< Ἰησοῦς Nαυῆ 17 >

1 καὶ ἐγένετο τὰ ὅρια φυλῆς υἱῶν Μανασση ὅτι οὗτος πρωτότοκος τῷ Ιωσηφ τῷ Μαχιρ πρωτοτόκῳ Μανασση πατρὶ Γαλααδ ἀνὴρ γὰρ πολεμιστὴς ἦν ἐν τῇ Γαλααδίτιδι καὶ ἐν τῇ Βασανίτιδι
मनश्शेच्या वंशजाला हे वतन नेमून दिलेले होते. कारण मनश्शे योसेफाचा प्रथम पुत्र, याच्या वंशाचा भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, म्हणजे मनश्शेचा प्रथम पुत्र माखीर, गिलादाचा बाप हा तर मोठा शूर होता, आणि त्यास गिलाद व बाशान हा भाग मिळाला होता.
2 καὶ ἐγενήθη τοῖς υἱοῖς Μανασση τοῖς λοιποῖς κατὰ δήμους αὐτῶν τοῖς υἱοῖς Ιεζερ καὶ τοῖς υἱοῖς Κελεζ καὶ τοῖς υἱοῖς Ιεζιηλ καὶ τοῖς υἱοῖς Συχεμ καὶ τοῖς υἱοῖς Συμαριμ καὶ τοῖς υἱοῖς Οφερ οὗτοι οἱ ἄρσενες κατὰ δήμους αὐτῶν
मनश्शेच्या राहिलेल्या वंशजांनाही त्यांच्या कुळांप्रमाणे विभाग मिळाले ते असे, अबीयेजेर व हेलेक व अस्रियेल व शेखेम व हेफेर व शमीदा हे आपआपल्या कुळांप्रमाणे योसेफ पुत्र जो मनश्शे त्याच्या वंशातले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे विभाग ठरले;
3 καὶ τῷ Σαλπααδ υἱῷ Οφερ οὐκ ἦσαν αὐτῷ υἱοὶ ἀλλ’ ἢ θυγατέρες καὶ ταῦτα τὰ ὀνόματα τῶν θυγατέρων Σαλπααδ Μααλα καὶ Νουα καὶ Εγλα καὶ Μελχα καὶ Θερσα
मनश्शेचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलाद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद, याला मुलगा नव्हता, परंतु मुली होत्या; आणि त्याच्या मुलींची नावे ही आहेत: महला व नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
4 καὶ ἔστησαν ἐναντίον Ελεαζαρ τοῦ ἱερέως καὶ ἐναντίον Ἰησοῦ καὶ ἐναντίον τῶν ἀρχόντων λέγουσαι ὁ θεὸς ἐνετείλατο διὰ χειρὸς Μωυσῆ δοῦναι ἡμῖν κληρονομίαν ἐν μέσῳ τῶν ἀδελφῶν ἡμῶν καὶ ἐδόθη αὐταῖς διὰ προστάγματος κυρίου κλῆρος ἐν τοῖς ἀδελφοῖς τοῦ πατρὸς αὐτῶν
आणि एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व अधिकारी यांच्यापुढे त्या येऊन त्या म्हणाल्या, “परमेश्वराने मोशेला अशी आज्ञा दिली की आम्हांला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन द्यावे.” यास्तव त्याने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यांना त्यांच्या वडिलाच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले.
5 καὶ ἔπεσεν ὁ σχοινισμὸς αὐτῶν ἀπὸ Ανασσα καὶ πεδίον Λαβεκ ἐκ τῆς Γαλααδ ἥ ἐστιν πέραν τοῦ Ιορδάνου
आणि यार्देनेच्या पश्चिमेकडे गिलाद व बाशान या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले.
6 ὅτι θυγατέρες υἱῶν Μανασση ἐκληρονόμησαν κλῆρον ἐν μέσῳ τῶν ἀδελφῶν αὐτῶν ἡ δὲ γῆ Γαλααδ ἐγενήθη τοῖς υἱοῖς Μανασση τοῖς καταλελειμμένοις
कारण की मनश्शेच्या मुलींना त्याच्या मुलांमध्ये वतन मिळाले, आणि मनश्शेच्या इतर वंशजांना गिलाद प्रांत मिळाला.
7 καὶ ἐγενήθη ὅρια υἱῶν Μανασση Δηλαναθ ἥ ἐστιν κατὰ πρόσωπον υἱῶν Αναθ καὶ πορεύεται ἐπὶ τὰ ὅρια ἐπὶ Ιαμιν καὶ Ιασσιβ ἐπὶ πηγὴν Θαφθωθ
आणि मनश्शेची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या मिखमथाथा नगरापर्यंत झाली, आणि ती सीमा एन-तप्पूहाच्या लोकवस्तीच्या उजव्या भागापर्यंत पोहचते.
8 τῷ Μανασση ἔσται καὶ Θαφεθ ἐπὶ τῶν ὁρίων Μανασση τοῖς υἱοῖς Εφραιμ
तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते.
9 καὶ καταβήσεται τὰ ὅρια ἐπὶ φάραγγα Καρανα ἐπὶ λίβα κατὰ φάραγγα Ιαριηλ τερέμινθος τῷ Εφραιμ ἀνὰ μέσον πόλεως Μανασση καὶ ὅρια Μανασση ἐπὶ τὸν βορρᾶν εἰς τὸν χειμάρρουν καὶ ἔσται αὐτοῦ ἡ διέξοδος θάλασσα
आणि सीमा काना ओढ्यावरून, ओढ्याच्या दक्षिणेस गेली; ही नगरे एफ्राइमाची होती, ती मनश्शेच्या नगरांमध्ये होती; आणि मनश्शेची सीमा ओढ्याच्या उत्तरेस होती, आणि तिचा शेवट भूमध्य समुद्राजवळ होता.
10 ἀπὸ λιβὸς τῷ Εφραιμ καὶ ἐπὶ βορρᾶν Μανασση καὶ ἔσται ἡ θάλασσα ὅρια αὐτοῖς καὶ ἐπὶ Ασηρ συνάψουσιν ἐπὶ βορρᾶν καὶ τῷ Ισσαχαρ ἀπ’ ἀνατολῶν
१०दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनश्शेचा, आणि समुद्र त्याची सीमा होता, आणि उत्तरेस आशेरात व पूर्वेस इस्साखारात ते एकत्र झाले.
11 καὶ ἔσται Μανασση ἐν Ισσαχαρ καὶ ἐν Ασηρ Βαιθσαν καὶ αἱ κῶμαι αὐτῶν καὶ τοὺς κατοικοῦντας Δωρ καὶ τὰς κώμας αὐτῆς καὶ τοὺς κατοικοῦντας Μαγεδδω καὶ τὰς κώμας αὐτῆς καὶ τὸ τρίτον τῆς Ναφετα καὶ τὰς κώμας αὐτῆς
११आणि इस्साखारात व आशेरात बेथ-शान व त्याची खेडी, आणि इब्लाम व त्याची खेडी, आणि दोर व त्याची खेडी यामध्ये राहणारे, आणि एन-दोर व त्यांची खेडी यामध्ये राहणारे, आणि तानख व त्यांची खेडी यांत राहणारे, आणि मगिद्दो व त्यांची खेडी यांत राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले.
12 καὶ οὐκ ἠδυνάσθησαν οἱ υἱοὶ Μανασση ἐξολεθρεῦσαι τὰς πόλεις ταύτας καὶ ἤρχετο ὁ Χαναναῖος κατοικεῖν ἐν τῇ γῇ ταύτῃ
१२पण या नगरातील रहिवाश्यांना मनश्शेचे वंशज बाहेर घालवायला समर्थ नव्हते; या देशातच राहण्याचा कनान्यांनी तर हट्ट धरला.
13 καὶ ἐγενήθη καὶ ἐπεὶ κατίσχυσαν οἱ υἱοὶ Ισραηλ καὶ ἐποίησαν τοὺς Χαναναίους ὑπηκόους ἐξολεθρεῦσαι δὲ αὐτοὺς οὐκ ἐξωλέθρευσαν
१३तरी असे झाले की जेव्हा इस्राएल लोक बळकट झाले, तेव्हा त्यांनी कनान्यांना नेमलेले काम करायला लावले आणि त्यांना अगदीच घालवून दिले नाही.
14 ἀντεῖπαν δὲ οἱ υἱοὶ Ιωσηφ τῷ Ἰησοῦ λέγοντες διὰ τί ἐκληρονόμησας ἡμᾶς κλῆρον ἕνα καὶ σχοίνισμα ἕν ἐγὼ δὲ λαὸς πολύς εἰμι καὶ ὁ θεὸς εὐλόγησέν με
१४तेव्हा योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले की, “परमेश्वराने मला येथपर्यंत आशीर्वाद दिला आहे आम्ही संख्येने बहुत झालो आहो तर तू चिठ्ठी टाकून आम्हांला वतनाचा एकच विभाग का दिला आहेस?”
15 καὶ εἶπεν αὐτοῖς Ἰησοῦς εἰ λαὸς πολὺς εἶ ἀνάβηθι εἰς τὸν δρυμὸν καὶ ἐκκάθαρον σεαυτῷ εἰ στενοχωρεῖ σε τὸ ὄρος τὸ Εφραιμ
१५तेव्हा यहोशवाने त्यांना म्हटले, “जर तुम्ही संख्येने बहुत आहात व लोक आणखी एफ्राइम डोंगराळ प्रदेश तुम्हाला पुरत नाहीतर परिज्जी व रेफाई यांच्या देशांतले रान तोडून तेथे वस्ती करा.”
16 καὶ εἶπαν οὐκ ἀρκέσει ἡμῖν τὸ ὄρος τὸ Εφραιμ καὶ ἵππος ἐπίλεκτος καὶ σίδηρος τῷ Χαναναίῳ τῷ κατοικοῦντι ἐν αὐτῷ ἐν Βαιθσαν καὶ ἐν ταῖς κώμαις αὐτῆς ἐν τῇ κοιλάδι Ιεζραελ
१६नंतर योसेफाच्या वंशजांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; आणि जे कनानी तळप्रांतात राहतात, त्या सर्वांना लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथ-शान व तिजकडली खेडी यांतले, आणि इज्रेल खोरे जे, त्यामध्ये आहेत.”
17 καὶ εἶπεν Ἰησοῦς τοῖς υἱοῖς Ιωσηφ εἰ λαὸς πολὺς εἶ καὶ ἰσχὺν μεγάλην ἔχεις οὐκ ἔσται σοι κλῆρος εἷς
१७तेव्हा यहोशवाने योसेफाच्या घराण्यास, म्हणजे एफ्राइम व मनश्शे यांना असे म्हटले की, “तुम्ही संख्येने फार आहात, व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे; तुम्हाला एकच वाटा नसावा;
18 ὁ γὰρ δρυμὸς ἔσται σοι ὅτι δρυμός ἐστιν καὶ ἐκκαθαριεῖς αὐτὸν καὶ ἔσται σοι καὶ ὅταν ἐξολεθρεύσῃς τὸν Χαναναῖον ὅτι ἵππος ἐπίλεκτός ἐστιν αὐτῷ σὺ γὰρ ὑπερισχύεις αὐτοῦ
१८तेव्हा डोंगराळ प्रदेशही तुझा होईल; तो अरण्य आहे तरी तू ते तोडशील; बाहेरील भागही तुझे होतील, कारण कनान्यांना जरी लोखंडी रथ आहेत आणि ते बळकट आहेत तरी तू त्यांना घालवशील.”

< Ἰησοῦς Nαυῆ 17 >