< Psalm 23 >
1 Ein Lied, von David. - Mein Hirte ist der Herr; mir mangelt nichts.
१दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही.
2 Er lagert mich auf grünen Auen; er leitet mich zu stillen Wassern,
२तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 lenkt mein Begehr und leitet mich auf rechten Pfaden zu seines Namens Wohnstatt hin. -
३तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
4 Und walle ich im Tal des Todesschattens, ich fürchte keinerlei Gefahr; denn Du begleitest mich. Ein Trost sind mir Dein Stab und Deine Rute, die mir zur Leitung dienen.
४मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
5 Du richtest mir ein Mahl vor meinen Neidern zu. Du salbst mein Haupt mit Öl und schenkst mir vollen Becher ein.
५तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे.
6 In meinem Leben folgt mir Glück und Huld, und immer weile ich im Haus des Herrn.
६खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.