< Jeremia 15 >
1 Und Jehova sprach zu mir: Wenn auch Mose und Samuel vor mir ständen, so würde meine Seele sich nicht zu diesem Volke wenden. Treibe sie von meinem Angesicht hinweg, daß sie fortgehen.
१तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “मोशे आणि शमुवेल जरी या लोकांसाठी विनवणी करण्यास माझ्या समोर उभे राहिले, तरी माझे या लोकांच्या बाजूस समर्थन नसते. त्यांना माझ्यासमोरून दूर पाठव, ते निघून जावोत.
2 Und es soll geschehen, wenn sie zu dir sagen: Wohin sollen wir fortgehen? so sage ihnen: So spricht Jehova: Wer zum Tode bestimmt ist, gehe zum Tode; und wer zum Schwerte, zum Schwerte; und wer zum Hunger, zum Hunger; und wer zur Gefangenschaft, zur Gefangenschaft.
२असे होईल की ते तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो: जे मरणासाठी निवडले आहे, ते मरणासाठी. जे तलवारीसाठी निवडलेले आहेत, ते तलवारीसाठी, जे उपासमारासाठी निवडले आहे; ते उपासमारीसाठी जावोत. आणि जे कैदेसाठी आहेत ते कैदेत जावोत.
3 Denn ich bestelle über sie vier Arten von Übeln, spricht Jehova: Das Schwert zum Würgen, und die Hunde zum Zerren [Eig. Herumzerren, Herumsschleppen, ] und das Gevögel des Himmels und die Tiere der Erde zum Fressen und zum Vertilgen.
३मी त्यांना चार गटात सोपवून देईन; मारण्यास तलवार, फाडून टाकण्यासाठी कुत्री, आणि आकाशांतले पक्षी व भूमीवरील पशू, परमेश्वर असे म्हणतो.
4 Und ich will sie zur Mißhandlung hingeben allen Königreichen der Erde, um Manasses willen, des Sohnes Hiskias, des Königs von Juda, wegen dessen, was er in Jerusalem getan hat. -
४पृथ्वीवरच्या सर्व राज्यांत मी त्यांना भयंकर गोष्ट असे करीन, मनश्शेने, हिज्कीयाचा मुलगा, यहूदाचा राजा, याने जे यरूशलेममध्ये केले, या कारणास्तव मी असे करीण.
5 Denn wer wird sich über dich erbarmen, Jerusalem, und wer dir Beileid bezeigen, und wer wird einkehren, um nach deinem Wohlergehen zu fragen?
५हे यरूशलेम, तुझ्यावर कोण दया करणार, आणि कोण दु: खाने तुझ्यासाठी आक्रोश करणार? तुझी विचारपूस करायला कोण वळणार?
6 Du hast mich verstoßen, spricht Jehova, du gingst [O. gehst] rückwärts; und so werde ich meine Hand wider dich ausstrecken [Eig. und so habe ich ausgestreckt usw., bis zum Schluß von Vers 8 [prophetisches Perfektum]] und dich verderben; ich bin des Bereuens müde.
६तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस. म्हणून मी माझ्या हाताने तुला फटकारील आणि नाश करीन. तुझ्यावर दया करून मी थकलो आहे.
7 Und ich werde sie mit der Worfschaufel zu den Toren des Landes hinausworfeln; ich werde mein Volk der Kinder berauben, es zu Grunde richten. Sie sind von ihren Wegen nicht umgekehrt.
७म्हणून मी त्यांना देशाच्या दारात सुपाने पाखडणार आहे. मी त्यांना त्यांच्या मुलापासून वेगळे केले आहे, जर ते आपल्या मार्गातून फिरले नाहीत, तर मी माझ्या लोकांचा नाश करणार
8 Ihre Witwen werden mir zahlreicher sein als der Sand der Meere; ich bringe ihnen über die Mütter der Jünglinge einen Verwüster am hellen Mittag, lasse plötzlich Angst und Schrecken auf sie [d. i. die Mütter] fallen.
८मी समुद्रातील वाळूपेक्षा त्यांच्या विधवांची संख्या जास्त करीन. भर मध्यान्ही मी तरुणांच्या आईविरूद्ध विध्वंसक पाठवील. मी त्यांच्यावर धडकी आणि भये अकस्मात पाडील.
9 Die sieben gebar, verschmachtet, sie haucht ihre Seele aus; ihre Sonne ist untergegangen, als es noch Tag war; sie ist beschämt und zu Schanden geworden. Und ihren Überrest werde ich dem Schwerte hingeben angesichts ihrer Feinde, spricht Jehova.
९आईचे सात मुलांना जन्म देने वाया जाईल. असतील तरी ती सर्व मरतील. ती धापा टाकेल, दिवस असताही तीचा सूर्य मावळेल. ती लाजवली आणि शरमलेली केली जाईल, कारण मी तिच्यात उरलेले शत्रूंच्या तलवारीला सोपून देईन. परमेश्वर असे म्हणतो.
10 "Wehe mir, meine Mutter, daß du mich geboren hast, einen Mann des Haders und einen Mann des Zankes für das ganze Land! Ich habe nicht ausgeliehen, und man hat mir nicht geliehen; alle fluchen mir." -
१०माझ्या आई, मला हाय हाय! कारण सर्व पृथ्वीला वाद आणि यूक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे. मला कोणाचे देणे नाही, किंवा त्यांनी मला काही देणे नाही, तरी पण ते सर्व मला शाप देतात.
11 Jehova spricht: Wenn ich dich nicht zum Guten stärken [Nach and. Les.: befreien, ] wenn ich nicht machen werde, daß zur Zeit des Unglücks und zur Zeit der Bedrängnis der Feind dich bittend angeht!
११परमेश्वर म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला तारले नाही काय? खचित संकटे आणि दुःखाच्यावेळी शत्रू तुझ्याजवळ मदतीस विनंती करत येतील असे मी करीन.
12 Kann man Eisen, Eisen aus Norden, und Erz zerbrechen? [O. Kann Eisen usw. brechen?]
१२कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खासकरुन ते उत्तरेकडून, लोखंड आणि कास्य मिश्रित असेल तर?
13 Dein Vermögen und deine Schätze will ich zur Beute geben ohne Kaufpreis, und zwar wegen all deiner Sünden und in allen deinen Grenzen.
१३मी तुझी संपत्ती आणि धन लूट असे देईन, ही तुमच्या सर्व पापांची किंमत असेल, जे तुम्ही आपल्या सिमांच्या आत केली आहेत.
14 Und ich werde es deine Feinde bringen lassen [Eig. mit deinen Feinden hinübergehen lassen., ] in ein Land das du nicht kennst; denn ein Feuer ist entbrannt in meinem Zorn, über euch wird es brennen. -
१४तुझे शत्रू तुला माहित नाही अश्या देशात तुला नेतील, असे मी करीन. कारण माझ्या रागात अग्नी पेटला आहे, तो तुम्हास जाळेल.
15 Jehova, du weißt es ja; gedenke meiner und nimm dich meiner an und räche mich an meinen Verfolgern! Raffe mich nicht hin nach deiner Langmut [d. h. indem du meinen Feinden gegenüber langmütig bist; ] erkenne, daß ich um deinetwillen Schmach trage.
१५परमेश्वरा, तू जाणतोस, माझी आठवण ठेव व मदत कर. माझ्या करीता, माझ्या माझ्यापाठीस लागणाऱ्यांविरूद्ध सूड घे. तुझ्या सहनशीलतेत मला दूर घालवू नकोस, तुझ्याकरीता मी दु: ख सहन केले, हे जाण.
16 Deine Worte waren vorhanden, und ich habe sie gegessen, und deine Worte waren mir zur Wonne und zur Freude meines Herzens; denn ich bin nach deinem Namen genannt, Jehova, Gott der Heerscharen.
१६मला तुझी वचने सापडली, आणि ती मी खाल्ली. तुझे वचन माझ्या हृदयाचा आनंद आणि हर्ष अशी झाली. कारण तुझे नाव मला ठेवले आहे, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
17 Ich saß nicht im Kreise der Scherzenden und frohlockte; wegen deiner Hand saß ich allein, weil du mit deinem Grimm mich erfüllt hast.
१७लोकांच्या आनंदात आणि जल्लोषात मी बसलो नाही. तुझ्या हातामुळे मी एकटाच बसून राहिलो, कारण तू मला क्रोधाने भरले आहे.
18 Warum ist mein Schmerz beständig und mein Schlag tödlich? er will nicht heilen. Willst du mir wirklich wie ein trügerischer Bach sein, wie Wasser, die versiegen [Eig. nicht andauern?] -
१८माझे दुखणे निरंतरचे का आहे, आणि माझी जखम बरी न होणारी का आहे? आटून गेलेल्या दगलबाज झऱ्याप्रमाणे तू मला होशील काय?
19 Darum spricht Jehova also: Wenn du umkehrst, so will ich dich zurückbringen, daß du vor mir stehest [d. h. mir dienest; ] und wenn du das Köstliche vom Gemeinen ausscheidest [absonderst, ] so sollst du wie mein Mund sein. Jene sollen zu dir umkehren, du aber sollst nicht zu ihnen umkehren.
१९यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “यिर्मया, जर तू पश्चाताप करशील, तर मी तुला पुनर्संचयित करणार आणि तू माझ्या सेवेस उभा राहशील आणि माझी सेवा करशील. जर तू मुर्ख गोष्टींमधून मौल्यवान गोष्टी वेगळ्या करशील, तर तू माझे मुख असा होशील. लोक तुझ्याकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे परत जाणार नाहीस.
20 Und ich werde dich diesem Volke zu einer festen ehernen Mauer machen, und sie werden wider dich streiten, aber dich nicht überwältigen; denn ich bin mit dir, um dich zu retten und dich zu befreien, spricht Jehova.
२०मी तुला या लोकांसाठी पितळेचा बळकट कोट असा करीन. आणि ते तुझ्याशी लढतील, परंतू तुझ्यावर प्रबल होणार नाहीत, कारण तुला तारायला आणि मुक्त करायला मी तुझ्याजवळ आहे, असे परमेश्वर म्हणतो.
21 Und ich werde dich befreien aus der Hand der Bösen und dich erlösen aus der Faust der Gewalttätigen.
२१कारण मी तुला दुष्टाच्या हातातून सोडवेन आणि जुलमी राजाच्या हातातून तुला खंडून घईल.”