< Josua 6 >

1 Und Jericho hatte seine Tore geschlossen und war verriegelt vor den Kindern Israel; niemand ging aus, und niemand ging ein.
इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.
2 Und Jehova sprach zu Josua: Siehe, ich habe Jericho und seinen König und die streitbaren Männer in deine Hand gegeben.
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत.
3 Und ihr sollt die Stadt umziehen, alle Kriegsleute, einmal rings um die Stadt her; also sollst du sechs Tage tun.
तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा.
4 Und sieben Priester sollen sieben Hallposaunen vor der Lade hertragen. Und am siebten Tage sollt ihr die Stadt siebenmal umziehen, und die Priester sollen in die Posaunen stoßen.
सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत,
5 Und es soll geschehen, wenn man das Lärmhorn anhaltend bläst, wenn ihr den Schall der Posaune höret, so soll das ganze Volk ein großes Geschrei erheben; und die Mauer der Stadt wird an ihrer Stelle einstürzen, und das Volk soll hinaufsteigen, ein jeder gerade vor sich hin.
नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घ नाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भिंती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.”
6 Und Josua, der Sohn Nuns, rief die Priester und sprach zu ihnen: Nehmet die Lade des Bundes auf, und sieben Priester sollen sieben Hallposaunen vor der Lade Jehovas hertragen.
नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे.”
7 Und er sprach zu dem Volke: Gehet hin und umziehet die Stadt; und die Gerüsteten sollen vor der Lade Jehovas hergehen.
तो लोकांस म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.”
8 Und es geschah, als Josua zu dem Volke geredet hatte, da zogen die sieben Priester hin, welche die sieben Hallposaunen vor Jehova hertrugen, und stießen in die Posaunen; und die Lade des Bundes Jehovas folgte hinter ihnen.
यहोशवाने लोकांस सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे एडक्याच्या शिंगांचे सात कर्णे वाजवत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला.
9 Und die Gerüsteten zogen vor den Priestern her, welche in die Posaunen stießen, und der Nachzug ging hinter der Lade her, indem sie fort und fort in die Posaunen stießen.
सशस्त्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते.
10 Und Josua hatte dem Volke geboten und gesagt: Ihr sollt kein Geschrei erheben und eure Stimme nicht hören lassen, und kein Wort soll aus eurem Munde gehen; bis zu dem Tage, da ich zu euch sage: Erhebet ein Geschrei! Dann sollt ihr ein Geschrei erheben.
१०मग यहोशवाने लोकांस अशी आज्ञा केली की, मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, “त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका; मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा.”
11 Und die Lade Jehovas umzog die Stadt, einmal rings um sie her; und sie kamen in das Lager und übernachteten im Lager.
११या प्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला.
12 Und Josua machte sich des Morgens früh auf, und die Priester trugen die Lade Jehovas.
१२यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कराराचा कोश उचलून घेतला.
13 Und die sieben Priester, welche die sieben Hallposaunen vor der Lade Jehovas hertrugen, gingen fort und fort und stießen in die Posaunen; und die Gerüsteten zogen vor ihnen her, und der Nachzug ging hinter der Lade Jehovas her, indem sie fort und fort in die Posaunen stießen.
१३सात याजक एडक्याच्या शिंगांचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी वाजवीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; कर्णे वाजवले जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कराराच्या कोशामागे चालत होते.
14 Und sie umzogen die Stadt am zweiten Tage einmal und kehrten in das Lager zurück. Also taten sie sechs Tage.
१४ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले.
15 Und es geschah am siebten Tage, da machten sie sich früh auf, beim Aufgang der Morgenröte, und umzogen die Stadt nach dieser Weise siebenmal; nur an selbigem Tage umzogen sie die Stadt siebenmal.
१५सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या.
16 Und es geschah beim siebten Male, als die Priester in die Posaunen stießen, da sprach Josua zu dem Volke: Erhebet ein Geschrei! Denn Jehova hat euch die Stadt gegeben.
१६सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांस म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे;
17 Und sie Stadt, sie und alles, was darin ist, soll dem Jehova ein Bann sein; nur Rahab, die Hure, soll am Leben bleiben, sie und alle, die bei ihr im Hause sind, weil sie die Boten versteckt hat, die wir ausgesandt haben.
१७हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वरास समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्यासोबत तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.
18 Ihr aber, hütet euch nur vor dem Verbannten, damit ihr nicht verbannet und doch von dem Verbannten nehmet und das Lager Israels zum Banne machet und es in Trübsal bringet.
१८तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वदा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल, तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणाल व तिला संकटात पाडाल.
19 Und alles Silber und Gold, samt den ehernen und eisernen Geräten, soll Jehova heilig sein: in den Schatz Jehovas soll es kommen.
१९पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.”
20 Und das Volk erhob ein Geschrei, und sie stießen in die Posaunen. Und es geschah, als das Volk den Schall der Posaunen hörte, und als das Volk ein großes Geschrei erhob, da stürzte die Mauer an ihrer Stelle ein, und das Volk stieg in die Stadt hinein, ein jeder gerade vor sich hin, und sie nahmen die Stadt ein.
२०तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि कर्णे वाजत राहिले, कर्ण्यांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते काबीज केले.
21 Und sie verbannten alles, was in der Stadt war, vom Manne bis zum Weibe, vom Knaben bis zum Greise, und bis zu den Rindern und Schafen und Eseln, mit der Schärfe des Schwertes. -
२१त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला.
22 Und Josua sprach zu den beiden Männern, die das Land ausgekundschaftet hatten: Gehet in das Haus der Hure, und führet das Weib und alle ihre Angehörigen von dannen heraus, wie ihr es ihr geschworen habt.
२२तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.”
23 Da gingen die Jünglinge, die Kundschafter, hinein und führten Rahab und ihren Vater und ihre Mutter und ihre Brüder und alle ihre Angehörigen hinaus: alle ihre Geschlechter führten sie hinaus; und sie ließen sie außerhalb des Lagers Israels. -
२३तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आई-वडीलांना, भाऊबंदांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले.
24 Und die Stadt und alles, was darin war, verbrannten sie mit Feuer; nur das Silber und das Gold und die ehernen und die eisernen Geräte legten sie in den Schatz des Hauses Jehovas. -
२४मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली.
25 So ließ Josua Rahab, die Hure, und das Haus ihres Vaters und alle ihre Angehörigen am Leben; und sie hat in der Mitte Israels gewohnt bis auf diesen Tag, weil sie die Boten versteckte, welche Josua abgesandt hatte, um Jericho auszukundschaften.
२५यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या वडिलांचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वस्ती करून आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते.
26 Und Josua schwur in selbiger Zeit und sprach: Verflucht vor Jehova sei der Mann, der sich aufmachen und diese Stadt Jericho bauen wird! Mit seinem Erstgeborenen wird er ihren Grund legen und mit seinem Jüngsten ihre Tore aufstellen. -
२६त्या वेळी यहोशवाने त्यांना शपथ घातली आणि तो त्यांना म्हणाला की, “जो कोणी यरीहो नगर पुन्हा बांधील त्यास परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”
27 Und Jehova war mit Josua, und sein Ruf verbreitete sich durch das ganze Land.
२७याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.

< Josua 6 >