< 5 Mose 2 >

1 "Wir machten kehrt, zogen nach der Steppe auf das Schilfmeer zu, wie der Herr zu mir gesagt, und kreisten lange Zeit um das Gebirge Seïr.
मोशे आणखीन पुढे म्हणाला; “परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानात निघालो बरेच दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो.
2 Da sprach der Herr zu mir:
परमेश्वर तेव्हा मला म्हणाला,
3 'Genug eures Kreisens um dieses Gebirge! Wendet euch nach Norden!
‘या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा.
4 Dem Volke befiehl also: "Ihr wollt durch das Gebiet der Söhne Esaus ziehen, eurer Brüder, die in Seïr wohnen. Sie werden euch fürchten. Aber nehmt euch in acht!
आणि लोकांस आणखी एक सांग, तुम्हास वाटेत सेईर लागेल. ती भूमी एसावाच्या वंशाजांची, तुमच्या भाऊबंदांची आहे त्यांना तुमची भीती वाटेल तेव्हा सांभाळा.
5 Befehdet sie nicht! Ich gebe euch keinen Fußbreit von ihrem Land; denn ich habe Esau das Gebirge Seïr zum Besitz verliehen.
त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावाला वतन म्हणून दिला आहे.
6 Ihr sollt ihnen für Geld Speise abkaufen, die ihr eßt, und Wasser von ihnen erhandeln, das ihr trinkt!'
तुमचे अन्न पैसे देवून, विकत घेवून खा. पाणीही विकत घेवून प्या.
7 Der Herr, dein Gott, hat dich ja gesegnet in all deinem Händewerk. Er sorgt für deinen Marsch durch diese große Steppe. Vierzig Jahre ist der Herr, dein Gott, mit dir. Dir hat nichts gefehlt.
तुमच्या हातच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास आशीर्वादीत केले आहे. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत राहीला आहे. तुम्हास कशाचीही वाण पडली नाही.’
8 Wir zogen vorüber an unseren Brüdern, den Söhnen Esaus zu Seïr, auf der Arabastraße, vorüber an Elat und Esiongeber. Wir wandten uns und zogen auf Moabs Steppe zu.
तेव्हा एसावचे वंशज राहत असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन-गेबेर वरून येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबाच्या रानातल्या रस्त्याला आपण वळालो.
9 Da sprach der Herr zu mir: 'Befehde nicht die Moabiter! Stürze dich in keinen Kampf mit ihnen! Ich gebe dir ja von ihrem Lande nichts zu eigen; denn ich habe Ar den Söhnen Lots zum Besitz verliehen.'
परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव करू नका. त्यांच्याशी युद्धाचा प्रंसग आणू नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.’”
10 Vordem wohnten die Emiter darin, ein Volk, so groß, zahlreich und hochgewachsen wie die Enakiter.
१०पूर्वी तेथे एमी लोक राहत असत. ते बहुसंख्य, धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते.
11 Auch sie gelten als Rephaiter, wie die Enakiter. Die Moabiter nennen sie Emiter.
११या एमींना लोक अनाकी यांच्याप्रमाणेच रेफाई समजत असत. पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.
12 In Seïr saßen vordem die Choriter. Die Esausöhne aber besiegten und vertilgten sie und siedelten an ihrer Stelle, wie Israel mit dem Land getan, das ihm der Herr zu eigen gegeben.
१२पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत. पण एसावाच्या वंशजांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वत: वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्राएलींनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले.
13 'Nun auf! Setzt über den Zaredbach!' Da überschritten wir den Bach Zared.
१३“मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले.” त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो.
14 Wir sind achtunddreißig Jahre unterwegs gewesen, von Kades Barnea bis zur Überschreitung des Zaredbaches. Bis dahin war das ganze Geschlecht der Kriegsmänner aus dem Lager weggestorben, wie es ihnen der Herr geschworen hatte.
१४कादेश बर्ण्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या पिढीतील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने शपथ वाहिल्या प्रमाणे हे झाले.
15 Die Hand des Herrn war aber gegen sie gewesen, um sie voll aus dem Lager zu vertilgen.
१५त्यांचा समूळ नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा त्यांच्यावर हात उगारलेला होता
16 Als alle Kriegsmänner aus dem Volke weggestorben waren,
१६ह्याप्रकारे सर्व योद्धे मरण पावले, ती पिढी नामशेष झाली,
17 sprach der Herr zu mir:
१७परमेश्वर मला म्हणाला,
18 'Du ziehst heute durch die Grenzmark Moabs und an Ar vorüber
१८“तुला आज मवाबाची सीमा ओलांडून आर नगरापलीकडे जायचे आहे.
19 und näherst dich den Ammonitem. Befehde und befeinde sie nicht! Ich gebe dir ja vom Ammoniterlande nichts zu eigen; denn ich habe es den Söhnen Lots zu eigen gegeben.'
१९तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करू नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.”
20 Es gilt auch als Rephaiterland. Vordem wohnten darin Rephaiter, von den Ammonitern Samsummiter genannt.
२०त्या भागाला “रेफाई देश” असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना “जमजुम्मी” म्हणत.
21 Leute waren es, so groß, zahlreich und hochgewachsen wie die Enakiter. Der Herr aber vertilgte sie vor ihnen. Und so nahmen sie ihr Land und siedelten an ihrer Stelle.
२१जमजुम्मी संख्येने पुष्कळ व सशक्त होते. अनाकी लोकांप्रमाणे ते धिप्पाड होते. पण त्यांचा संहार करायला अम्मोनी लोकांस परमेश्वराचे साहाय्य होते. आता त्या जमिनीचा ताबा घेऊन अम्मोनी तेथे राहतात.
22 So hatte er auch für die Esausöhne zu Seïr getan. Vor ihnen vertilgte er die Choriter. So nahmen sie ihr Land und wohnten an ihrer Stelle bis auf den heutigen Tag.
२२एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहत असत. त्यांनी त्यांना हुसकावून लावले. पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजपर्यंत ते तेथे राहतात.
23 Auch die Awwiter, die in Gehöften bis nach Gaza wohnten, waren vernichtet worden durch die Kaphtoriter, die aus Kaphtor auswanderten, und diese siedelten an ihrer Stelle.
२३त्याचप्रमाणे अव्वी लोक गज्जापर्यंतच्या खेड्यात वस्ती करून होते, त्यांचा कफतोराहून आलेल्या कफतोरी लोकांनी उच्छेद करून त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहत आहेत.
24 'Auf! Zieht hin und setzt über den Arnonbach! Siehe! Ich gebe in deine Hand den Amoriter Sichon, Chesbons König, mit seinem Lande. Fang an mit dem Erobern! Greif sie an!
२४पुढे परमेश्वर मला म्हणाला, “आता उठा व आर्णोनाचे खोरे ओलांडून जा. हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन व त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, तो देश आपल्या ताब्यात घे आणि त्यास लढाईला प्रवृत्त कर.
25 Von jetzt an breite ich Furcht und Schrecken vor dir auf die Völker unter dem ganzen Himmel. Sobald sie von dir hören, sollen sie vor dir zittern und beben.'
२५तुमच्याविषयी या सर्व आकाशाखालच्या लोकांच्या मनात आज अशी भीती व दहशत निर्माण करीन की, तुमचे वर्तमान ऐकताच ते थरथर कापतील व भयभीत होतील.”
26 Da sandte ich von der Steppe Kedemot Boten an Chesbons König Sichon mit friedlichen Worten:
२६मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दूताकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की,
27 'Ich möchte dein Land durchziehen, will aber nur auf der Straße bleiben und weder rechts noch links abbiegen.
२७“तुमच्या देशातून आम्हास जाऊ दे. आमची वाट सोडून आम्ही उजवीडावीकडे वळणार नाही.
28 Speise sollst du mir um Geld verkaufen, damit ich esse, und Wasser um Geld mir geben, damit ich trinke! Ich will nur durchziehen.'
२८तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पाणीही पैसे घेऊन विकत प्यायवयास दे, आम्हास फक्त इथून पलीकडे पायी जाऊ दे.
29 Dies haben mir die Esausöhne zu Seïr und die Moabiter zu Ar gestattet, bis ich über den Jordan in das Land ziehe, das der Herr, unser Gott, uns geben will.
२९यार्देनपलीकडे आमचा देव परमेश्वर आम्हास देणार असलेल्या जमिनीपर्यंत आम्हास जायचे आहे. सेईरच्या एसाव लोकांनी आणि आर येथील मवाबी लोकांनी आम्हास जाऊ दिले तसेच तूही कर.”
30 Doch Chesbons König, Sichon, wollte uns nicht durchziehen lassen; denn der Herr, dein Gott, hatte seinen Sinn verhärtet und sein Herz verstockt, um ihn in deine Hand zu geben, wie es jetzt ist.
३०पण हेशबोनचा राजा सीहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्यास पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यास कठोर केले. त्याचे मन कठीण केले. आज तुम्ही पाहातच आहात की तो देश आपल्या हाती आहे.
31 Da sprach der Herr zu mir: 'Siehe! Ich mache den Anfang damit, daß ich dir Sichon und sein Land preisgebe. Fang an, sein Land zu besetzen!'
३१परमेश्वर मला म्हणाला, “सीहोन राजा आणि त्याचा देश हे मी तुमच्या हवाली करत आहे. त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून त्यांचा ताबा घे.”
32 Und Sichon zog uns mit seinem gesamten Volke zum Streite nach Jahas entgegen.
३२आणि तेव्हा सीहोन व त्याची प्रजा याहस येथे आमच्याबरोबर लढाईसाठी सज्ज झाले.
33 Da gab ihn der Herr, unser Gott, uns preis. Wir schlugen ihn samt seinen Söhnen und seinem ganzen Volke.
३३परमेश्वर देवाने त्यास आपल्या ताब्यात दिले म्हणून आम्ही त्याचा, त्याच्या मुलांचा व सर्व लोकांचा पराभव करू शकलो.
34 Damals nahmen wir auch alle seine Städte und bannten jede Stadt, selbst schwächliche Männer, Weiber und Kinder. Niemanden haben wir entrinnen lassen.
३४त्यांच्या सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला व पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे ह्याच्यासह सर्वांचा समूळ नाश केला, कोणालाही जिवंत ठेवले नाही.
35 Nur das Vieh und das Plündergut der von uns eroberten Städte haben wir für uns erbeutet.
३५तेथील पशू आणि जिंकलेल्या नगरातील लुट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली.
36 Von Aroër am Ufer des Arnonflusses und von der Stadt im Tale bis nach Gilead ist keine Feste uns zu steil gewesen. Alles hat der Herr, unser Gott, uns preisgegeben.
३६आर्णोन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोएर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एक नगर तसेच आर्णोन खोरे ते गिलादापर्यंत सर्व नगरे, आमचा देव परमेश्वर याने आम्हास दिली. आम्हास दुर्गम असे एकही नगर नव्हते.
37 Nur dem Ammoniterlande bist du nicht genaht, allem, was seitwärts vom Jabbokflusse liegt, samt den Städten im Gebirge, wie der Herr, unser Gott, befohlen hatte."
३७अम्मोन्याचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही गेलो नाही. कारण आमचा देव परमेश्वर याने तेथे जाण्यास बंदी केली होती.

< 5 Mose 2 >