< Nehemia 7 >

1 Als die Mauer erbaut war, setzte ich die Tore ein. Dann wurden die Torhüter, die Leviten, für ihr Amt ernannt.
तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. आणि द्वारपाल व गायक आणि लेवी यांची नेमणूक करण्यात आली.
2 Meinen Bruder Chanani, auch Chananja genannt, bestellte ich zum Burgherrn über Jerusalem. Er galt bei vielen als ein zuverlässiger und gottesfürchtiger Mann.
यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरूशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.
3 Ich sprach zu ihnen: "Man öffne nicht die Tore Jerusalems, bis die Sonne scheint, und bis sie aufgestanden sind, halte man die Tore verschlossen Haltet fest daran! Für die Bewohner Jerusalems stelle man Wachen auf, je einen auf seinen Posten und je einen vor dem Hause."
आणि मी त्यांना म्हणालो, “सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना, दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरूशलेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा, त्यापैकी काहीजणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
4 Nun war die Stadt ausgedehnt und groß. Aber nur wenige Leute waren darin. Noch waren keine Häuser gebaut.
आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.
5 Da gab mein Gott mir ins Herz, die Adligen und Vorsteher und das Volk zu versammeln und sie nach ihrer Abkunft aufzuzeichnen. Dabei fand ich das Geschlechterverzeichnis derer, die zuerst heraufgezogen waren. Ich fand geschrieben:
माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळयांची नावनिशी मला सापडली, आणि त्यामध्ये जे लिहिले होते ते हे.
6 Dies sind die Söhne der Landschaft, die aus der Gefangenschaft der Exulanten hergezogen sind, die einstens Babels König Nebukadrezar weggeführt hat, und die nach Jerusalem und Juda zurückkehrten, jeder in seine Stadt,
बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने या लोकांस बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरूशलेम आणि यहूदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.
7 die mit Zerubbabel, Jesua, Nechemja, Azarja, Reamja, Nachamani, Mordekai, Bilsan, Misperet, Bigwai, Nechum und Baana gekommen sind, die Zahl der Männer des Volkes Israel:
जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:
8 die Söhne des Paros 2.172,
परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर,
9 die Söhne Sephatjas 372,
शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर,
10 die Söhne des Arach 652,
१०आरहचे वंशज सहाशें बावन्न.
11 die Söhne des Pachatmoab (Moabs Statthalter), nämlich die Söhne des Jesua und Joab 2.818,
११येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशें अठरा,
12 die Söhne des Elam 1.254,
१२एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न,
13 die Söhne des Zattu 845,
१३जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस,
14 die Söhne des Zakkai 760,
१४जक्काईचे वंशज सातशे साठ.
15 die Söhne des Binnui 648,
१५बिन्नुईचे वंशज सहाशें अठ्ठेचाळीस,
16 die Söhne des Bebai 628,
१६बेबाईचे वंशज सहाशें अठ्ठावीस
17 die Söhne des Azgad 2.322,
१७अजगादचे वंशज दोन हजार तीनशे बावीस,
18 die Söhne des Adonikam 667,
१८अदोनीकामचे वंशज सहाशें सदुसष्ट.
19 die Söhne des Bigwai 2.067,
१९बिग्वईचे वंशज दोन हजार सदुसष्ट,
20 die Söhne des Adin 655,
२०आदीनाचे वंशज सहाशें पंचावन्न,
21 die Söhne des Ater von Chizkija 98,
२१हिज्कीयाच्या कुटुंबातील आटेराचे वंशज अठ्याण्णव,
22 die Söhne des Chasum 328,
२२हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस.
23 die Söhne des Besai 324,
२३बेसाईचे वंशज तीनशे चोवीस,
24 die Söhne des Chariph 112,
२४हारिफाचे वंशज एकशे बारा,
25 die Söhne Gibeons 95,
२५गिबोनाचे वंशज पंचाण्णव,
26 die Männer von Bethlehem und Netopha 188,
२६बेथलहेम आणि नटोफा येथील माणसे एकशे अठ्याऐंशी.
27 die Männer von Anatot 128,
२७अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस,
28 die Männer von Bet-Azmawet 42,
२८बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस,
29 die Männer von Kirjatjearim, Kephira und Beerot 743,
२९किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथयातली माणसे सातशे त्रेचाळीस,
30 die Männer der Rama und von Geba 621,
३०रामा आणि गिबातली माणसे सहाशे एकवीस.
31 die Männer von Mikmas 122,
३१मिखमाशाची माणसे एकशे बावीस,
32 die Männer von Betel und dem Ai 123,
३२बेथेल आणि आय येथली माणसे एकशे तेवीस,
33 die Männer von Neu Nebo 52,
३३दुसऱ्या नबोची माणसे बावन्न,
34 die Söhne Neu Elams 1.254,
३४दुसऱ्या एलामाची माणसे एक हजार दोनशे चौपन्न.
35 die Söhne Charims 320,
३५हारीमाचे वंशज तीनशे वीस,
36 die Söhne Jerichos 345,
३६यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस,
37 die Söhne des Lod, Chadid und Ono 721,
३७लोद, हादीद व ओनो याचे वंशज सातशे एकवीस,
38 die Söhne Senaas 3930,
३८सनाहाचे वंशज तीन हजार नऊशें तीस.
39 die Priester: die Söhne Jedajas vom Hause Jesua 973,
३९याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातली यदया याचे वंशज नऊशें त्र्याहत्तर
40 die Söhne des Immer 1.052,
४०इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न,
41 die Söhne des Paschur 1.247,
४१पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस,
42 die Söhne des Charim 1.017,
४२हारीमाचे वंशज एक हजार सतरा.
43 die Leviten: die Söhne des Jesua, nämlich Kadmiel, die Söhne Hodewas 74,
४३लेवी: होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज चौऱ्याहत्तर
44 die Sänger: die Söhne Asaphs 148,
४४गाणारे: आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस,
45 die Torhüter: die Söhne Sallums, die Söhne Aters, die Söhne Talmons, die Söhne Akkubs, die Söhne Chatitas, die Söhne Sobais 138,
४५द्वारपाल: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबाचे वंशज एकशे अडतीस.
46 die Tempelsklaven: die Söhne des Sicha, die Söhne des Chasupha, die des Tabbaot,
४६हे मंदिराचे विशेष सेवेकरी: सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज,
47 die Söhne des Keros, die des Sia, die des Paddon,
४७केरोस, सीया, पादोन
48 die Söhne des Lebana, die des Chazaba, die des Salmai,
४८लबाना, हगाबा, सल्माई
49 die Söhne des Chanan, die des Giddel, die des Gachar,
४९हानान, गिद्देल, गहार.
50 die Söhne des Reaja, die des Resin, die des Nekoda,
५०राया, रसीन, नकोदा
51 die Söhne des Gazzam, die des Uzza, die des Peseach,
५१गज्जाम, उज्जा. पासेहा
52 die Söhne des Besai, die der Mëuniter, die der Nephisiter,
५२बेसई, मऊनीम, नफूशेसीम.
53 die Söhne des Bakbuk, die des Chakupha, die des Charchur,
५३बकबूक, हकूफ, हर्हूराचे
54 die Söhne des Baslit, die des Mechida, die des Charsa,
५४बसलीथ, महीद, हर्शा
55 die Söhne des Barkos, die des Sisera, die des Temach,
५५बार्कोस, सीसरा, तामह
56 die Söhne des Nesiach, die des Chatipha,
५६नसीहा आणि हतीफा
57 die Söhne der Sklaven Salomos: die Söhne des Sotai, die Sopherets (der Schreiberin), die des Perida,
५७शलमोनच्या सेवकांचे वंशज: सोताई, सोफेरेथ, परीदा
58 die Söhne des Jaala, die des Darkon, die des Giddel,
५८याला, दार्कोन, गिद्देल
59 die Söhne des Sephatja, die des Chattil, die Söhne der Pokeret der Gazellen, die des Amon,
५९शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम आणि आमोन.
60 alle Tempelsklaven und Söhne der Sklaven Salomos 392.
६०मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनाच्या सेवकांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते.
61 Dies sind die, die aus Tel Melach, Tel Charsa, Cherub, Addon und Immer hergezogen sind, aber nicht haben dartun können, ob ihr Haus und ihre Abstammung israelitisch seien:
६१तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरूशलेमेला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलामधलीच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असेः
62 die Söhne des Delaja, die des Tobia und die des Nekoda 642,
६२दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज सहाशे बेचाळीस.
63 und von den Priestern die Söhne des Chabaja, die des Hakkos und die Söhne Barzillais, der eine von den Töchtern des Gileaditers Barzillai sich zum Weibe genommen hatte und dann nach ihrem Namen benannt ward.
६३आणि याजकांपैकीः हबाया, हक्कोस, बर्जिल्ल्या (गिलादाच्या बर्जिल्याच्या कन्येशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई).
64 Diese hatten ihre Geschlechtsurkunde gesucht. Sie fand sich aber nicht vor, und so wurden sie vom Priestertum ausgeschlossen.
६४काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकांच्या यादीतून काढून टाकले.
65 Da sprach der Tirsata zu ihnen, sie dürften vom Hochheiligen so lange nicht essen, bis daß ein Priester für Urim und Tummim erstünde.
६५अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने याबाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते.
66 Die ganze Gemeinde, alles in allem, belief sich auf 42.360,
६६सर्व मंडळीतले मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ लोक होते.
67 nicht eingerechnet ihre Sklaven und die Sklavinnen, an Zahl 7.387; auch hatten sie 200 Sänger und Sängerinnen.
६७यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस स्त्री-पुरुष सेवक व दोनशे पंचेचाळीस गायक व गायिका होत्या.
68 Und ihrer Pferde waren es 736, ihrer Maultiere 245,
६८त्यांच्याजवळ सातशे छत्तीस घोडे, दोनशे पंचेचाळीस खेचरे,
69 ihrer Kamele 435, ihrer Esel 6.720.
६९चारशे पस्तीस उंट आणि सहा हजार सातशे वीस गाढवे होती.
70 Und einige von den Familienhäuptern spendeten in den Werkschatz; der Tirsata spendete für den Schatz an Gold 1.000 Drachmen, 50 Sprengschalen, 530 Priesterkleider.
७०घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने एक हजार दारिक सोने, पन्नास वाट्या, याजकांसाठी पाचशे तीस वस्त्रे दिली.
71 Einige von den Familienhäuptern spendeten in den Werkschatz an Gold 20.000 Drachmen und an Silber 2.200 Minen.
७१काही घराण्याच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला वीस हजार दारिक सोने आणि दोन हजार दोनशे माने रुपे देखील दिले.
72 Und was das übrige Volk gab, betrug an Gold 20.000 Drachmen und an Silber 2.000 Minen und was das übrige Volk gab, betrug an Gold 20.000 Drachmen, an Silber 2.000 und 67 Priesterkleider.
७२इतर सर्व लोकांनी मिळून वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि याजकांसाठी सदुसष्ट वस्त्रे दिली.
73 Die Priester aber und die Leviten, die Torhüter, die Sänger und die Leute aus dem Volke sowie die Tempelsklaven und ganz Israel wohnten in ihren Städten. Da kam der siebte Monat heran. Die Söhne Israels waren schon in ihren Städten.
७३अशाप्रकारे याजक, लेवीच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत: च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.

< Nehemia 7 >