< 4 Mose 17 >
1 Und der HERR redete mit Mose und sprach:
१परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2 Sage den Kindern Israel und nimm von ihnen zwölf Stecken, von jeglichem Fürsten seines Vaters-Hauses einen, und schreibe eines jeglichen Namen auf seinen Stecken.
२इस्राएल लोकांशी बोल. त्यांच्याकडून बारा काठ्या घे. बारा वंश प्रमुखांकडून प्रत्येकी एक काठी घे. प्रत्येक मनुष्याचे नाव त्यांच्या त्यांच्या काठीवर लिही.
3 Aber den Namen Aarons sollst du schreiben auf den Stecken Levis. Denn je für ein Haupt ihrer Väter Hauses soll ein Stecken sein.
३“लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे.
4 Und lege sie in die Hütte des Stifts vor dem Zeugnis, da ich euch zeuge.
४या काठ्या दर्शनमंडपामध्ये आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे.
5 Und welchen ich erwählen werde, des Stecken wird grünen, daß ich das Murren der Kinder Israel, das sie wider euch murren, stille
५खरा याजक म्हणून मी एका मनुष्याची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी इस्राएली तुझ्या आणि माझ्याविरूद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”
6 Mose redete mit den Kindern Israel; und alle ihre Fürsten gaben ihm zwölf Stecken, ein jeglicher Fürst einen Stecken, nach dem Hause ihrer Väter; und der Stecken Aarons war auch unter ihren Stecken.
६म्हणून मोशे इस्राएलाच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्यास काठी दिली. त्या बारा काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनाची होती.
7 Und Mose legte die Stecken vor den HERRN in der Hütte des Zeugnisses.
७मोशेने त्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या.
8 Des Morgens aber, da Mose in die Hütte des Zeugnisses ging, fand er den Stecken Aarons, des Hauses Levi, grünen, und die Blüte aufgegangen und Mandeln tragen.
८दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला. लेवी वंशाकडून आलेल्या अहरोनाच्या काठीला पाने फुटली असल्याचे त्यास दिसले. त्या काठीला फांद्याही फुटल्या होत्या आणि बदामही लागले होते.
9 Und Mose trug die Stecken alle heraus von dem HERRN vor alle Kinder Israel, daß sie es sahen; und ein jeglicher nahm seinen Stecken.
९म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगळ्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांस दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.
10 Der HERR sprach aber zu Mose: Trage den Stecken Aarons wieder vor das Zeugnis, daß er verwahret werde zum Zeichen den ungehorsamen Kindern, daß ihr Murren von mir aufhöre, daß sie nicht sterben.
१०नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेव. जे लोक नेहमी माझ्याविरूद्ध बंड करतात त्यांच्यासाठी ही अपराधाची खूण असेल. माझ्याविरूद्ध तक्रारी करणे ती यामुळे बंद होईल म्हणजे ते मरायचे नाहीत.
11 Mose tat, wie ihm der HERR geboten hatte.
११मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.
12 Und die Kinder Israel sprachen zu Mose: Siehe, wir verderben und kommen um; wir werden alle vertilget und kommen um.
१२इस्राएलाचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हास माहित आहे आम्ही हरलो आहोत. आमचा सगळ्यांचा नाश होणार आहे.
13 Wer sich nahet zu der Wohnung des HERRN, der stirbt. Sollen wir denn gar untergehen?
१३जो कोणी मनुष्य नुसता परमेश्वराच्या निवासमंडपाजवळ जाईल तो मरेल. आम्हा सर्वाचा नाश होणार की काय?”