< Jesaja 25 >
1 HERR, du bist mein Gott; dich preise ich. Ich lobe deinen Namen, denn du tust Wunder. Deine Vornehmen von alters her sind treu und wahrhaftig.
१हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुला उंच करीन, मी तुझी स्तुती करीन. कारण तू अद्भूत कृत्ये केली आहेस, जे संकल्प तू पूर्वीच योजून ठेवले होते, ते तू आपल्या परिपूर्ण विश्वासाच्या द्वारे घडवून आणले आहेस,
2 Denn du machest die Stadt zum Steinhaufen, die feste Stadt, daß sie auf einem Haufen liegt, der Fremden Palast, daß nicht mehr eine Stadt sei und nimmer mehr gebauet werde.
२कारण तू शत्रूंच्या नगराला ढीग केले आहेस, तटबंदीच्या नगराला ओसाडी असे केले आहेस, आणि परक्यांचे महाल असे ते नगर राहिले नाही.
3 Darum ehret dich ein mächtig Volk, die Städte gewaltiger Heiden fürchten dich.
३याकरिता सामर्थ्यवान लोक तुझे गौरव करतील व निर्दयी राष्ट्रे तुला भीतील.
4 Denn du bist der Geringen Stärke, der Armen Stärke in Trübsal, eine Zuflucht vor dem Ungewitter, ein Schatten vor der Hitze, wenn die Tyrannen wüten, wie ein Ungewitter wider eine Wand.
४कारण तू गोरगरीबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षक असा आहेस. जेव्हा निर्दयींचा फटका भींतीला लागणाऱ्या वादळासारखा असतो, तेव्हा तू उन्हाच्या तापात त्यांची सावली व सकंटाच्या वादळात त्यांचा निवारा असा आहेस.
5 Du demütigest der Fremden Ungestüm wie die Hitze in einem dürren Ort, daß die Hitze die Rebe der Tyrannen verderbe, und die Wolke dennoch Schatten gebe.
५उन्हाच्या तापाने तापलेली भूमी मेघाच्या छायेने थंड होते, तसे जे निर्दय शत्रू आहेत ह्यांच्या गर्जना शांत करशील
6 Und der HERR Zebaoth wird allen Völkern machen auf diesem Berge ein fett Mahl, ein Mahl von reinem Wein, von Fett, von Mark, von Wein, darin keine Hefe ist.
६तेव्हा या सीयोन डोंगरावर म्हणजेच येरुशलेमेत सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांस मेजवानी तेथे उत्तमोत्तम चवदार पदार्थ असतील मांसाचे मज्ज सहीत तुकडे असतील, तसेच चवदार द्राक्षमध देण्यात येईल ते सर्व खाऊन पिऊन तृप्त होतील.
7 Und er wird auf diesem Berge das Hüllen wegtun, damit alle Völker verhüllet sind, und die Decke, damit alle Heiden zugedeckt sind.
७त्यावेळी पापाचे मेघपटल व मृत्यूछायेचे सावट तो या डोंगरावरून लोकांपासून दूर करील व त्यांना मोकळे करील.
8 Denn er wird den Tod verschlingen ewiglich. Und der HERR HERR wird die Tränen von allen Angesichtern abwischen und wird aufheben die Schmach seines Volks in allen Landen; denn der HERR hat's gesagt.
८तो मरणाला कायमचे नाहीसे करील, परमेश्वर सर्वांच्या डोळ्यांचे अश्रू पुसून टाकील देशातील त्यांच्या लोकांवरील सर्व अन्याय अपमान दूर करील परमेश्वर देव हे बोलला आहे हे तो करीलच.
9 Zu der Zeit wird man sagen: Siehe, das ist unser Gott, auf den wir harren, und er wird uns helfen; das ist der HERR, auf den wir harren, daß wir uns freuen und fröhlich seien in seinem Heil.
९सर्व लोक त्या दिवशी म्हणतील व घोषणा देऊन सांगतील, “पाहा हा आमचा देव आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे त्याची आम्ही वाट पाहातो, कारण तोच आमचे तारण करणारा आहे, हा आमचा परमेश्वर आहे, आम्ही सर्व आंनदी आहो कारण त्याच्याकडून आम्हांला तारण प्राप्ती होईल.
10 Denn die Hand des HERRN ruhet auf diesem Berge. Moab aber wird unter ihm zerdroschen werden, wie Stroh zerdroschen wird, und wie Kot.
१०कारण परमेश्वराचा हात यरूशलेमेला आर्शीवाद देण्यासाठी सियोन पर्वतावरून उचलला जाईल व त्याचे आर्शीवाद सदैव यरूशलेमेतील लोकांबरोबर राहतील, पण मवाब गवताप्रमाणे पायाखाली तुडवील जाईल व फेकल्या जाईल.
11 Und er wird seine Hände ausbreiten mitten unter sie, wie sie ein Schwimmer ausbreitet zu schwimmen; und wird ihre Pracht niedrigen mit den Armen seiner Hände
११पाण्यात पोहणारा पोहण्यासाठी हातांनी पाणी सारतो तसेच देव त्यांना दूर सारील व त्यांचा सर्व अभिमान, गर्व व सर्व दुराचार याचा नाश करून त्यांचा शेवट करील.
12 und die hohe Festung eurer Mauern beugen, niedrigen und in den Staub zu Boden werfen.
१२मवाबाची उंच तटबंदी व सुरक्षीत ठिकाणे नष्ट करील.