< Ἰεζεκιήλ 39 >
1 καὶ σύ υἱὲ ἀνθρώπου προφήτευσον ἐπὶ Γωγ καὶ εἰπόν τάδε λέγει κύριος ἰδοὺ ἐγὼ ἐπὶ σὲ Γωγ ἄρχοντα Ρως Μοσοχ καὶ Θοβελ
१आता “मानवाच्या मुला, तू गोगच्याविरूद्ध भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, पाहा! मी गोग, मेशेख आणि तुबाल यांचा अधिपती यांच्याविरूद्ध आहे.
2 καὶ συνάξω σε καὶ καθοδηγήσω σε καὶ ἀναβιβῶ σε ἀπ’ ἐσχάτου τοῦ βορρᾶ καὶ ἀνάξω σε ἐπὶ τὰ ὄρη τοῦ Ισραηλ
२मी तुला वळविन आणि मी तुला पुढे नेईन; अति उत्तरेकडून मी तुला परत आणीन आणि इस्राएलाच्या पर्वतांशी आणीन.
3 καὶ ἀπολῶ τὸ τόξον σου ἀπὸ τῆς χειρός σου τῆς ἀριστερᾶς καὶ τὰ τοξεύματά σου ἀπὸ τῆς χειρός σου τῆς δεξιᾶς καὶ καταβαλῶ σε
३मग मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य उडवून देईन; व तुझ्या उजव्या हातातील बाण खाली पाडीन.
4 ἐπὶ τὰ ὄρη Ισραηλ καὶ πεσῇ σὺ καὶ πάντες οἱ περὶ σέ καὶ τὰ ἔθνη τὰ μετὰ σοῦ δοθήσονται εἰς πλήθη ὀρνέων παντὶ πετεινῷ καὶ πᾶσι τοῖς θηρίοις τοῦ πεδίου δέδωκά σε καταβρωθῆναι
४तू इस्राएलाच्या पर्वतांवर तू, तुझे सर्व समुदाय, व तुझ्याबरोबरचे जे कोणी सैन्य आहे ते, मरून पडशील. मी तुम्हास पक्ष्यांचे व रानातील वन्य पशूंचे भक्ष्य करीन.
5 ἐπὶ προσώπου τοῦ πεδίου πεσῇ ὅτι ἐγὼ ἐλάλησα λέγει κύριος
५तू शेतातील पृष्टभागावर मरून पडशील कारण मी हे बोललो आहे. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
6 καὶ ἀποστελῶ πῦρ ἐπὶ Γωγ καὶ κατοικηθήσονται αἱ νῆσοι ἐπ’ εἰρήνης καὶ γνώσονται ὅτι ἐγώ εἰμι κύριος
६मग मी, मागोगामध्ये व किनाऱ्यावर सुरक्षितपणे राहणाऱ्या लोकांमध्ये अग्नी पाठवीन. मग त्यांना समजेल ‘मी परमेश्वर आहे.’
7 καὶ τὸ ὄνομά μου τὸ ἅγιον γνωσθήσεται ἐν μέσῳ λαοῦ μου Ισραηλ καὶ οὐ βεβηλωθήσεται τὸ ὄνομά μου τὸ ἅγιον οὐκέτι καὶ γνώσονται τὰ ἔθνη ὅτι ἐγώ εἰμι κύριος ἅγιος ἐν Ισραηλ
७कारण मी माझ्या इस्राएल लोकांमध्ये माझे पवित्र नाव माहीत करून देईन. आणि मी यापुढे आपले पवित्र नाव पुन्हा भ्रष्ट होऊ देणार नाही. राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर इस्राएलमधील एकमेव पवित्र आहे.
8 ἰδοὺ ἥκει καὶ γνώσῃ ὅτι ἔσται λέγει κύριος κύριος αὕτη ἐστὶν ἡ ἡμέρα ἐν ᾗ ἐλάλησα
८पाहा! असा दिवस येत आहे! ते घडेलच!” प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ज्या दिवसाबद्दल मी बोललो तो हाच आहे.
9 καὶ ἐξελεύσονται οἱ κατοικοῦντες τὰς πόλεις Ισραηλ καὶ καύσουσιν ἐν τοῖς ὅπλοις πέλταις καὶ κοντοῖς καὶ τόξοις καὶ τοξεύμασιν καὶ ῥάβδοις χειρῶν καὶ λόγχαις καὶ καύσουσιν ἐν αὐτοῖς πῦρ ἑπτὰ ἔτη
९“तेव्हा इस्राएलात राहणारे बाहेर निघून ते शस्त्रास्त्रे, लहान ढाली, मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, गदा व भाले यांना आग लावून जाळतील. ते सरपण म्हणून सात वर्षे जाळत राहतील.
10 καὶ οὐ μὴ λάβωσιν ξύλα ἐκ τοῦ πεδίου οὐδὲ μὴ κόψωσιν ἐκ τῶν δρυμῶν ἀλλ’ ἢ τὰ ὅπλα κατακαύσουσιν πυρί καὶ προνομεύσουσιν τοὺς προνομεύσαντας αὐτοὺς καὶ σκυλεύσουσιν τοὺς σκυλεύσαντας αὐτούς λέγει κύριος
१०त्यामुळे त्यांना रानातून लाकडे गोळा करावी लागणार नाही किंवा जंगलातून लाकडे तोडावी लागणार नाहीत. तर ही शस्त्रांस्त्रे ते जाळतील. त्यास ज्यांनी लुटले त्यास ते लुटतील. ज्या कोणी त्यांच्याकडून घेतले ते त्याजकडून घेतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
11 καὶ ἔσται ἐν τῇ ἡμέρᾳ ἐκείνῃ δώσω τῷ Γωγ τόπον ὀνομαστόν μνημεῖον ἐν Ισραηλ τὸ πολυάνδριον τῶν ἐπελθόντων πρὸς τῇ θαλάσσῃ καὶ περιοικοδομήσουσιν τὸ περιστόμιον τῆς φάραγγος καὶ κατορύξουσιν ἐκεῖ τὸν Γωγ καὶ πᾶν τὸ πλῆθος αὐτοῦ καὶ κληθήσεται τὸ γαι τὸ πολυάνδριον τοῦ Γωγ
११मग “त्या दिवसात असे होईल की, तेव्हा मी समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगास इस्राएल देशात कबरस्थान. ते येणाऱ्या जाणाऱ्याला रस्ता अडवतील. तेथे गोगाला त्याच्या सर्व समुदायासह पुरतील. ते त्यास ‘हमोन गोग याची दरी’ असे म्हणतील.
12 καὶ κατορύξουσιν αὐτοὺς οἶκος Ισραηλ ἵνα καθαρισθῇ ἡ γῆ ἐν ἑπταμήνῳ
१२देश शुद्ध करण्यासाठी, इस्राएल घराणे, सात महिने त्यांना पुरीत राहिल.
13 καὶ κατορύξουσιν αὐτοὺς πᾶς ὁ λαὸς τῆς γῆς καὶ ἔσται αὐτοῖς εἰς ὀνομαστὸν ᾗ ἡμέρᾳ ἐδοξάσθην λέγει κύριος
१३कारण देशातील सर्व लोक त्यांना पुरतील. मी जेव्हा गौरविला जाईन तो दिवस त्यांच्यासाठी संस्मरणीय होईल.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
14 καὶ ἄνδρας διὰ παντὸς διαστελοῦσιν ἐπιπορευομένους τὴν γῆν θάψαι τοὺς καταλελειμμένους ἐπὶ προσώπου τῆς γῆς καθαρίσαι αὐτὴν μετὰ τὴν ἑπτάμηνον καὶ ἐκζητήσουσιν
१४“हे काम नेहमी करणाऱ्या मनुष्यांना वेगळे करून नेमतील, आणि तो देश शुद्ध व्हावा म्हणून देशातून येथून तेथून जातील; जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांस पुरतील; सात महिने झाल्यावर ते शोधाला लागतील.
15 καὶ πᾶς ὁ διαπορευόμενος τὴν γῆν καὶ ἰδὼν ὀστοῦν ἀνθρώπου οἰκοδομήσει παρ’ αὐτὸ σημεῖον ἕως ὅτου θάψωσιν αὐτὸ οἱ θάπτοντες εἰς τὸ γαι τὸ πολυάνδριον τοῦ Γωγ
१५शोध करणारे देशातून फिरत कोणाला मनुष्याचे अस्थी दिसताच, तो तेथे खूण करून ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या अस्थीला हमोन गोगाच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील.
16 καὶ γὰρ τὸ ὄνομα τῆς πόλεως Πολυάνδριον καὶ καθαρισθήσεται ἡ γῆ
१६तेथल्या नगराचे नाव हमोना असे होईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”
17 καὶ σύ υἱὲ ἀνθρώπου εἰπόν τάδε λέγει κύριος εἰπὸν παντὶ ὀρνέῳ πετεινῷ καὶ πρὸς πάντα τὰ θηρία τοῦ πεδίου συνάχθητε καὶ ἔρχεσθε συνάχθητε ἀπὸ πάντων τῶν περικύκλῳ ἐπὶ τὴν θυσίαν μου ἣν τέθυκα ὑμῖν θυσίαν μεγάλην ἐπὶ τὰ ὄρη Ισραηλ καὶ φάγεσθε κρέα καὶ πίεσθε αἷμα
१७प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “हे मानवाच्या मुला, तू सर्व पंख असलेल्या पक्ष्यांस व रानातील सर्व वन्यपशूस सांग, माझा यज्ञ, जो मोठा यज्ञ मी इस्राएलाच्या पर्वतावर तुम्हासाठी करतो, त्याकडे तुम्ही चोहोकडून एकत्र होऊन मांस खावे आणि रक्त प्यावे.
18 κρέα γιγάντων φάγεσθε καὶ αἷμα ἀρχόντων τῆς γῆς πίεσθε κριοὺς καὶ μόσχους καὶ τράγους καὶ οἱ μόσχοι ἐστεατωμένοι πάντες
१८तुम्ही योद्ध्यांचे मांस खाल आणि पृथ्वींचे अधिपति मेंढ्या, कोकरे, बोकड व बैल यांचे रक्त प्याल; ते सर्व बाशानात पुष्ट झालेले आहेत.
19 καὶ φάγεσθε στέαρ εἰς πλησμονὴν καὶ πίεσθε αἷμα εἰς μέθην ἀπὸ τῆς θυσίας μου ἧς ἔθυσα ὑμῖν
१९कापलेल्या पशूंचा हा माझा यज्ञ मी तुम्हासाठी केला आहे. मग तुमची तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल. त्यांचे रक्त तुम्ही मस्त होईपर्यंत प्याल.
20 καὶ ἐμπλησθήσεσθε ἐπὶ τῆς τραπέζης μου ἵππον καὶ ἀναβάτην γίγαντα καὶ πάντα ἄνδρα πολεμιστήν λέγει κύριος
२०माझ्या मेजावर बसून तुम्हास तेथे घोडे, रथ, योद्धे आणि प्रत्येक लढणारा मनुष्य यांस खाऊन तुमची तृप्ती होईल.” प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
21 καὶ δώσω τὴν δόξαν μου ἐν ὑμῖν καὶ ὄψονται πάντα τὰ ἔθνη τὴν κρίσιν μου ἣν ἐποίησα καὶ τὴν χεῖρά μου ἣν ἐπήγαγον ἐπ’ αὐτούς
२१“मी आपले वैभव राष्ट्रामध्ये ठेवीन आणि माझा न्याय मी केला आहे तो आणि माझा हात मी त्यांच्यावर ठेवला आहे तोही ते सर्व राष्ट्रे पाहतील.
22 καὶ γνώσονται οἶκος Ισραηλ ὅτι ἐγώ εἰμι κύριος ὁ θεὸς αὐτῶν ἀπὸ τῆς ἡμέρας ταύτης καὶ ἐπέκεινα
२२मग त्या दिवसापासून पुढे, मीच त्यांचा परमेश्वर देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल.
23 καὶ γνώσονται πάντα τὰ ἔθνη ὅτι διὰ τὰς ἁμαρτίας αὐτῶν ᾐχμαλωτεύθησαν οἶκος Ισραηλ ἀνθ’ ὧν ἠθέτησαν εἰς ἐμέ καὶ ἀπέστρεψα τὸ πρόσωπόν μου ἀπ’ αὐτῶν καὶ παρέδωκα αὐτοὺς εἰς χεῖρας τῶν ἐχθρῶν αὐτῶν καὶ ἔπεσαν πάντες μαχαίρᾳ
२३आणि राष्ट्रे जाणतील की, इस्राएलाचे घराणे आपल्या अन्यायामुळे बंदिवासात गेले त्यांनी मजबरोबर विश्वासघात केला म्हणून मी आपले मुख त्यापासून लपविले आणि त्यास त्यांच्या वैऱ्यांच्या हाती दिले आणि ते सर्व तलवारीने पडले.
24 κατὰ τὰς ἀκαθαρσίας αὐτῶν καὶ κατὰ τὰ ἀνομήματα αὐτῶν ἐποίησα αὐτοῖς καὶ ἀπέστρεψα τὸ πρόσωπόν μου ἀπ’ αὐτῶν
२४मी त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे आणि पापांप्रमाणे त्यांचे केले. मी त्यांच्यापासून आपले तोंड लपविले.”
25 διὰ τοῦτο τάδε λέγει κύριος κύριος νῦν ἀποστρέψω τὴν αἰχμαλωσίαν Ιακωβ καὶ ἐλεήσω τὸν οἶκον Ισραηλ καὶ ζηλώσω διὰ τὸ ὄνομα τὸ ἅγιόν μου
२५म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, “आता मी याकोबाच्या लोकांस बंदिवासातून परत आणीन. इस्राएलाच्या सर्व घराण्यावर मी दया करीन. मी आपल्या पवित्र नावाबद्दल आवेशी राहीन.
26 καὶ λήμψονται τὴν ἀτιμίαν ἑαυτῶν καὶ τὴν ἀδικίαν ἣν ἠδίκησαν ἐν τῷ κατοικισθῆναι αὐτοὺς ἐπὶ τὴν γῆν αὐτῶν ἐπ’ εἰρήνης καὶ οὐκ ἔσται ὁ ἐκφοβῶν
२६मग ते देशात निर्भय राहतील आणि कोणी त्यांना दहशत घालणार नाही; तेव्हा हे सर्व विसरतील. मग ते आपली लाज व मजबरोबर केलेला देशाचा विश्वासघात विसरतील.
27 ἐν τῷ ἀποστρέψαι με αὐτοὺς ἐκ τῶν ἐθνῶν καὶ συναγαγεῖν με αὐτοὺς ἐκ τῶν χωρῶν τῶν ἐθνῶν καὶ ἁγιασθήσομαι ἐν αὐτοῖς ἐνώπιον τῶν ἐθνῶν
२७मी त्यांना राष्ट्राच्या लोकांतून परत आणीन आणि त्यांना त्यांच्या वैऱ्याच्या देशातून गोळा करीन व बहुत राष्ट्रासमोर मी त्यांच्यामध्ये पवित्र मानला गेलो म्हणजे हे घडेल.
28 καὶ γνώσονται ὅτι ἐγώ εἰμι κύριος ὁ θεὸς αὐτῶν ἐν τῷ ἐπιφανῆναί με αὐτοῖς ἐν τοῖς ἔθνεσιν
२८नंतर त्यांना समजेल की, मीच त्यांचा परमेश्वर आहे. कारण मीच त्यांना बंदिवान म्हणून दुसऱ्या देशात पाठवले, परंतु नंतर मीच त्यांना एकत्र गोळा करून त्यांच्या देशात परत आणले. मी त्यांच्यातील कोणालाही तेथे सोडून देणार नाही.
29 καὶ οὐκ ἀποστρέψω οὐκέτι τὸ πρόσωπόν μου ἀπ’ αὐτῶν ἀνθ’ οὗ ἐξέχεα τὸν θυμόν μου ἐπὶ τὸν οἶκον Ισραηλ λέγει κύριος κύριος
२९मी यापुढे आपले मुख त्यांच्यापासून लपविणार नाही, मी आपला आत्मा इस्राएलाच्या घराण्यावर ओतीन.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.