< Ἰησοῦς Nαυῆ 20 >
1 καὶ ἐλάλησεν κύριος τῷ Ἰησοῖ λέγων
१मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
2 λάλησον τοῖς υἱοῖς Ισραηλ λέγων δότε τὰς πόλεις τῶν φυγαδευτηρίων ἃς εἶπα πρὸς ὑμᾶς διὰ Μωυσῆ
२“तू इस्राएल लोकांस सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला ज्या आश्रयस्थानाविषयी सांगितले होते ती नगरे तुम्ही आपल्यासाठी ठरवा;
3 φυγαδευτήριον τῷ φονευτῇ τῷ πατάξαντι ψυχὴν ἀκουσίως καὶ ἔσονται ὑμῖν αἱ πόλεις φυγαδευτήριον καὶ οὐκ ἀποθανεῖται ὁ φονευτὴς ὑπὸ τοῦ ἀγχιστεύοντος τὸ αἷμα ἕως ἂν καταστῇ ἐναντίον τῆς συναγωγῆς εἰς κρίσιν
३म्हणजे जो चुकून, नकळत कोणा मनुष्यास जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यामध्ये पळून जावे; याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून आश्रयस्थाने अशी होतील.
४आणि त्याने त्यातल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेशीच्या दाराशी उभे राहून आपले प्रकरण त्या नगराच्या वडिलांना सांगावे; मग त्यांनी त्यास आपल्या नगरात घेऊन त्यास ठिकाण नेमून द्यावे, आणि त्याने त्यांच्यामध्ये रहावे.
५आणि जो रक्ताचा सूड घेण्याऱ्याने, त्याचा पाठलाग केला, तरी त्या नगराच्या लोकांनी मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या स्वाधीन करू नये; कारण की त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याला मारले, त्याचे त्याच्याशी पूर्वीपासूनचे वैर नव्हते.
६मंडळीसमोर न्याय होईपर्यंत किंवा जो मुख्य याजक त्या दिवसात असेल त्याच्या मरणापर्यंत त्या नगरात त्याने रहावे; नंतर त्या हत्या करणाऱ्याने आपल्या नगरात म्हणजे ज्या नगरातून तो पळाला त्यामध्ये आपल्या घरी माघारी जावे.”
7 καὶ διέστειλεν τὴν Καδης ἐν τῇ Γαλιλαίᾳ ἐν τῷ ὄρει τῷ Νεφθαλι καὶ Συχεμ ἐν τῷ ὄρει τῷ Εφραιμ καὶ τὴν πόλιν Αρβοκ αὕτη ἐστὶν Χεβρων ἐν τῷ ὄρει τῷ Ιουδα
७यास्तव त्यांनी गालीलात नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, ही वेगळी करून ठेवली.
8 καὶ ἐν τῷ πέραν τοῦ Ιορδάνου ἔδωκεν Βοσορ ἐν τῇ ἐρήμῳ ἐν τῷ πεδίῳ ἀπὸ τῆς φυλῆς Ρουβην καὶ Αρημωθ ἐν τῇ Γαλααδ ἐκ τῆς φυλῆς Γαδ καὶ τὴν Γαυλων ἐν τῇ Βασανίτιδι ἐκ τῆς φυλῆς Μανασση
८पूर्वेस यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे रानातल्या सपाटीवर रऊबेनाच्या वंशांतले बेजेर, आणि गिलादात गाद वंशातले रामोथ, आणि बाशानात मनश्शेच्या वंशातले गोलान ही नगरे वेगळी करून ठेवली.
9 αὗται αἱ πόλεις αἱ ἐπίκλητοι τοῖς υἱοῖς Ισραηλ καὶ τῷ προσηλύτῳ τῷ προσκειμένῳ ἐν αὐτοῖς καταφυγεῖν ἐκεῖ παντὶ παίοντι ψυχὴν ἀκουσίως ἵνα μὴ ἀποθάνῃ ἐν χειρὶ τοῦ ἀγχιστεύοντος τὸ αἷμα ἕως ἂν καταστῇ ἔναντι τῆς συναγωγῆς εἰς κρίσιν
९ही नगरे इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी, आणि त्यामध्ये राहणारा जो परदेशी त्यांच्यासाठी अशी नेमलेली होती की जो कोणी चुकून मनुष्यास मारतो, त्याने त्यामध्ये पळून जावे, आणि तो सभेपुढे उभा राहीपर्यंत त्याने रक्ताचा सूड घेणाऱ्याच्या हातून मरू नये.