< Jòb 19 >
१नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 Pou konbyen de tan, nou va toumante m, e kraze mwen avèk pawòl yo?
२“तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात?
3 Dis fwa sa yo nou te ensilte m; nou pa menm wont fè m tò.
३तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे. तुम्ही कठोरतेने माझ्याबरोबर वागता त्याची लाजही बाळगत नाही
4 Menm si m fè erè, erè sa repoze anndan m.
४जर खरच मी काही चुक केली असेल तर, ती चुक माझी मला आहे.
5 Si anverite nou vin ògeye kont mwen, e fè m wè prèv a gwo wont mwen,
५तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे, माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता.
6 alò, konnen byen ke Bondye te fè m tò, e te fèmen pèlen Li an antoure mwen.
६मग तुम्हास हे माहीती पाहिजे कि, देवानेच मला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे.
7 “Gade byen, mwen kriye: ‘Vyolans!’ Men nanpwen repons. Mwen rele sekou! Men nanpwen jistis.
७‘पाहा, असे मी ओरडतो कि मी चुकीचे केले आहे, पण कोणी ऐकले नाही. मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्याय मिळत नाही.
8 Li te bare chemen mwen pou m pa kab pase, e Li te mete fènwa sou pa m yo.
८मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे.
9 Li te retire lonè sou mwen e te retire kouwòn nan sou tèt mwen.
९देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. आणि त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला.
10 Li kraze desann mwen tout kote e mwen fin disparèt; Li te dechouke espwa m kon yon pyebwa.
१०माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत.
11 Anplis, Li te limen lakòlè Li kont mwen e te konsidere m kon lènmi Li.
११त्याचा क्रोध मला जाळीत आहे, तो मला त्याचा एक शत्रू असे संबोधतो.
12 Lame Li a vin rasanble pou bati chemen pa yo kont mwen. Yo fè kan kap antoure tant mwen an.
१२त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात, आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.
13 “Li te retire frè m yo byen lwen mwen e sila mwen te konnen yo vin separe de mwen nèt.
१३त्याने माझ्या भावांना माझ्यापासुन फार दूर केले आहे, माझ्या सर्वांना दूर ठेवण्याचा अनुभव त्याने मला दिला आहे.
14 Fanmi mwen yo vin fè fayit e pi pwòch zami m yo te bliye m.
१४माझे नातलग मला सोडून गेले आहेत, माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत.
15 Sila ki rete lakay mwen yo ak sèvant mwen yo konsidere m kon yon etranje. Mwen se yon etranje menm nan zye yo.
१५माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात, मी त्यांच्या दृष्टीने उपरा झालो आहे.
16 Mwen rele sèvitè mwen an, men li pa reponn; mwen oblije sipliye l ak bouch mwen.
१६जरी मी माझ्या मुखाने याचना केली, माझ्या नोकराला बोलावले, तरी तो मला उत्तर देत नाही,
17 Menm souf mwen fè bay ofans a madanm mwen, e mwen vin abominab a pwòp frè m.
१७माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते, माझे स्वतःचे भाऊ आणि बहिणी माझा तिरस्कार करतात.
18 Timoun yo meprize mwen. Mwen leve e yo pale kont mwen.
१८लहान मुलेदेखील मला चिडवतात, जेव्हा मी बोलायला जातो तेव्हा ते माझ्या विरूद्ध बोलतात.
19 Tout asosye m yo etone ak krent devan m. Sila ke m byen renmen yo te vire kont mwen.
१९माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात. माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुध्द गेले आहेत.
20 Zo m yo kole sou po m ak chè m; se sèl pa po dan m ke m chape lanmò.
२०मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते, मी केवळ दाताच्या कातडीने बचावलो आहे.
21 “Gen pitye pou mwen, gen pitye, O nou menm ki zanmi mwen yo, paske men Bondye vin frape mwen.
२१माझी दया येऊ द्या, मित्रांनो, तुम्हास माझी दया येऊ द्या! कारण देवाचा हात मजवर पडला आहे.
22 Poukisa n ap pèsekite mwen menm tankou Bondye e pa satisfè ak chè mwen.
२२तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात. माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का?
23 O ke pawòl mwen yo te ekri! O ke yo te enskri nan yon liv!
२३अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे! अहो, ते पुस्तकात नमुद करून ठेवायला हवेत.
24 Ke avèk pwent plim ak plon, yo te grave sou wòch la jis pou tout tan!
२४अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे.
25 Men pou mwen, mwen konnen ke Redanmtè mwen an vivan. Epi apre tout sa a, li va vin kanpe sou latè.
२५माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील.
26 Menm lè po m fin detwi, malgre chè m fin sòti, mwen va wè Bondye nan chè a;
२६मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन.
27 ke mwen, mwen menm va wè, ke zye m va wè, e se pa kon yon etranje. “Kè m vin fèb anndan m.
२७मी देवाला बघेन, तर मी स्वत: च त्यास पाहीन, माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही. माझा अतंरात्मा झुरत आहे.
28 Si nou di: ‘Men kijan nou va pèsekite li!’ pwiska rasin ka sa a se nan mwen,’
२८या सगळ्याचे मूळ माझ्याकडेच आढळून आले आहे, म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल.
29 fè lakrent nepe a pou kont nou, paske lakòlè Bondye mennen pinisyon nepe a. Fòk nou kab konnen, gen jijman.”
२९तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी, कारण रागामुळे तलवारीने शासन होते, यावरुन तुम्हास कळेल की न्याय आहे.”