< Maatosa 10 >
1 Yesuusay bena kaaliza tamane nam77u
१येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला.
2 Tamane namm7u hawarista sunthay hayssafe kalizaysa; koyro Pixerosa getetiza Simona, Iza isha Indirasa Zabdosa na Yaqobene iza isha Yanisa
२तर त्या बारा प्रेषितांची नावे ही होती: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
3 Filiphosane Bertelemosa, Tomassane qaraxa shishiza Maatosa, Ilfosa na Yaqobene Tadosa,
३फिलिप्प व बर्थलमय, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय
4 Be bagas zili7etiza Simonane guyeppe Yesusa hayqos athi immida Asqoroto Yuda
४शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.
5 Hayta tamane namm7ata wurssi gede amanonta dereta gath bopitte Samariya asa katamma gelopite
५येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
6 atin Isra7ele keth gidida dhayda dorsatakko bite.
६तर त्याऐवजी इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढराकडे जा.
7 Bidine salo kawoteth matidess gidi sabakite.
७तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
8 Harganchata pathitte, hayqidayta hayqoppe denthite, inchiracha hargizayta geshite, daydanthata kesite inte mela ekidaysa mela immite
८रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
9 Worqa, bira woykko xarqimala gidin inte kissen oykofite.
९तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका.
10 Othnchas hachis hachis gidizazi koshiza gish inte oges giidi shinqqe, koshonta mayo, caamma woykko gufe eki bopitte.
१०सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे व पायातील वहाणा असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याला आपले अन्न मिळणे आवश्यक आहे.
11 Issi katama woykko issi mandara inte geliza wode intena mokkanade koyi demidi iza kethan shempitte heppe kezana gakanas hen takitte.
११ज्या कोणत्याही नगरात किंवा गावात तुम्ही जाल तेथे कोण योग्य व्यक्ती आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा.
12 Inte onna kethekka gelishe saro gite.
१२त्या घरात प्रवेश करतेवेळी येथे शांती असो, असे म्हणा.
13 He kethay sarotay besiza keth gidiko inte sarotay he kethas gido, sorotay besonta keth gidikko inte sarotay agidi intes simmo.
१३जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल.
14 Ay assikka intena mokki ekkanasine inte giza siyanas koyontade gidikko he ura kethappe woykko he katamaappe kezishe issta bolla yiza gomeppe inte atidaysas markka gidana mala inte to bolla diza guddula pitidi kezitte.
१४आणि जो कोणी तुम्हास स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका.
15 Ta intess tummu gays pirda galas he katmay bolla gakkana pirday Soodomma bolane Gamora bolla gakkida pirdappe deexo gidana.
१५मी तुम्हास खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.
16 Ta intena dorssa mala sudhumista gidora kitays. Hessa gish shosha mala cincatane wole mala ashikkista gidite.
१६लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
17 Assay intena oykkidi pirdiza dulatas shishana, ba mukuraben intena garafana, hessa gish istafe nagetite.
१७मनुष्यांविषयी सावध असा कारण ते तुम्हास न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील.
18 Ta gedon dere harizaytakkone kawotakko intena efana. Ista sinthenine amanonta asata sinthan inte markka gidana.
१८माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल.
19 Intena isti oykkiza wode nu ay gi hasa7ino, woz gi mal/th/s/e immino gi hirgoppitte. He wode inte gaanazi intes immistana.
१९जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्ही काय बोलायचे ते तुम्हाला सांगितले जाईल.
20 Intenan hasa7anay inte aawa ayanappe atin intena gidekista.
२०कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या देवाचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
21 Ishay ba isha hayqos aathi imana, aaway ba na bolla, nayti bena yelidayita bolla dendidi hamakal7anane hara asa wodhisana.
२१भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.
22 Ta gish asi wurikka intena ixxana. Gido atin wurseth gakkanaas mini eqiday izi atana.
२२माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल.
23 Asay intena inte diza heerape gooddikko haraso kichite. Ta intes tumu gaysi inte isra7eele katama wursi gakkonta dishin ta asa nayi yaana.
२३एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
24 Ashkaray godappe woykko kaalizadey kalethizadefe aadhena.
२४शिष्य त्याच्या गुरूपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही.
25 Tamarey bena tamarisizayssa mala woykko ashikaray goda mala gidikko hesi izas gidana. Keetha aawa be7el zebula giikko so asa ays hessafe iita geetene?
२५शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूलम्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे ठेवतील! लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा.
26 Hesa gish istas babopite; geemetiday qonconta qotetiday geeshi kezonta atena.
२६म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.
27 Ta intes dhumara yootidaysa poo7on haasa7ite haythan siyidayssa qonchen haasa7ite.
२७जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छतावरून गाजवा.
28 Asho wodhikofe atinshempppo wodhanas danda7ontaytas babopite hessafe ashone shemppone gaaname taman dhaysanas danda7izaysas babite. (Geenna )
२८जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या. (Geenna )
29 Issi santen bayzetiza nam77u gashe kafotappe isiniyakka inte salo aawa sheney baynda co kunda atiku.
२९दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.
30 haray ato shin inte hu7e iskeykka taybon dees.
३०आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत.
31 hessa gisha babopite daro gashe kafotape inte waagay aadhi bonchetidaza.
३१म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.
32 asa sinthan taas markatizades taaka salon diza ta aawa sinthan izades mrkatana.
३२जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन.
33 qase asa sinthan tana kadhidhade taka salon diza ta aawa sinthan iza kadhana.
३३पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
34 Ta biita bolla saroteth ehanas yida intes milatopo; maasha ehanas atin saroteth ehanas yabeyke.
३४असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे.
35 Tani yiday na aawappe, maca na aayipe, machcho bolotippe shaakanasa.
३५मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे.
36 Asas morkey so asa gidana.
३६सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील.
37 Taape aathidi ba aawa woykko ba aayo siiqizadey taas gidanas besena. Taape aathidi ba atuma na woykko, meeca na siiqiza uray taas gidanas besena.
३७जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही.
38 Mesqele tookidi tana kaalonta uray taas gidanas bessenna.
३८जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.
39 Be shemppo aashshanas koyza uray dhayses; ba shemppo ta gish aathi imizadey aashes.
३९जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील.
40 Intena moki ekizadey tanakka moki ekes. Tana mokki ekizadey tana kitidadekka moki ekess.
४०जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते.
41 Issi nabe nabetethan moki ekizadey he nabeza waga demana. Xillo ura iza xillotetha gish mokki ekkiko he xilloza waga ekkana.
४१जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल.
42 Hessa gish ta intess tummu gays onikka hayta guthatappe tana kalizade gidida gish issi xu7a irxa hath ushikko hiniskka wagay dhayena.
४२मी तुम्हास खरे सांगतो की, या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.