< Yanisa Mishiracho 5 >
1 Hesafe kalidi Ayhudista Ba7lley dizza gish Yesussay Yerussallame bideess.
१त्यानंतर यहूद्यांचा सण होता आणि येशू यरूशलेम शहरास वर गेला.
2 Yerusalamen doorsi gelizza pennge achchan iibrawista qalara Betesayda getettza issi pulltoofe shiqqida eloo hathey dees. Bollara kamay diza ichachu o7geti dettes.
२यरूशलेम शहरास, मेंढरे दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत.
3 Daro hargganchatti, ayyfe qooqeti, to woobetinne to silati ogge bolla zinniidi hathay qaxistana gakanas nagetees.
३त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे.
4 Isi isi woode Goda kiitanchay hathan woodhidi hatha qaththes. haththa qathafe kaldi koyrottdi hathan gelizza hargganchay bena sakiza ay hrggefekka paxes.
४कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यांत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.
5 Hen gadaan heedzdzu tammane oosppun laythth kumeth sakketida isadeey dess.
५तेथे अडतीस वर्षांपासून आजारी असलेला कोणीएक मनुष्य होता.
6 Yessusay Adezza hen zin7idayssa beyddine izi daro laythth saketdayssa eridi “ne paxxana kooyaz?” gidess.
६येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”
7 Hargganchazika zaridi “Godo haththay qaxxetiza woode tana hathan gelththiza assi dena, ta buroo bana gishshin harray tape kaseti hathan gelles.” gidess
७त्या आजारी मनुष्याने त्यास उत्तर दिले, “साहेब, पाणी हालविले जाते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही; आणि मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.”
8 Yesussayka Iza “dendda ne zin7ida algga tookada ba” gidess.
८येशू त्यास म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”
9 Adezzikka herakka paxxides. Be algga tooki ekidii bidess. Hessi hanidayy Ayhudista sambbata galassa.
९लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. तो दिवस शब्बाथ दिवस होता.
10 Hesa gish Ayhudista hallaqat paxxida Adezza “hach Sambbattara ne algga tokkana mala Musse wogay azazena” gida.
१०यावरुन यहूदी त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.”
11 Izikka Isttas “ne zini7ida algga tookkda ba gi yotides” gides.
११त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”
12 Isttikka “nena algga tookkada ba giday oonne?” gi oychchida.
१२त्यांनी त्यास विचारले, “आपली बाज उचलून चाल, असे ज्याने तुला म्हणले तो मनुष्य कोण आहे?”
13 Deerey darida gishinne Yesussay hepee hakki bida gish iza oonni paththidakonne adezzi eribeyna.
१३पण तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास माहित नव्हते; कारण त्याठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता.
14 Hesafe guye Yesussay Adeza Xoossa keeththan demmidi “hekoo ha7i ne paxadasa kaseysafe Adhizza iita miishi ne bolla gakontta mala nam77anththo nagara othofa” gides
१४त्यानंतर तो येशूला परमेश्वराच्या भवनात भेटला तेव्हा तो त्यास म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”
15 Adezikka bidinne iza pathiday Yesussa gididaysa Ayhudista dannatas yotides.
१५त्या मनुष्याने जाऊन यहूद्यांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”
16 Adezza sambbata gallas pathida gish Ayhudista dannat Yesussa oykkana yedi godida.
१६या कारणावरून यहूदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करत असे.
17 Yesussayka isstas “ta aaway wurso wode oothes, takka othana” gides
१७येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा स्वर्गीय पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे.”
18 Hesa gason ayhudista dannat Yesussa wodhana malla kaseppe aththi denththethida, qase izi sammbatta morida gish xalla gidontta “Xoossi ta aawa” gida gishshinne bena Xoossara ginssida gishasa.
१८यामुळे तर यहूदी त्यास जीवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले, कारण त्याने शब्बाथ मोडला एवढेच नाही, पण देवाला स्वतःचा पिता म्हणून त्याने स्वतःला देवासमान केले होते.
19 Yesussay isttsa hizgi zarrides “ta intes tummu gays aaway oothishin be7idaysa othoppe attin nazi ba shenen ayne otheena. Aaway othizaysa iza nay hessathoka oothes.
१९यावरुन येशूने त्यांना उत्तर दिले; “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून काहीही त्यास स्वतः होऊन करता येत नाही; कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो.
20 Gasoyka Aaway naaza doses ba othzaysakka wursi iza besees, inte malaletontta mala hayssafeka adhiza ootho buro bessana.
२०कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो स्वतः जे काही करतो ते त्यास दाखवतो आणि तुम्ही आश्चर्य करावे म्हणून तो याहून मोठी कामे त्यास दाखवील.
21 Aaway haqqidayta denththizaythone deyoo imizaysatho nazika hessathoo ba koydades deyoo immana.
२१कारण पिता जसा मरण पावलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.
22 Aaway oonna bollaka pirdeena gido attin pirda maata wuris ba nazas imiddes.
२२पिता कोणाचा न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे.
23 Izi hessaththo oththiday asay wuri aawa bonchana malane qaaseka nazaka bonchana malasa. Naza bonchonttay naza kitida aawakka boncheen.
२३यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.
24 Ta intes tumma gays ta qaalla siyzadeesine tana kitidaden amanizades medhina deyooy dees, izadeey hayqoope gede deyoon pinnidees atin iza bolla pirdetena. (aiōnios )
२४मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे. (aiōnios )
25 Ta intes tummu gays kase hayqqida asat Xoossa na qaala siyza woodey yaana, he woodiyakka haano, siyzatii wuri deyoon deyaana.
२५मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.
26 Gasoykka aaway ba bagra deyooy diza mala nazikka ba baggara deyooy dana mala oothides
२६कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्यास दिले.
27 Izi asa na gidida gish pirdana mala Godatethth izas imiddes.
२७आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यास दिला.
28 Haysan aykokka malaletoppite, Gasoykka buro kase hyqdii dufoon dizaayti wuri Iza qaala giireth siyizza woodey yana.
२८त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे,
29 Lo7o oothdayt hayqqope denddid paxxna, Iita othidaayti gidikko hayqoope denddidi pirdistana.”
२९आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.
30 “Ta ta sheenen ayne oththanas danddaike, gido attin ta ta aawape siyda mala pirdays, tana kiitidaysa sheene oththaysi attin ta sheenen ta oththontta gish ta pirdan balay bawwa.
३०मला स्वतः होऊन काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा योग्य आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.
31 Tan ta gish tarkka markkatiko ta markkay tummu gidena.
३१मी जर स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही;
32 Gido attin ta gish markkatizzadey haraay dees, izika ta gish markkatizzade, markkatethay tummu gididdaysa ta eraays.
३२माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे; आणि मला माहीत आहे की, माझ्याविषयी तो साक्ष देतो ती साक्ष खरी आहे.
33 Inteni Yanssako asse kitideistashin izika tummu markkatidees.
३३तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली.
34 Ta hayssa gizay inte attana mala attin tas haara ass markkateth koshshida gish gideena.
३४पण मी मनुष्याची साक्ष मान्य करीत नाही, तथापि तुम्हास तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो.
35 Yanssay exidii pooizaa poo7 mala, intekka gutha wode iza poo7in uhaaththaaettana kooydista.
३५तो जळता व प्रकाशणारा दिवा होता; आणि तुम्ही काही काळ त्याच्या प्रकाशात आनंद करण्यास मान्य झालात.
36 Tas gidikoo Yanssa markkatethape adhiza markkaay dees, ta markkayka ta aaway tas immida oothok, hesika ta oothiza othooy ta aaway tana kitidaysa tas markkates.
३६परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
37 Tana kitida ta Aawayka ba huera tas markkatidees, inte gidiko iza qaala giireth mulekka siybeykkista, izas medhoka mulera beybeeykkista.
३७आणखी ज्या पित्याने मला पाठवले आहे त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही कधीही त्याची वाणी ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिलेले नाही.
38 Izi kitidadden inte ammanontta gish iza qaalay inte achchan deyeena.
३८त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही?
39 Intes geesha Maxxaafatape medhina deyoo demanas milatin maxaxafata piqqilista, maxxaafatikka ta gish markkatetes. (aiōnios )
३९तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही असे मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि तेच शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. (aiōnios )
40 gido attin inte deyoo demaanas tako ha yana kooyekkista.
४०पण तुम्ही आपल्याला जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येऊ इच्छीत नाही.
41 Ta asappe boncho kooykke.
४१मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत नाही.
42 ta intena errays, xoossa siqqoy intenan baynddaysa errays.
४२परंतु मी तुम्हास ओळखले आहे की, तुमच्यात देवाविषयी प्रीती नाही.
43 Tan ta aawa sunththan yadiis shin inte tana mooki ekiibeykeista hara uray qase ba sunththan yikoo inte iza mokii ekista.
४३मी आपल्या स्वर्गीय पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही; दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल.
44 Inte inte garssan isay isape boncho koyzzaytoo issi Xoossafe betizza boncho koyonttaytoo inte waanidi tana amaanana danddaeti?
४४जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव आहे त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हास विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?
45 Ta aawa sinththan intena moottanay intes tana misatoopo intena moottanay inte iza uhaaththaaysi oothiza Musekko,
४५मी पित्यासमोर तुमच्यावर आरोप करीन, असे मानू नका. तुम्ही ज्याच्यावर आशा ठेवता तो मोशेच तुमच्यावर आरोप लावणार आहे;
46 Museey ta gish xaafidaysa ammanidako inte tana ammanana.
४६कारण तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.
47 Izi xaafidaysa inte ammanontta agikoo qase ta qaala inte woostti ammanane?”
४७पण तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या वचनांवर कसा विश्वास ठेवाल?”