< Kitetidayta Ootho 3 >
1 Issi wode gallasappe udufun saate bolla Phixxirossayne Yanissay wossa saaten Xoossa keeth bana kezzida.
१पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या तीन वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते.
2 Issi yellet wodhdhosope dommidi toy sillidade Xoossa keeth gelliza asape muxxata wossana mala asay gaalas gaalas tokki ehaaththaidi wothin issi loo7o geetettiza Xoossa keeththa pengen wossizadey dees.
२आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या सुंदर नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत.
3 Izikka Phixxirossayne Yanissay Xoossa keethe gellishin beeyid isttafe muxxata wossides.
३पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली.
4 Phixxirossayne Yanissay iza tiishi histti xeellida. Phixxirossaykka iza “Ane haa nuna xeella” gides.
४तेव्हा पेत्र, योहानाबरोबर त्यास निरखून पाहत, म्हणाला, “आमच्याकडे पाह.”
5 Addezikka isttafe aykko demmana gidi istta tiishi histti xeellides.
५तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल, अशी आशा धरून त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले.
6 Gido attin Phixxirossay izas zaaridi “tas biraynne woorqqay denna gidikokka tas dizaz ta nes immays Nazireete Yesuss Kiristtossa sunththan dendadda ne toora hammuta” gides.
६आणि पेत्र म्हणाला, “रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही; पण जे माझ्याजवळ आहे. ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.”
7 Izas oshacha kushshe oykkidi denththides, Herakka addeza tooyne too qirphpheey miniddes.
७आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले.
8 Guuppi denddi eqqidi Hammuththu oykkides. Heene haane hammutishene guuppishe Xoossaka galatishe isttara isife Xoossa keethth gibbe gellides.
८आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला.
9 Izi Xoossa galatishe heene ha simmeeretishin asay beeydi,
९आणि सर्व लोकांनी त्यास चालताना व देवाची स्तुती करताना पाहिल.
10 hayssadey haanife kase “loo7o” geetettiza Xoossa keeththa peengen uttidi muxxata wossizay iza gididayssa errides. Iza bolla hanidayssafe denddidayssan asay keezi malaletides.
१०आणि जो भवनाच्या सुंदर दाराजवळ भीक मागण्यासाठी बसत असे; तो हाच आहे असे त्यांनी त्यास ओळखले तेव्हा त्यास जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले.
11 Ha paxxida wossanchay Phixxirossakonne Yanisako shiphph gidi isttara oyketi dishin derey wuri malaletidi isttako “Sollommone simereetethaso” geetettizaso woththan yides.
११तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाचा द्वारमंडप म्हटलेल्या ठिकाणी, त्याच्याकडे धावत आले.
12 Phixxirossay he asa beeyidi hizgides “Inteno Isra7eele dereto, hayssan aazas malaleteetii? Qassekka hayssa addeza nuni nu wolqan woykko nu nu xiillotetha paththidi hammutisida mala qodidi nuna aazas tish histi xeelletii?
१२हे पाहून पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, तो म्हणाला, “अहो इस्राएल मनुष्यांनो, यावरुन तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?
13 Nu aawantta Abramentta, Yisaqantta, Yaqobentta Xoossi naza Yesussa bonchides, inte qass iza hayqqos aaththi immidista, Philaxossay izi birshana koynkka inte iza Philaxossa sinththan kadidista.
१३अब्राहामाचा, इसहाकाचा, व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्यास तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्यास सोडून देण्याचे ठरवले असताही त्यास तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
14 Geeshsha na xiilloza inte kadidi shemmppo wodhdhizaysi birshistana mala wossidista.
१४तुम्ही तर जो पवित्र व नीतिमान त्यास नाकारले, आणि घातक मनुष्य आम्हास द्यावा असे मागितले.
15 Deyo imizade inte wodhdhidista, gido attin Xoossi iza hayqqope denththides, hessas nuni markkata.
१५आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्यास देवाने मरण पावलेल्यामधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत.
16 Haysi inte beeyizaysine inte errizayssi mini eqqiday Yesussa sunththan ammanida gishiko. Inte wurikka beeyza mala izi kumetha paxxa demiday Yesussa sunthaninne iza sunththan beettiza ammanoniko.
१६आणि त्याच्या नावाने त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता, व ओळखता त्या या मनुष्यास शक्तीमान केले आहे. आणि, त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.
17 “Ha7ikka ta ishshato inte hessa ooththiday inte hallaqata mala errontta gididaysa ta errays.
१७तर आता भावांनो, मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले आहे,
18 Gidikokka kiristtossay wayye ekkanayssa Xoossi kasse nebista dunnan hasa7idayssa pollides.
१८परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी, म्हणून देवाने आपल्या सर्व संदेष्ट्याच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते, ते याप्रमाणे पूर्ण केले आहे.
19 Hessa gish inte nagaray qucceti dhayana mala marotethan gellite, inte biza oggepe simmite goda matappe inte oraxxana wodey intes yana.
१९तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;
20 Qassekka Xoossi kase intes doori wothida Yesussa Kiristtossa izi intes yeddana.
२०आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला, ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.
21 Xoossi kasse geshsha nabeta dunnan hasa7idaysa mala hannizaysa wursii oraxxisana wodey gakkanaas izi salon gamm7anas koshshes. (aiōn )
२१सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यंत स्वर्गात त्यास राहणे अवश्य आहे, त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्ट्याच्या तोंडून सांगितले आहे. (aiōn )
22 Musseykka (inte goda Xoossi inte giidofe ta mala nabe intes denththana, izi intes yootizaysa siyitte.
२२मोशेने तर सांगितले की, ‘प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावांमधून उठवील. तो जे काही तुम्हास सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’
23 He nabeza siyontta ixxida shemmppoy wuri dere garssafe shaketi dhayo) gides.
२३आणि असे होईल की जो कोणी जीव त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल.
24 Tumappe Samelappe ha simmin denddida nabeti wuri hayta wodeta gish hasa7ida.
२४आणखी, शमुवेलापासून जे संदेष्ट्याच्या परंपरेने झाले, जितके बोलत आले, त्या सर्वानी या दिवसाविषयी कळवले.
25 Intekka nabeta naytakko. Qassekka Xoossi Abrames (ne zeerethan biitta asi wuri anjjistana) giidi izi caqqida caqqoza latannay intenakko.
२५तुम्ही संदेष्ट्याचे मुले आहात आणि तुझ्या संततीद्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून, ‘देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला त्या कराराची तुम्ही मुले आहा.’
26 Xoossi naza denththida wode intena issa issa inte iitatethafe zaaridi anjjana mala kassetidi inteko kittides.”
२६देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, यासाठी की, त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा.”