushina yă yi ƙuna a kansu, in hallaka su. Sa’an nan in maishe ka al’umma mai girma.
१०तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो.”
11 Amma Musa ya nemi tagomashin Ubangiji, Allahnsa ya ce, “Ya Ubangiji don me fushinka zai yi ƙuna a kan mutanenka, waɗanda ka fisshe su daga Masar da ikon hannunka mai girma?
११परंतु काकुळतीने विनंती करून मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या महान सामर्थ्याने व भुजप्रतापाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?
12 Don me za ka sa Masarawa su ce, ‘Ai, da mugun nufi ne ya fito da su don yă shafe su daga fuskar duniya’? Ka juya daga fushinka mai zafi, ka ji tausayi, kada ka kawo masifa a kan mutanenka.
१२आणि परमेश्वराने त्यांचे वाईट करण्यासाठी, डोंगरावर त्यांना ठार मारण्यासाठी व पृथ्वीवरून त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का म्हणावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो.
13 Ka tuna da bayinka Ibrahim, Ishaku da Isra’ila, waɗanda ka rantse da kanka cewa, ‘Zan mai da zuriyarka kamar taurarin sama kuma zan ba wa zuriyarka wannan ƙasa wadda na yi musu alkawari, za tă kuma zama abin gādonsu har abada.’”
१३तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल, यांची आठवण कर; तू तुझ्या नावाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी जास्तीत जास्त करीन, मी ज्या देशाविषयी सांगितले तो सर्व देश मी तुझ्या संततीला देईन व तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल.
14 Sai Ubangiji ya yi juyayi, bai kuwa kawo wa mutanensa bala’in da ya yi niyya ba.
१४तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला.
15 Musa ya juya, ya sauka daga kan dutsen da alluna biyu na Alkawari a hannuwansa. An yi rubutun a kowane gefe, gaba da baya.
१५मग मोशे पर्वतावरून साक्षपटाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना लिहिलेले होते.
16 Allunan aikin Allah ne; rubutun kuma rubutun Allah ne, da ya zāna a kan alluna.
१६देवाने स्वत: च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्यांच्यावर कोरलेला लेख देवाने लिहिलेला होता.
17 Sa’ad da Yoshuwa ya ji surutun mutane suna ihu, sai ya ce wa Musa, “Kamar akwai ƙarar yaƙi a sansani.”
१७यहोशवाने लोकांचा गोंगाट ऐकला व तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईसारखा आवाज ऐकू येत आहे.”
18 Musa ya amsa ya ce, “Ba ƙarar nasara ba ce, ba ƙarar wanda yaƙi ya ci ba ne; ƙarar waƙa ce nake ji.”
१८मोशेने उत्तर दिले, “एखाद्या सैन्याच्या विजयाचा हा आवाज नाही किंवा एखाद्या सैन्याच्या पराभवाचा हा आक्रोश नाही; मला जो आवाज ऐकू येत आहे तो नाचगाण्यांचा आहे.”
19 Da Musa ya kusato sansanin, sai ya ga ɗan maraƙin da kuma mutane suna rawa. Sai fushinsa ya yi ƙuna, ya kuwa jefar da allunan da suke hannuwansa, allunan kuwa suka farfashe a gindin dutsen.
१९मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू व लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.
20 Sai ya ɗauki ɗan maraƙin da suka yi, ya ƙone a wuta; sa’an nan ya niƙa shi ya zama gari, ya barbaɗa garin a ruwa, ya sa Isra’ilawa suka sha.
२०नंतर लोकांनी बनविलेले ते सोन्याचे वासरू मोशेने तोडून फोडून ते अग्नीत जाळले. व कुटून त्याची पूड केली; मग ती पाण्यात टाकली. नंतर ते पाणी त्याने इस्राएल लोकांस प्यायला दिले.
21 Ya ce wa Haruna, “Mene ne waɗannan mutane suka yi maka da ka kai su ga wannan zunubi mai girma?”
२१मोशे अहरोनास म्हणाला, “या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?”
22 Haruna ya amsa ya ce, “Kada ka yi fushi da ni ranka yă daɗe, ka san yadda mutanen nan suke da saurin yin mugunta.
२२अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला माहीत आहे.
23 Sun ce mini, ‘Ka yi mana alloli waɗanda za su yi mana jagora, game da wannan Musa dai, wanda ya fito da mu daga Masar, ba mu san abin da ya faru da shi ba.’
२३लोक मला म्हणाले, ‘मोशेने आम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; परंतु आता त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही; तेव्हा आमच्यापुढे चालतील असे देव तू आमच्यासाठी करून दे.’
24 Sai na gaya musu, ‘Duk wanda yana da kayan ado na zinariya, ya cire?’ Sa’an nan suka ba ni zinariya, sai na jefa cikin wuta, wannan ɗan maraƙi ya fito.”
२४तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुमच्याकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या.’ तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरू बाहेर आले.”
25 Musa ya duba ya ga mutane sun kauce gaba ɗaya domin Haruna ya sa suka kauce, har suka zama abin dariya ga abokan gābansu.
२५मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रूंनी पाहिला.
26 Saboda haka sai ya tsaya a ƙofar sansani ya ce, “Duk wanda yake na Ubangiji yă zo wurina.” Sai dukan Lawiyawa suka taru wurinsa.
२६तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे जमा झाले.
27 Sa’an nan ya ce musu, “Ga abin da Ubangiji, Allah na Isra’ila ya ce, ‘Kowane mutum yă rataya takobinsa, yă kai yă kawo daga wannan gefe zuwa wancan cikin sansani, kowa yă kashe ɗan’uwansa, da abokinsa, da kuma maƙwabcinsa.’”
२७मग मोशे त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर काय म्हणतो ते मी तुम्हास सांगतो, ‘प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकावावी आणि छावणीच्या या प्रवेशव्दारापासून त्या प्रवेशव्दारापर्यंत अवश्य जावे आणि प्रत्येक मनुष्याने आपला भाऊ, मित्र व शेजारी यांना अवश्य जिवे मारावे.”
28 Lawiyawa suka yi yadda Musa ya umarta, a ranar, mutane wajen dubu uku suka mutu.
२८लेवी वंशाच्या लोकांनी मोशेची आज्ञा पाळली आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार इस्राएल लोक मरण पावले.
29 Sa’an nan Musa ya ce, “An keɓe ku ga Ubangiji a yau, gama kun yi gāba da’ya’yanku da’yan’uwanku, ya kuma albarkace ku a wannan rana.”
२९मग मोशे म्हणाला, “आज आपणाला परमेश्वराकरता समर्पण करून प्रत्त्येक पुरुषाने आपल्या पुत्रावर व भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हास आशीर्वाद देईल.”
30 Kashegari Musa ya ce wa mutane, “Kun yi zunubi mai girma. Amma yanzu zan hau wurin Ubangiji; wataƙila zan iya yin kafara domin zunubinku.”
३०दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांस सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.”
31 Don haka Musa ya koma wurin Ubangiji ya ce, “Kaito, mutanen nan sun yi zunubi mai girma! Sun yi wa kansu allolin zinariya.
३१तेव्हा मोशे माघारी परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, “हाय, हाय या लोकांनी फार घोर पातक केले आहे. आपणासाठी सोन्याचे देव बनविले;
32 Amma yanzu, ina roƙonka ka gafarta zunubinsu, in ba haka ba, to, ka shafe ni daga littafin da ka rubuta.”
३२तरी आता तू त्यांच्या या पापांची क्षमा कर! परंतु जर तू त्यांच्या पापांची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.”
33 Ubangiji ya amsa wa Musa, “Duk wanda ya yi mini zunubi, shi zan shafe daga littafina.
३३परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “जे माझ्याविरूद्ध पाप करतात केवळ त्या लोकांचीच नावे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो.
34 Yanzu tafi, ka jagoranci mutanen zuwa inda na yi zance, mala’ikana kuma zai sha gabanku. Duk da haka sa’ad da lokaci ya yi da zan yi horo, zan hore su domin zunubinsu.”
३४तेव्हा तू आता खाली जा आणि मी सांगतो तेथे लोकांस घेऊन जा; माझा दूत तुझ्यापुढे चालेल व तुला मार्ग दाखवील. जेव्हा पाप केलेल्या लोकांस शिक्षा करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना शिक्षा केली जाईल.”
35 Ubangiji kuwa ya bugi mutanen da annoba, saboda abin da suka yi da ɗan maraƙin da Haruna ya yi.
३५अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले.

< Fitowa 32 >