< 3 Mose 16 >

1 Und der HERR redete mit Mose (nachdem die zween Söhne Aarons gestorben waren, da sie vor dem HERRN opferten)
अहरोनाचे दोन पुत्र परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.
2 und sprach: Sage deinem Bruder Aaron, daß er nicht allerlei Zeit in das inwendige Heiligtum gehe hinter dem Vorhang vor dem Gnadenstuhl, der auf der Lade ist, daß er nicht sterbe; denn ich will in einer Wolke erscheinen auf dem Gnadenstuhl.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याच्याशी बोल व त्यास सांग की: त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो.
3 Sondern damit soll er hineingehen: mit einem jungen Farren zum Sündopfer und mit einem Widder zum Brandopfer.
परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी अहरोनाने पापार्पणासाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा.
4 Und soll den heiligen leinenen Rock anlegen und leinen Niederwand an seinem Fleisch haben und sich mit einem leinenen Gürtel gürten und den leinenen Hut aufhaben; denn das sind die heiligen Kleider; und soll sein Fleisch mit Wasser baden und sie anlegen.
त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
5 Und soll von der Gemeine der Kinder Israel zween Ziegenböcke nehmen zum Sündopfer und einen Widder zum Brandopfer.
मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.
6 Und Aaron soll den Farren, sein Sündopfer, herzubringen und sich und sein Haus versöhnen;
अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करून स्वत: साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
7 und danach die zween Böcke nehmen und vor den HERRN stellen vor der Tür der Hütte des Stifts.
त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.
8 Und soll das Los werfen über die zween Böcke, ein Los dem HERRN und das andere dem ledigen Bock.
अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी
9 Und soll den Bock, auf welchen des HERRN Los fällt, opfern zum Sündopfer.
ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा;
10 Aber den Bock, auf welchen das Los des ledigen fällt, soll er lebendig vor den HERRN stellen, daß er ihn versöhne, und lasse den ledigen Bock in die Wüste.
१०पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
11 Und also soll er denn den Farren seines Sündopfers herzubringen und sich und sein Haus versöhnen; und soll ihn schlachten.
११अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत: साठी व स्वत: च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत: साठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा.
12 Und soll einen Napf voll Glut vom Altar nehmen, der vor dem HERRN stehet, und die Hand voll zerstoßenes Räuchwerks und hinein hinter den Vorhang bringen;
१२नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.
13 und das Räuchwerk aufs Feuer tun vor dem HERRN, daß der Nebel vom Räuchwerk den Gnadenstuhl bedecke, der auf dem Zeugnis ist, daß er nicht sterbe.
१३त्याने तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर, असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही.
14 Und soll des Bluts vom Farren nehmen und mit seinem Finger gegen den Gnadenstuhl sprengen vorne an; siebenmal soll er also vor dem Gnadenstuhl mit seinem Finger vom Blut sprengen.
१४त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनावर पूर्वेस बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.
15 Danach soll er den Bock, des Volks Sündopfer, schlachten und seines Bluts hineinbringen hinter den Vorhang; und soll mit seinem Blut tun, wie er mit des Farren Blut getan hat, und damit auch sprengen vorne gegen den Gnadenstuhl;
१५मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.
16 und soll also versöhnen das Heiligtum von der Unreinigkeit der Kinder Israel und von ihrer Übertretung in allen ihren Sünden. Also soll er tun der Hütte des Stifts; denn sie sind unrein, die umher liegen.
१६आणखी त्याने इस्राएली लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे या सर्वांबद्दल परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित करावे; परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वस्ती करतो त्या, लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने तसेच करावे.
17 Kein Mensch soll in der Hütte des Stifts sein, wenn er hineingehet, zu versöhnen im Heiligtum, bis er herausgehe; und soll also versöhnen sich und sein Haus und die ganze Gemeine Israel.
१७अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्रस्थानात प्रवेशकरण्यासाठी जाईल तेव्हा, तो स्वतःसाठी व स्वत: च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपामध्ये कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये.
18 Und wenn er herausgehet zum Altar, der vor dem HERRN stehet, soll er ihn versöhnen und soll des Bluts vom Farren und des Bluts vom Bock nehmen und auf des Altars Hörner umher tun.
१८मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
19 Und soll mit seinem Finger vom Blut darauf sprengen siebenmal und ihn reinigen und heiligen von der Unreinigkeit der Kinder Israel.
१९मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.
20 Und wenn er vollbracht hat das Versöhnen des Heiligtums und der Hütte des Stifts und des Altars, so soll er den lebendigen Bock herzubringen.
२०जेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.
21 Da soll denn Aaron seine beiden Hände auf sein Haupt legen und bekennen auf ihn alLE Missetat der Kinder Israel und alLE ihre Übertretung in allen ihren Sünden; und soll sie dem Bock auf das Haupt legen und ihn durch einen Mann, der vorhanden ist, in die Wüste laufen lassen,
२१अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.
22 daß also der Bock alLE ihre Missetat auf ihm in eine Wildnis trage; und lasse ihn in die Wüste.
२२तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.
23 Und Aaron soll in die Hütte des Stifts gehen und ausziehen die leinenen Kleider, die er anzog, da er in das Heiligtum ging, und soll sie daselbst lassen.
२३मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपामध्ये जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत.
24 Und soll sein Fleisch mit Wasser baden an heiliger Stätte und seine eigenen Kleider antun; und herausgehen und sein Brandopfer und des Volks Brandopfer machen und beide sich und das Volk versöhnen,
२४मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत: साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत: साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.
25 und das Fett vom Sündopfer auf dem Altar anzünden.
२५मग त्याने पापार्पणाच्या चरबीचा वेदीवर होम करावा.
26 Der aber den ledigen Bock hat ausgeführet, soll seine Kleider waschen und sein Fleisch mit Wasser baden und danach ins Lager kommen.
२६ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो.
27 Den Farren des Sündopfers und den Bock des Sündopfers, welcher Blut in das Heiligtum zu versöhnen gebracht wird, soll man hinausführen vor das Lager und mit Feuer verbrennen, beide ihre Haut, Fleisch und Mist.
२७पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.
28 Und der sie verbrennet, soll seine Kleider waschen und sein Fleisch mit Wasser baden und danach ins Lager kommen.
२८ज्या मनुष्याने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी; त्यानंतर तो छावणीत येऊ शकतो.
29 Auch soll euch das ein ewiges Recht sein: Am zehnten Tage des siebenten Monden sollt ihr euren Leib kasteien und kein Werk tun, er sei einheimisch oder fremd unter euch.
२९तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये, मग तो तुमच्यात जन्मलेल्यांपैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशी असो;
30 Denn an diesem Tage geschieht eure Versöhnung, daß ihr gereiniget werdet; von allen euren Sünden werdet ihr gereiniget vor dem HERRN
३०हे यासाठी की या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल.
31 Darum soll's euch der größte Sabbat sein, und ihr sollt euren Leib demütigen. Ein ewig Recht sei das!
३१तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बाथ आहे; तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करु नये; हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे.
32 Es soll aber solche Versöhnung tun ein Priester, den man geweihet, und des Hand man gefüllet hat zum Priester an seines Vaters Statt; und soll die leinenen Kleider antun, nämlich die heiligen Kleider.
३२तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.
33 Und soll also versöhnen das heilige Heiligtum und die Hütte des Stifts und den Altar und die Priester und alles Volk der Gemeine.
३३त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.”
34 Das soll euch ein ewiges Recht sein, daß ihr die Kinder Israel versöhnet von allen ihren Sünden im Jahr einmal Und Mose tat, wie ihm der HERR geboten hatte.
३४इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधी होय; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.

< 3 Mose 16 >