< Hesekiel 18 >
1 Und des HERRN Wort geschah zu mir und sprach:
१पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
2 Was treibt ihr unter euch im Lande Israel dies Sprichwort und sprecht: “Die Väter haben Herlinge gegessen, aber den Kindern sind die Zähne davon stumpf geworden”?
२“वडीलांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,” याचा अर्थ काय आहे? इस्राएलाच्या भूमीत तू ज्या म्हणी वापरतो आणि म्हणतो.
3 So wahr als ich lebe, spricht der Herr HERR, solches Sprichwort soll nicht mehr unter euch gehen in Israel.
३मी शपथ घेतो, “हे परमेश्वर देव जाहीर करतोय” निश्चितच इस्राएलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उरणार नाही.
4 Denn siehe, alle Seelen sind mein; des Vaters Seele ist sowohl mein als des Sohnes Seele. Welche Seele sündigt, die soll sterben.
४पाहा! सर्व जीव आत्मे माझे आहेत, जे पित्यापासून जीवधारी झालेत, म्हणून तेच पुत्राचे जीवन आहे, ते माझे आहे जो पुरुष पाप करेल तो मरेल.
5 Wenn nun einer fromm ist, der recht und wohl tut,
५जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा व नीतिने वागणारा आहे.
6 der auf den Bergen nicht isset, der seine Augen nicht aufhebt zu den Götzen des Hauses Israel und seines Nächsten Weib nicht befleckt und liegt nicht bei der Frau in ihrer Krankheit,
६जर त्यास पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि त्याने आपले डोळे वर इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाही, जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला भ्रष्ट केले नाही किंवा रुतुमती काळात स्त्रीकडे गेला नाही.
7 der niemand beschädigt, der dem Schuldner sein Pfand wiedergibt, der niemand etwas mit Gewalt nimmt, der dem Hungrigen sein Brot mitteilt und den Nackten kleidet,
७जर त्याने कुणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदाराकडून शपथ वाहून घेतली जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही, पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्न लोकांना कपडे घातली.
8 der nicht wuchert, der nicht Zins nimmt, der seine Hand vom Unrechten kehrt, der zwischen den Leuten recht urteilt,
८त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवी पेक्षा जास्त नफा घेतला नाही जर त्याने न्यायत्व केले व लोकांमध्ये विश्वासूपण निर्माण केला.
9 der nach meinen Rechten wandelt und meine Gebote hält, daß er ernstlich darnach tue: das ist ein frommer Mann, der soll das leben haben, spricht der Herr HERR.
९जर तो माझ्या दर्ज्याने चालेल आणि माझे फर्मान विश्वासूपणे वागण्यात पाळेल तो मनुष्य नितीमान ठरेल; तो जगेल, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
10 Wenn er aber einen Sohn zeugt, und derselbe wird ein Mörder, der Blut vergießt oder dieser Stücke eins tut,
१०पण त्याला जर रक्तपात रागीट मुलगा असला व ही सर्व कामे त्याने केली,
11 und der andern Stücke keins tut, sondern auf den Bergen isset und seines Nächsten Weib befleckt,
११त्याच्या वडिलाने यातील काही एक केले नाही पण त्याच्या मुलाने पवित्र पर्वतावर खाद्य पदार्थ नेऊन खाल्ले आणि आपल्या शेजाऱ्याच्या मुलीला भ्रष्ट केले.
12 die Armen und Elenden beschädigt, mit Gewalt etwas nimmt, das Pfand nicht wiedergibt, seine Augen zu den Götzen aufhebt und einen Greuel begeht,
१२त्याने गरजू व गरीबांवर दडपशाही केली जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले परत केले नाही, जर त्याने आपली नजर मूर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले.
13 auf Wucher gibt, Zins nimmt: sollte der Leben? Er soll nicht leben, sondern weil er solche Greuel alle getan hat, soll er des Todes sterben; sein Blut soll auf ihm sein.
१३जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही त्याने किळस वाणे हे सर्व काम केले तो खात्रीने मरेल त्याच्या रक्ताचा झडा त्याच्याच माथी येईल.
14 Wo er aber einen Sohn zeugt, der solche Sünden sieht, so sein Vater tut, und sich fürchtet und nicht also tut,
१४पण पाहा! त्यास पुत्र झाला व त्याने आपल्या वडिलाने केलेले पातक पाहिले आणि स्वत: देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही,
15 ißt nicht auf den Bergen, hebt seine Augen nicht auf zu den Götzen des Hauses Israel, befleckt nicht seines Nächsten Weib,
१५जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्ले नाही व आपले डोळे इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाहीत आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट केले नाही.
16 beschädigt niemand, behält das Pfand nicht, nimmt nicht mit Gewalt etwas, teilt sein Brot mit dem Hungrigen und kleidet den Nackten,
१६जर त्याने कुणावरही दड्पशाही केली नाही, जप्ती, तारण म्हणून काही ठेवून घेतले किंवा चोरलेल्या वस्तू ठेवून घेतल्या नाहीत, पण त्याऐवजी त्याने भुकेलेल्या व्यक्तीस अन्न दिले आणि नग्न व्यक्तीस वस्त्र दिले.
17 der seine Hand vom Unrechten kehrt, keinen Wucher noch Zins nimmt, sondern meine Gebote hält und nach meinen Rechten lebt: der soll nicht sterben um seines Vaters Missetat willen, sondern leben.
१७गरीबांना नाडण्यास त्याने जर आपला हात आखुड केला आणि त्याने व्याज घेतले नाही व अन्यायाने नफा घेतला नाही, त्याने माझे फर्मान मान्य केले आणि माझ्या दर्जानुसार चालला, तर तो आपल्या वडिलाच्या पातकासाठी मरणार नाही. तो निश्चित जगेल.
18 Aber sein Vater, der Gewalt und Unrecht geübt hat und unter seinem Volk getan hat, was nicht taugt, siehe, der soll sterben um seiner Missetat willen.
१८त्याच्या वडिलाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पाहा! तो आपल्या अधर्मामुळे मरेल.
19 So sprecht ihr: Warum soll denn ein Sohn nicht tragen seines Vaters Missetat? Darum daß er recht und wohl getan und alle meine Rechte gehalten und getan hat, soll er leben.
१९पण तू म्हणतोस “वडिलाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये?” कारण मुलगा आपला न्याय भरुन पावला व नीतिने वागला आणि त्याने माझे सर्व नियम पाळले; त्याने त्याची कृती केली, तो निश्चित जगेल.
20 Denn welche Seele sündigt, die soll sterben. Der Sohn soll nicht tragen die Missetat des Vaters, und der Vater soll nicht tragen die Missetat des Sohnes; sondern des Gerechten Gerechtigkeit soll über ihm sein.
२०जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा वडिलाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल.
21 Wo sich aber der Gottlose bekehrt von allen seine Sünden, die er getan hat, und hält alle meine Rechte und tut recht und wohl, so soll er leben und nicht sterben.
२१पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.
22 Es soll aller seiner Übertretung, so er begangen hat, nicht gedacht werden; sondern er soll leben um der Gerechtigkeit willen, die er tut.
२२सर्व अपराध जे त्याने केले त्याचे स्मरण पुन्हा केले जाणार नाही, तो आपल्या नीतीच्या सरावाने जगेल.
23 Meinest du, daß ich Gefallen habe am Tode des Gottlosen, spricht der Herr, und nicht vielmehr, daß er sich bekehre von seinem Wesen und lebe?
२३“मी दुष्टतेच्या मृत्यूवर मोठा हर्ष केला आहे” हे परमेश्वर देव जाहीर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?
24 Und wo sich der Gerechte kehrt von seiner Gerechtigkeit und tut Böses und lebt nach all den Greueln, die ein Gottloser tut, sollte der leben? Ja, aller seiner Gerechtigkeit, die er getan hat, soll nicht gedacht werden; sondern in seiner Übertretung und Sünde, die er getan hat, soll er sterben.
२४जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्तेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद, दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही. जेव्हा त्याने देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.
25 Doch sprecht ihr: Der Herr handelt nicht recht. So hört nun, ihr vom Hause Israel: Ist's nicht also, daß ich recht habe und ihr unrecht habt?
२५पण तू म्हणतोस, “प्रभूचे मार्ग योग्य नाहीत,” इस्राएलाच्या घराण्या ऐक! काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का?
26 Denn wenn der Gerechte sich kehrt von seiner Gerechtigkeit und tut Böses, so muß er sterben; er muß aber um seiner Bosheit willen, die er getan hat, sterben.
२६जर नीतिमान आपल्या नीतिमत्तेपासून आपला मार्ग फिरवेल आणि दुष्कर्म करेल आणि मरेल याचे कारण तोच ठरेल, आणि त्याने केलेल्या दुष्कर्मात मरेल.
27 Wiederum, wenn der Gottlose kehrt von seiner Ungerechtigkeit, die er getan hat, und tut nun recht und wohl, der wird seine Seele lebendig erhalten.
२७पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने व नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.
28 Denn weil er sieht und bekehrt sich von aller Bosheit, die er getan hat, so soll er leben und nicht sterben.
२८कारण त्याने पाहिले व केलेल्या दुष्कर्मापासून तो वळाला, तो जगेल तो मरणार नाही.
29 Doch sprechen die vom Hause Israel: Der Herr handelt nicht recht. Sollte ich Unrecht haben? Ihr vom Hause Israel habt unrecht.
२९पण इस्राएलाचे घराणे म्हणते, “प्रभूचा मार्ग अयोग्य आहे आणि तुझे स्वत: चे मार्ग कसे अयोग्य नाही?”
30 Darum will ich euch richten, ihr vom Hause Israel einen jeglichen nach seinem Wesen, spricht der Herr HERR. Darum so bekehrt euch von aller Übertretung, auf daß ihr nicht fallen müsset um der Missetat willen.
३०तथापि “इस्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेन.” हे परमेश्वर देव जाहीर करतो, पश्चाताप कर व आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.
31 Werfet von euch alle eure Übertretung, damit ihr übertreten habt, und machet euch ein neues Herz und einen neuen Geist. Denn warum willst du sterben, du Haus Israel?
३१तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर, तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?
32 Denn ich habe keinen Gefallen am Tode des Sterbenden, spricht der Herr HERR. Darum bekehrt euch, so werdet ihr leben.
३२कारण “मी मरणाऱ्यांसाठी मला हर्ष होत नाही” हे परमेश्वर देव जाहीर करतो. “मग पश्चाताप कर आणि जीवित राहा.”