< Ἱερεμίας 20 >
1 καὶ ἤκουσεν Πασχωρ υἱὸς Εμμηρ ὁ ἱερεύς καὶ οὗτος ἦν καθεσταμένος ἡγούμενος οἴκου κυρίου τοῦ Ιερεμιου προφητεύοντος τοὺς λόγους τούτους
१इम्मेराचा मुलगा पशहूर याजक, जो परमेश्वराच्या मंदिरातील तो मुख्य अधिकारी होता. त्याने यिर्मयाने परमेश्वराच्या मंदिरात केलेले भविष्य सांगताना ऐकले,
2 καὶ ἐπάταξεν αὐτὸν καὶ ἐνέβαλεν αὐτὸν εἰς τὸν καταρράκτην ὃς ἦν ἐν πύλῃ οἴκου ἀποτεταγμένου τοῦ ὑπερῴου ὃς ἦν ἐν οἴκῳ κυρίου
२म्हणून पशहूराने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व परमेश्वराच्या मंदिरात, बन्यामीनच्या वरच्या प्रवेशद्वाराच्या खोड्यात त्यास घातले.
3 καὶ ἐξήγαγεν Πασχωρ τὸν Ιερεμιαν ἐκ τοῦ καταρράκτου καὶ εἶπεν αὐτῷ Ιερεμιας οὐχὶ Πασχωρ ἐκάλεσεν κύριος τὸ ὄνομά σου ἀλλ’ ἢ μέτοικον
३दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर मागोर मिस्साबीब (प्रत्येक बाजूला भय) असे आहे.
4 διότι τάδε λέγει κύριος ἰδοὺ ἐγὼ δίδωμί σε εἰς μετοικίαν σὺν πᾶσι τοῖς φίλοις σου καὶ πεσοῦνται ἐν μαχαίρᾳ ἐχθρῶν αὐτῶν καὶ οἱ ὀφθαλμοί σου ὄψονται καὶ σὲ καὶ πάντα Ιουδαν δώσω εἰς χεῖρας βασιλέως Βαβυλῶνος καὶ μετοικιοῦσιν αὐτοὺς καὶ κατακόψουσιν αὐτοὺς ἐν μαχαίραις
४कारण परमेश्वर असे बोलला आहे, तू आपणाला व आपल्या सर्व जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना भय असा होशील, कारण तुझ्या त्यांना तू आपल्या डोळ्यांसमोर शत्रूंच्या तलवारीने पडताना पाहशील. मी सर्व यहूदाला बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो त्यांना बाबेल देशात घेऊन जाईल आणि त्यांना तलवारीने कापून काढील.
5 καὶ δώσω τὴν πᾶσαν ἰσχὺν τῆς πόλεως ταύτης καὶ πάντας τοὺς πόνους αὐτῆς καὶ πάντας τοὺς θησαυροὺς τοῦ βασιλέως Ιουδα εἰς χεῖρας ἐχθρῶν αὐτοῦ καὶ ἄξουσιν αὐτοὺς εἰς Βαβυλῶνα
५मी त्यांना या नगराचे सर्व धन व त्याची सर्व मिळकत व त्याचे सर्व द्रव्ये देईन, म्हणजे यहूदाच्या राजांची सर्व द्रव्ये मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन. आणि ते ती लूटतील आणि ती घेऊन बाबेलास जातील.
6 καὶ σὺ καὶ πάντες οἱ κατοικοῦντες ἐν τῷ οἴκῳ σου πορεύσεσθε ἐν αἰχμαλωσίᾳ καὶ ἐν Βαβυλῶνι ἀποθανῇ καὶ ἐκεῖ ταφήσῃ σὺ καὶ πάντες οἱ φίλοι σου οἷς ἐπροφήτευσας αὐτοῖς ψευδῆ
६पण पशहूर तू आणि तुझ्या घरातील सर्व लोकांस कैद करून नेतील, आणि तू बाबेलास जाऊन मरशील, आणि तेथे तुला व तुझ्यावर प्रेम करणारे ज्यांना तू खोटे भविष्य सांगितले त्यांनाही पुरतील.”
7 ἠπάτησάς με κύριε καὶ ἠπατήθην ἐκράτησας καὶ ἠδυνάσθης ἐγενόμην εἰς γέλωτα πᾶσαν ἡμέραν διετέλεσα μυκτηριζόμενος
७परमेश्वरा, तू मला वळवले आणि मी खरच वळलो, तू माझ्यापेक्षा सामर्थी असल्याने तू जिंकलास मी हास्याचे कारण ठरलो आहे. माझा प्रत्येक दिवस चेष्टेने भरलेला असतो.
8 ὅτι πικρῷ λόγῳ μου γελάσομαι ἀθεσίαν καὶ ταλαιπωρίαν ἐπικαλέσομαι ὅτι ἐγενήθη λόγος κυρίου εἰς ὀνειδισμὸν ἐμοὶ καὶ εἰς χλευασμὸν πᾶσαν ἡμέραν μου
८कारण जेव्हा मी बोललो, तेव्हा मी ओरडलो, मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो. कारण परमेश्वराचे वचन सारा दिवस माझ्यासाठी निंदा व उपहास असे करण्यात आले आहे.
9 καὶ εἶπα οὐ μὴ ὀνομάσω τὸ ὄνομα κυρίου καὶ οὐ μὴ λαλήσω ἔτι ἐπὶ τῷ ὀνόματι αὐτοῦ καὶ ἐγένετο ὡς πῦρ καιόμενον φλέγον ἐν τοῖς ὀστέοις μου καὶ παρεῖμαι πάντοθεν καὶ οὐ δύναμαι φέρειν
९जर मी असे बोललो, मी परमेश्वराबद्दल आता ह्यापुढे विचार करणार नाही, मी त्याचे नाव ह्यापुढे घोषीत करणार नाही. पण त्याचे वचन माझ्या हृदयात, माझ्या हाडांत आग असल्यासारखे होते. म्हणून मी ते समाविष्ट करण्यास संघर्ष करतो परंतु मी त्यामध्ये सक्षम होत नाही.
10 ὅτι ἤκουσα ψόγον πολλῶν συναθροιζομένων κυκλόθεν ἐπισύστητε καὶ ἐπισυστῶμεν αὐτῷ πάντες ἄνδρες φίλοι αὐτοῦ τηρήσατε τὴν ἐπίνοιαν αὐτοῦ εἰ ἀπατηθήσεται καὶ δυνησόμεθα αὐτῷ καὶ λημψόμεθα τὴν ἐκδίκησιν ἡμῶν ἐξ αὐτοῦ
१०मी बऱ्याच लोकांकडून दहशतवादी अफवा ऐकल्या आहेत. तक्रार, आम्ही तक्रार करणे आवश्यक आहे माझ्या जवळ असणारा प्रत्येकजन, मला पाडण्यास टपला आहे, कदाचित त्यास फसवले जाऊ शकते. तेव्हा आपण त्यास पराभूत करु आणि त्याचा सूड घेऊ.
11 καὶ κύριος μετ’ ἐμοῦ καθὼς μαχητὴς ἰσχύων διὰ τοῦτο ἐδίωξαν καὶ νοῆσαι οὐκ ἠδύναντο ᾐσχύνθησαν σφόδρα ὅτι οὐκ ἐνόησαν ἀτιμίας αὐτῶν αἳ δῑ αἰῶνος οὐκ ἐπιλησθήσονται
११पण परमेश्वर माझ्यासोबत बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून जे माझा पाठलाग करणारे ते पडतील. ते मला पराभूत करणार नाहीत. ते अतिशय लाजवले जातील, कारण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. कधी न विसरली जाणारी अशी त्यांची सर्वकाळीक अप्रतिष्ठा होईल.
12 κύριε δοκιμάζων δίκαια συνίων νεφροὺς καὶ καρδίας ἴδοιμι τὴν παρὰ σοῦ ἐκδίκησιν ἐν αὐτοῖς ὅτι πρὸς σὲ ἀπεκάλυψα τὰ ἀπολογήματά μου
१२पण तू सेनाधीश परमेश्वर, जो धार्मिकांची पारख करणाऱ्या, अंतर्याम व हृदय पाहणाऱ्या, तर मग आता त्यांच्यावर तुझा सुड उगवताना मला पाहू दे, कारण तुझ्या समोर मी आपला वाद प्रकट केला आहे.
13 ᾄσατε τῷ κυρίῳ αἰνέσατε αὐτῷ ὅτι ἐξείλατο ψυχὴν πένητος ἐκ χειρὸς πονηρευομένων
१३परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा. कारण त्याने खिन्न झालेल्या व्यक्तीचा जीव दुष्टांच्या हातातून सोडवला आहे.
14 ἐπικατάρατος ἡ ἡμέρα ἐν ᾗ ἐτέχθην ἐν αὐτῇ ἡ ἡμέρα ἐν ᾗ ἔτεκέν με ἡ μήτηρ μου μὴ ἔστω ἐπευκτή
१४मी जन्मलो तो दिवस शापित असो. ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्म घेतला, तो दिवस आशीर्वादीत न होवो.
15 ἐπικατάρατος ὁ ἄνθρωπος ὁ εὐαγγελισάμενος τῷ πατρί μου λέγων ἐτέχθη σοι ἄρσεν εὐφραινόμενος
१५तुम्हास मुलगा झाला, असे बोलून माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलांना देऊन त्यांना आनंदी करणारा मनुष्य शापित असो,
16 ἔστω ὁ ἄνθρωπος ἐκεῖνος ὡς αἱ πόλεις ἃς κατέστρεψεν κύριος ἐν θυμῷ καὶ οὐ μετεμελήθη ἀκουσάτω κραυγῆς τὸ πρωὶ καὶ ἀλαλαγμοῦ μεσημβρίας
१६परमेश्वराने दया न दाखवता नाश केलेल्या शहरांसारखा तो मनुष्य होवो. तो सकाळी मदतीचा शब्द आणि दुपारी युद्धाची गदारोळ ऐको.
17 ὅτι οὐκ ἀπέκτεινέν με ἐν μήτρᾳ μητρὸς καὶ ἐγένετό μοι ἡ μήτηρ μου τάφος μου καὶ ἡ μήτρα συλλήμψεως αἰωνίας
१७कारण त्याने मला उदरातच मारुन टाकले नाही, कारण अशाने माझी आई माझी कबर झाली असती व तिचे गर्भस्थान सगर्भ राहीले असते.
18 ἵνα τί τοῦτο ἐξῆλθον ἐκ μήτρας τοῦ βλέπειν κόπους καὶ πόνους καὶ διετέλεσαν ἐν αἰσχύνῃ αἱ ἡμέραι μου
१८मी फक्त क्लेश व दु: ख पाहिले आणि जीवन नामुष्की याकरीताच गर्भस्थानातून बाहेर का निघालो?