< Psalm 93 >
1 Der HERR ist König und herrlich geschmückt; der HERR ist geschmückt und hat ein Reich angefangen, soweit die Welt ist, und zugerichtet, daß es bleiben soll.
१परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
2 Von dem an stehet dein Stuhl fest; du bist ewig.
२तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; तू सर्वकाळापासून आहेस.
3 HERR, die Wasserströme erheben sich, die Wasserströme erheben ihr Brausen, die Wasserströme heben empor die Wellen.
३हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; आपला आवाज उंचावला आहे, महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.
4 Die Wasserwogen im Meer sind groß und brausen greulich; der HERR aber ist noch größer in der Höhe.
४खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
5 Dein Wort ist eine rechte Lehre. Heiligkeit ist die Zierde deines Hauses ewiglich.
५तुझे नियम अतिसत्य आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदासर्वकाळ शोभते.