< 1 Sarakuna 14 >
1 A lokacin Abiya, ɗan Yerobowam ya kamu da ciwo,
१याच सुमारास यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला.
2 sai Yerobowam ya ce wa matarsa, “Ki tafi, ki ɓad da kama, don kada a gane ke a matsayin matar Yerobowam. Ki je Shilo. Annabi Ahiya yana a can, wannan wanda ya ce mini zan zama sarki a bisa wannan mutane.
२तेव्हा यराबाम आपल्या पत्नीला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत.
3 Ki ɗauki dunƙulen burodi goma tare da ke, da waina, da tulun zuma, ki tafi wurinsa. Zai faɗa miki abin da zai faru da yaron.”
३यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला घेऊन पाठवले. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
4 Saboda haka matar Yerobowam ta yi abin da ya faɗa, ta kuma tafi gidan Ahiya a Shilo. Yanzu dai Ahiya ba ya gani; idanunsa sun tafi saboda tsufa.
४मग यराबामाने सांगितल्यावरून त्याची पत्नी शिलोला अहीया, या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्यास अंधत्वही आले होते.
5 Amma Ubangiji ya ce wa Ahiya, “Matar Yerobowam tana zuwa tă tambaye ka game da ɗanta, gama yana ciwo, za ka kuwa ba ta amsa kaza da kaza. Sa’ad da ta iso za tă yi kamar wata ce dabam.”
५पण परमेश्वराने त्यास सूचना केली, “यराबामाची पत्नी आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येत आहे. तिचा पुत्र फार आजारी आहे. मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्यास सांगितले. यराबामाची पत्नी अहीयाच्या घरी आली. लोकांस कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता.”
6 Saboda haka sa’ad da Ahiya ya ji motsin sawunta a ƙofa, sai ya ce, “Ki shigo, matar Yerobowam. Me ya sa kike yi kamar wata ce dabam? An aiko ni wurinki da labari marar daɗi.
६अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामाची पत्नी ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे.
7 Je ki faɗa wa Yerobowam cewa ga abin da Ubangiji, Allah na Isra’ila ya ce, ‘Na tā da kai daga cikin mutane, na mai da kai shugaba a bisa mutanena Isra’ila.
७परत जाशील तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामाला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलाच्या सर्व प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली.
8 Na yage mulki daga gidan Dawuda na ba da shi gare ka, amma ba ka zama kamar bawana Dawuda wanda ya kiyaye umarnaina ya kuma bi ni da dukan zuciyarsa, yana yin abin da yake daidai kaɗai a idanuna ba.
८यापूर्वी इस्राएलावर दाविदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन: पूर्वक मलाच अनुसरत असे. तो योग्य असलेल्या गोष्टी तो करीत असे.
9 Ka aikata mugunta fiye da dukan waɗanda suka rayu kafin kai. Ka yi wa kanka waɗansu alloli, gumakan da aka yi da ƙarfe; ka tsokane ni na yi fushi, ka kuma juye mini baya.
९पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे.
10 “‘Saboda wannan, zan kawo masifa a gidan Yerobowam. Zan yanke kowane ɗa na ƙarshe a Isra’ila, bawa ko’yantacce. Zan ƙone gidan Yerobowam kamar yadda mutum yakan ƙone juji, sai duk ya ƙone ƙurmus.
१०तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. मग तो इस्राएलात बंदीत असो की मोकळा जसे आगीत शेण काहीही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन.
11 Karnuka za su ci waɗanda suka mutu na Yerobowam a cikin birni, kuma tsuntsayen sararin sama za su cinye waɗanda suka mutu a jeji. Ni Ubangiji na faɗa!’
११यराबामाच्या घरातल्या ज्याला नगरात मरण येईल त्यास कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.
12 “Ke kuma, ki koma gida. Sa’ad da kika taka ƙafa a birninki, yaron zai mutu.
१२अहीया संदेष्टा यराबामाच्या पत्नीशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, आता तू घरी परत जा. तू नगरात शिरल्याबरोबर तुझा पुत्र मरणार आहे.
13 Dukan Isra’ila kuwa za su yi makoki dominsa. Shi ne kaɗai na Yerobowam wanda za a binne, domin shi ne kaɗai a gidan Yerobowam wanda Ubangiji, Allah na Isra’ila ya sami wani ɗan abu mai kyau a kansa.
१३सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याला रीतसर मुठमाती मिळेल असा, यराबामाच्या घराण्यातला हाच राहील. कारण फक्त त्याच्याठायीच इस्राएलचा देव परमेश्वर याला काहीसा चांगूलपणा दिसून आला आहे.
14 “Ubangiji zai tā da wani sarki wa kansa a bisa Isra’ila wanda zai hallaka iyalin Yerobowam. Ko yanzu ma, wannan zai fara faruwa.
१४परमेश्वर इस्राएलावर नवीन राजा नेमील. तो यराबामाच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लवकरच घडेल.
15 Ubangiji kuma zai bugi Isra’ila, har tă zama kamar kyauro mai girgiza a bakin rafi. Zai tumɓuke Isra’ila daga wannan ƙasa mai kyau da ya ba wa kakanninsu, yă watsar da su gaba da Kogin Yuferites domin sun tsokane Ubangiji har ya yi fushi, ta wurin yin ginshiƙan Ashera.
१५मग परमेश्वर इस्राएलाला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलाच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांस उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा मूर्ती त्यांनी उभारली याचा त्यास संताप आला.
16 Zai kuma ba da Isra’ila saboda zunuban da Yerobowam ya yi, da ya kuma sa Isra’ila suka yi.”
१६आधी यराबामाच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांस पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”
17 Sai matar Yerobowam ta tashi ta tafi, ta kuwa tafi Tirza. Nan da nan da ta taka madogarar ƙofar gidan, sai yaron ya mutu.
१७यराबामाची पत्नी तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा पुत्र मेला.
18 Suka binne shi, dukan Isra’ila kuwa suka yi makoki dominsa, yadda Ubangiji ya faɗa ta wurin bawansa annabi Ahiya.
१८सर्व इस्राएल लोकांस त्याच्या मृत्यूचे दु: ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.
19 Sauran ayyukan sarautar Yerobowam, da yaƙe-yaƙensa, da yadda ya yi mulki, ba a rubuce suke a littafin tarihi na sarakunan Isra’ila ba?
१९राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या; लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.
20 Ya yi mulki shekaru ashirin da biyu, sai ya huta tare da kakanninsa. Sai Nadab ɗansa ya gāje shi a matsayin sarki.
२०यराबाम बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र नादाब त्यानंतर सत्तेवर आला.
21 Rehobowam ɗan Solomon ya zama sarki a Yahuda. Yana da shekara arba’in da ɗaya sa’ad da ya zama sarki, ya kuma yi mulki shekaru goma sha bakwai a Urushalima, birnin da Ubangiji ya zaɓa daga cikin dukan kabilan Isra’ila don yă sa Sunansa. Sunan mahaifiyarsa Na’ama, ita mutuniyar Ammon ce.
२१शलमोनाचा पुत्र रहबाम यहूदाचा राजा झाला, तेव्हा तो एक्केचाळीस वर्षाचा होता. यरूशलेमेमध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत: च्या सन्मानासाठी सर्व वंशातून या नगराची निवड केली होती. इस्राएलातील इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा, ती अम्मोनी होती.
22 Yahuda ya aikata mugunta a gaban Ubangiji. Ta wurin zunuban da suka yi, sun tā da fushin kishinsa fiye da yadda kakanninsu suka yi.
२२यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले याप्रकारे परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराचा कोप होईल, अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती.
23 Sun kuma kafa wa kansu masujadai da suke kan tuddai, da a kan keɓaɓɓun duwatsu, suka kuma gina ginshiƙan Ashera a kowane tudu, da kuma a ƙarƙashin kowane duhuwar itace.
२३या लोकांनी उंचवटयांवर देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. परकीय दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी हे केले व अशेरा मूर्ती स्थापिल्या.
24 Har ma akwai maza karuwai na masujada. Mutane suka sa kansu ga yin kowane abin ƙyama na al’umman da Ubangiji ya kora kafin Isra’ilawa.
२४परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही पुरुष वेश्या त्या देशात होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापूर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलाच्या लोकांस दिला होता.
25 A shekara ta biyar ta Sarki Rehobowam, Shishak sarkin Masar ya kai wa Urushalima yaƙi.
२५रहबामाच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरूशलेमेवर स्वारी केली.
26 Ya kwashe dukiyar haikalin Ubangiji da kuma dukiyar fadan sarki. Ya ɗauki kome, har da dukan garkuwoyi na zinariya da Solomon ya yi.
२६त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामाचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून ज्या शलमोनाने सोन्याच्या ढाली आणल्या होत्या, त्याही त्याने पळवल्या. दाविदाने त्या यरूशलेमेमध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली त्याने नेल्या.
27 Saboda haka sarki Rehobowam ya yi garkuwoyin tagulla ya mayar da su. Ya kuma naɗa waɗannan shugabannin matsara ya sa su aiki a ƙofar zuwa fadan sarki.
२७मग रहबाम राजाने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या.
28 Duk sa’ad da sarki ya tafi wurin haikalin Ubangiji, matsara sukan riƙe garkuwoyinsu, daga baya kuma sai su mai da su ɗakin tsaro.
२८राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.
29 Game da sauran ayyukan mulkin Rehobowam kuwa, da kuma dukan abin da ya yi, duk a rubuce suke a cikin littafin tarihin sarakunan Yahuda.
२९यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामाच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.
30 Aka ci gaba da yaƙe-yaƙe tsakanin Rehobowam da Yerobowam.
३०रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.
31 Sai Rehobowam ya huta da kakanninsa, aka kuma binne shi tare da su a Birnin Dawuda. Sunan mahaifiyarsa Na’ama, ita kuwa mutuniyar Ammon ce. Sai Abiyam ɗansa ya gāje shi a matsayin sarki.
३१रहबाम मेला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्यास पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामाचा पुत्र अबीयाम नंतर राज्यावर आला.