< Marqqossa 11 >
1 Isti gede Yerusalame Dabirazayte giza zumma achan diza Betefagenne Bitaniya gizaso matida wode Yesuay bena kalizaytappe namm7ata hizgi kitidi;
१जेव्हा ते यरूशलेम शहराजवळ जैतुनांच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की,
2 “Gede inte sinthan diza gutayo bitte, inte he gelida mala hen assi iza togi eronta qashon diza harre gutte inte demmana; birshidi iza ha ekiyitte.
२“समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.
3 Onikka intena hayssa ays ootheti? gikko Godas koshesn gidi yotite, izikka intes eeson zari yedana” gidees.
३आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
4 Isstikka bidi issi ketha karen oge bolla qachetti diza hare gutte demidi birshida.
४मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर, दाराशी एक शिंगरु बांधलेले आढळले मग त्यांनी ते सोडले.
5 Hen eqida issi issi asati “Hare guteza aazas birsheti” gi oychida.
५तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काहीजण त्यांना म्हणाले, “हे शिंगरु सोडून तुम्ही काय करीत आहात?”
6 Yesusa kalizayti Yesusay istas gidamala asatas yotin eero eki biite gida.
६त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते त्यांना सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरु नेऊ दिले.
7 Gutezakka Yesusakko ehidi ba mayo iza zokko bolla yegin Yesusay iza togidees.
७त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला.
8 Daro asay ba mayo kessi kessi ogge bolla micidees. Baga asay cilila mihta hathi qanxi qanxidi ogge bolla lalidees.
८पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.
9 Yesusappe sintharanne guyera diza asay qaala dhoqu hisitidi “Hossana Goda sinthan yizadey anjetidade.
९पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.
10 Hanna yizara nu aawa Dawite kawotehaya anjetidaro, hosana bolla salon Xoossi boncheto” gishe wassidees.
१०आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
11 Yesusay Yerusalame gakidi hessapekka maqidasse gelidees. He heran dizaysa wursi xelidi gadey qamida gish tamane namm7atara gede Bittanya kezides.
११नंतर येशूने यरूशलेम शहरात प्रवेश केल्यावर तो परमेश्वराच्या भवनात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला.
12 Wontetha galas issti Bittanyappe kezi bishin Yesusay gafides.
१२दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली.
13 Izi issi haythi cililida balase getetiza mith hahon beydi ayfey danakonne gidi izikko yidees. Giddo atin balase mith ayfonta wode gidida gish boncofe atin issi ayfeykka izippe demibeynna.
१३त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता.
14 Hessa gish mithiyo “Hanife guye medhinas onikka neppe ayfe moppo” gidees. Iza kalizaytikka izzi gizaysa siyida. (aiōn )
१४नंतर तो त्यास म्हणाला, “यापुढे सर्वकाळ तुझे फळ कोणीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले. (aiōn )
15 Gede Yerusalame bida heppeka gede maqidase gelidi hen bayzizaytanne shamizayta kessi godo oykidees. Mishe lamizayta xaraphezane wolle bayzizayta oyddee gufanthi gufanthi yegidees.
१५नंतर ते यरूशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलथून टाकली.
16 Onnikka ay miish tokidi maqidees gibe gidora adhonta mala digidees.
१६त्याने कोणालाही कसल्याच वस्तूंची परमेश्वराच्या भवनामधून नेआण करू दिली नाही.
17 Istakka tamarsishe “Ta kethi dere wursos Woossa keth gidana geteti xafetibeyne? Gido atin inte qasse kaysonta gongolo kesidista” gidees.
१७मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाभवन म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्यास लुटारूंची गुहा बनवली आहे.”
18 Qessista halaqatinne Muse woga tamarsizayti hessa siyidi iza wosti dhaysanakkone oogge koshu oykida. Giko atin dereykka iza timirttezan malaletida gish izas babida.
१८मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्यास ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्यास भीत होते.
19 Istika gadey qamin katamayppe kezi bida.
१९त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
20 Wontetha galas malado isti oggera adhi bishin balasse miththaya xaphoppe melidaro be7ida.
२०सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले.
21 Yozi iza wozanan akeketin Phixirosay Yesusa “Astammare hekko hanna ne qangida balaseya meladus” gidees.
२१पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “रब्बी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
22 Izikka zarid “Xossu ammanitte.
२२येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
23 Ta intes tummu gays (Oonikka hayssa zummaza ne dhoqalistada gede abban gela) gizakkone hessakka wozanan sidhonta ammanidakko izadees hanana.
२३मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.
24 Hessa gish inte wossan oychidaz wursi eekida mala ammanikko intes hanana.
२४म्हणून मी तुम्हास सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल.
25 Hessathokka inte wosas eqiza wode inte sallo aaway inte nagara atto gana mala intekka intena qohidayta nagarawursi atto gitte.
२५जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी.
26 Inte atto gonta ixikko inte sallo aawaykka inte nagara atto gena.” gides.
२६परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
27 Qassekka Yerusalamme yida. Yesusay maqidasse kare gidon gedene hanne yuyetishin qessista halaqati Muse woga tamarsizaytinne dere cimmati izakko shiqidi
२७ते परत यरूशलेम शहरास आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले.
28 “Haysa ne oothizay ay godatethara? Hayta ne oothana mala hayssamala godateth ness ooni immide?” gida.
२८आणि त्यास म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?”
29 Yesusaykka istas zaridi “Aanne takka intena issi oycho ooychaysi intekka tass zarikko takka ha yotta ay godatethara oothizakkonne intes yotana.
२९येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हास एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हास सांगेन.
30 Yanisa xinqatey Xoossafe ye asappe? anne tass zaritte” gidees.
३०योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.”
31 Isstikka ba garsan issay issara “Nu saloppe gikko izi nuna histin aazas iza ammanibeyketi? gana.
३१त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?
32 Nu asappekko gikko Yanisay tummu nabbe gididaysa derey wuri ammaniza gish hessaththo gana babida.
३२परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागवतील.” त्या लोकांची भीती वाटत होती कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
33 Hessa gish nu eerokko gidi Yesusas zarida. Yesusaykka “Histikko ta hayta aza godatethara oothizakkonne takka intes yotikke” gidees.
३३मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हास सांगत नाही.”