< Job 40 >
1 Der Herr erwiderte dem Job und sprach:
१परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला,
2 "Ist nun der Streit mit dem Allmächtigen zu Ende? Wer Gott anklagt, antworte drauf!"
२“तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?
3 Und Job erwiderte dem Herrn und sprach:
३मग ईयोबने परमेश्वरास उत्तर देऊन म्हटले,
4 "Ich bin doch zu gering, daß ich Dir Antwort gebe; ich lege meine Hand auf meinen Mund.
४मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
5 Einmal hab ich geredet; ich widerspreche nimmer. Ein zweitesmal tu ich's nicht wieder."
५पाहा, मी एकदा बोललो होतो पण आता अधिक बोलणार नाही. मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.
6 Der Herr erwiderte dem Job nach diesem Wettersturm und sprach:
६नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबशी बोलला तो म्हणाला:
7 "Auf, gürte deine Lenden wie ein Mann! Ich will dich fragen; du belehre mich!
७तू आता कंबर कसून उभा राहा आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.
8 Willst du mein Recht vielleicht zunichte machen und mich verdammen, daß du Recht behältst?
८मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करून तू स्वत: चे निरपराधित्व सिध्द करु पाहत आहेस.
9 Hast du denn einen Arm wie Gott? Kannst du gleich diesem donnern lassen?
९तुझे बाहू देवाच्या बाहूइतके शक्तीशाली आहेत का? देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?
10 Mit Hoheit schmücke dich und mit Erhabenheit. Umkleide dich mit Glanz und Herrlichkeit!
१०तू स्वत: ला महीमा व प्रताप यांचे भुषण कर, तेज व वैभव हे धारण कर.
11 Laß deines Zornes Gluten sich ergießen! Und wirf mit deinen Blicken jeden Stolzen nieder!
११तुझ्या रागाला भरती येवू दे, आणि प्रत्येक गर्वीष्ठास तू खाली आण आणि गर्विष्ठ लोकांस शिक्षा करु शकतोस. गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस.
12 Mit einem Blick demütige jeden Stolzen! An ihrem Orte wirf die Frevler nieder!
१२होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर वाईट लोकांस जागच्या जागी चिरडून टाक.
13 Verbirg im Staube sie zumal. Und steck ihr Angesicht an den verborgenen Ort!
१३त्यांना चिखलात पुरुन टाक त्यांचे तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.
14 Dann will auch ich dich loben, wenn du dir selber hilfst.
१४मग मी तुझी सत्यता जाणेल, मग तुझाच उजवा हात तुझा बचाव करील.
15 Das Nilpferd sieh dir an, das ich geschaffen, im Vergleich zu dir! Gleich einem Rinde frißt es Gras.
१५तू बेहेमोथ कडे बघ. मी तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. तो बैलासारखे गवत खातो.
16 Betrachte aber doch die Kraft in seinen Lenden und seine Stärke in den Muskeln seines Leibes!
१६त्याच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.
17 Gleich einer Zeder streckt es seinen Schweif hinaus. Die Sehnen seiner Schenkel, dicht verschlungen,
१७त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
18 und seine Knochen sind wie eherne Röhren, und seine Beine sind wie Eisenstäbe.
१८त्याची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
19 Es ist dies Gottes Meisterwerk; sein Schöpfer gab ihm eine Sichel.
१९बेहेमोथ हा अतिशय आश्चर्यकारक प्राणी मी निर्माण केला आहे. परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.
20 Die Berge liefern ihm das Futter; es spottet aller wilden Tiere.
२०डोंगरावर जिथे जंगली श्वापदे खेळतात तिथले गवत खातो.
21 Und unter Lotosbüschen lagert's dort in dem Versteck von Rohr und Schilf.
२१तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.
22 Und Lotosbüschel überdachen es als Schattenspender; des Baches Weiden halten es umfangen.
२२कमळाचे झाड त्यास आपल्या सावलीत लपवते तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.
23 Wenn sich ein Strom ergießt, wird ihm nicht bange. Es bleibt getrost, ergösse sich ein Jordan ihm ins Maul.
२३नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही विश्वासात स्थिर राहतो.
24 Kann man's mit seinen Augen bannen? Will man mit Stricken wohl die Nase ihm durchbohren?
२४त्यास कोणी गळ टाकून धरू शकेल. किंवा त्यास सापळ्यात अडकवू शकेल.”