< Néhémie 11 >

1 Or les princes du peuple habitèrent dans Jérusalem; mais le reste du peuple jeta le sort, afin que l’on prît une partie sur dix, laquelle devait habiter dans Jérusalem, la ville sainte, mais les neuf autres parties dans les autres villes.
इस्राएली लोकांचे नेते जे यरूशलेम नगरात राहत होते आणि बाकीच्या लोकांपैकी दहातल्या एकाने पवित्र यरूशलेम नगर येथे रहावे आणि उरलेल्या नऊ जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरवण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या.
2 Et le peuple bénit tous les hommes qui s’étaient spontanément offerts pour habiter dans Jérusalem.
आणि जे लोक स्वखुशीने यरूशलेमेमध्ये राहायला तयार झाले. त्यांना लोकांनी आशीर्वाद दिले.
3 Voici donc les princes de la province qui habitèrent dans Jérusalem et dans les villes de Juda. Or chacun habita dans sa possession, dans ses villes, Israël, les prêtres, les Lévites, les Nathinéens, et les fils des serviteurs de Salomon.
जे प्रांताचे अधिकारी यरूशलेमात राहिले ते हेच होते. पण काही इस्राएल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यहूदातील आपआपल्या नगरामध्ये व वतनात राहत होते.
4 Ainsi habitèrent dans Jérusalem des fils de Juda et des fils de Benjamin. D’entre les fils de Juda, Athaïas, fils d’Aziam, fils de Zacharie, fils d’Amarias, fils de Saphatias, fils de Malaléel. D’entre les fils de Pharès,
यरूशलेमेमध्ये काही यहूदी आणि बन्यामीनी घराण्यातील व्यक्ती राहत होत्या. यरूशलेमामध्ये आलेले यहूदाचे वंशज पुढीलप्रमाणेः उज्जीयाचा पुत्र अथाया, जखऱ्याचा पुत्र, अमऱ्याचा पुत्र आणि अमऱ्या शफाट्याचा. शफाट्या महललेलचा. महललेल हा पेरेसचा वंशज.
5 Maasia, fils de Baruch, fils de Cholhoza, fils d’Hazia, fils d’Adaïa, fils de Joïarib, fils de Zacharie, fils du Silonite.
बारूखचा पुत्र मासेया (बारुख हा कोल-होजचा पुत्र, कोलहोजे हजायाचा पुत्र, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखऱ्याचा आणि जखऱ्या शिलोनीचा पुत्र.)
6 Tous ces fils de Pharès, qui habitèrent dans Jérusalem, étaient quatre cent soixante-huit hommes vaillants.
पेरेसचे सर्व पुत्र जे यरूशलेमामध्ये राहत होते त्यांची संख्या चारशे अडुसष्ट होती. हे सर्व शूर पुरुष होते.
7 Or voici les fils de Benjamin: Sellum, fils de Mosollam, fils de Joëd, fils de Phadaïa, fils de Colaïa, fils de Masia, fils d’Éthéel, le fils d’Isaïe.
यरूशलेमामध्ये राहायला गेलेले बन्यामीनचे वंशज असेः मशुल्लामचा पुत्र सल्लू (मशुल्लाम योएदाचा पुत्र, योएद पदायाचा, पदाया कोलायाचा पुत्र, कोलाया मासेयाचा, मासेया ईथीएलचा आणि ईथीएल यशायाचा)
8 Et après lui Gebbaï, Sellaï: neuf cent vingt-huit.
यशायाच्या पाठोपाठ गब्बई आणि सल्लाई होते. ते एकंदर नवशे अठ्ठावीस जण होते.
9 Et Joël, fils de Zéchri, leur préposé, et Juda, fils de Sénua, le second sur la ville.
जिख्रीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता आणि हसनुवाचा पुत्र यहूदा, हा यरूशलेम नगराचा दुय्यम अधिकारी होता.
10 Et d’entre les prêtres, Idaïa, fils de Joïarib, Jachin,
१०याजकांपैकीः योयारीबचा पुत्र यदया, याखीन,
11 Saraïa, fils d’Helcias, fils de Mosollam, fils de Sadoc, fils de Méraïoth, fils d’Achitob, prince de la maison de Dieu,
११हिल्कीयाचा पुत्र सराया (हिल्कीया मशुल्लामचा पुत्र, मशुल्लाम सादोकाचा, सादोक मरायोथचा, मरायोथ अहीटूबचा. अहीटूब देवाच्या मंदिराचा अधिक्षक होता.)
12 Et leurs frères, faisant les ouvrages du temple: huit cent vingt-deux. Et Adaïa, fils de Jéroham, fils de Phélélia, fils d’Amsi, fils de Zacharie, fils de Pheshur, fils de Melchias,
१२आणि त्यांचे आठशे बावीस भाऊबंद मंदिराचे काम करत होते. आणि यरोहामाचा पुत्र अदाया (यरोहाम पलल्याचा पुत्र. पलल्या अम्सीचा, जखऱ्याचा पुत्र, जखऱ्या पशहूरचा आणि पशहूर मल्कीयाचा).
13 Et ses frères, les princes des pères: deux cent quarante-deux. Et Amassai, fils d’Azréel, fils d’Ahazi, fils de Mosollamoth, fils d’Emmer,
१३मल्कीयाचे दोनशे बेचाळीस हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते अजरेलचा पुत्र अमशसइ अजरेल अहजईचा पुत्र, अहजई मशिल्लेमोतचा, मशिल्लेमोथ इम्मेरचा
14 Et leurs frères, très puissants: cent vingt-huit, et leur préposé, Zabdée, fils des puissants.
१४आणि इम्मेरचे एकशे अठ्ठावीस हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता.
15 Et d’entre les Lévites, Séméia, fils d’Hasub, fils d’Azaricam, fils d’Hasabia, fils de Boni,
१५लेवी पुढीलप्रमाणेः हश्शूबचा पुत्र शमाया, हश्शूब अज्रीकामचा पुत्र, अज्रीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा
16 Et Sabathaï et Jozabed établis sur tous les ouvrages qui se faisaient au dehors à la maison de Dieu, étant d’entre les princes des Lévites,
१६शब्बथई आणि योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते.
17 Et Mathania, fils de Micha, fils de Zébédéi, fils d’Asaph, prince pour louer et glorifier le Seigneur dans la prière; et Becbécia, le second d’entre ses frères, et Abda, fils de Samua, fils de Galal, fils d’Idithun.
१७मत्तन्या, हा मीखाचा पुत्र मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत व बकबुक्या भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता आणि शम्मूवाचा पुत्र अब्दा, शम्मूवा गालालाचा पुत्र, गालाल यदूथूनाचा
18 Tous les Lévites, dans la ville sainte, furent deux cent quatre-vingt-quatre.
१८या पवित्र नगरात दोनशे चौऱ्याऐंशी लेवी राहायला गेले.
19 Et les portiers, Accub, Telmon, et leurs frères, qui gardaient les portes, cent soixante-douze.
१९यरूशलेमामध्ये गेलेले द्वारपाल असेः अक्कूब, तल्मोन आणि त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते.
20 Et les autres d’Israël, les prêtres et les Lévites, étaient dans toutes les villes de Juda, chacun dans sa possession.
२०बाकीचे इस्राएली लोक आणि याजक तसेच लेवी यहूदाच्या वेगवेगळया नगरांमध्ये आपापल्या वडिलोपार्जित वतनांमध्ये राहिले.
21 Et les Nathinéens, qui habitaient dans Ophel; et Siaha et Gaspha étaient d’entre les Nathinéens.
२१मंदिराचे सेवेकरी ओफेल टेकडीवर राहत. सीहा आणि गिश्पा हे या सेवेकऱ्यांचे प्रमुख होते.
22 Et le chef des Lévites à Jérusalem était Azzi, fils de Bani, fils de Hasabia, fils de Mathanias, fils de Micha. D’entre les fils d’Asaph étaient les chantres, dans le ministère de la maison de Dieu.
२२बानीचा पुत्र उज्जी हा यरूशलेममधील लेवीचा प्रमुख होता. बानी हशब्याचा, हशब्या मत्तन्याचा, मत्तन्या मीखाचा पुत्र. उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती.
23 Car il y avait le commandement du roi à leur sujet, et un ordre observé parmi les chantres tous les jours.
२३ते राजाज्ञा पाळत. गायकांनी दररोज काय करायचे ते आज्ञेत सांगितलेले असे.
24 Mais Phathahia, fils de Mésézebel, d’entre les fils de Zara, le fils de Juda, étaient sous la main du roi, pour toutes les affaires du peuple,
२४राजाचा हुकूम काय आहे हे पथह्या लोकांस सांगत असे. पथह्या हा मशेजबेल याचा पुत्र. मशेजबेल जेरहच्या वंशातला होता. जेरह यहूदाचा पुत्र.
25 Et pour les maisons dans toutes leurs contrées. Des fils de Juda habitèrent à Cariatharbé et en ses filles, à Dibon et en ses filles, à Cabséel et en ses bourgades,
२५यहूदातील काही लोक ज्या खेड्यात आणि आपल्या शेतामध्ये राहत ती अशीः किर्याथ-आर्बात व त्याच्या आसपासची खेडी. दिबोन आणि त्याच्या भोवतालची खेडी. यकब्सेल आणि त्या भोवतालची खेडी,
26 À Jésué, à Molada, à Bethphaleth,
२६आणि येशूवा, मोलादा, बेथ-पेलेत ही नगरे व त्यांच्या आसपासची खेडी,
27 À Hasersual, à Bersabée et en ses filles,
२७हसर-शुवाल, बैर-शेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी.
28 À Sicéleg, à Mochona et en ses filles,
२८सिकलाग, मकोना व त्यांच्या भोवतालची गावे,
29 À Remmon, à Saraa, à Jérimuth,
२९एन-रिम्मोन, सरा, यर्मूथ
30 À Zanoa, à Odollam et dans leurs villages, à Lachis et en ses contrées, à Azéca et en ses filles. Et ils demeurèrent à Bersabée jusqu’à la vallée d’Ennom;
३०जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी, लाखीश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याभोवतीची खेडी. अशाप्रकारे यहूदाचे लोक बैर-शेबापासून हिन्नोमच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहत होते.
31 Mais les fils de Benjamin, depuis Géba, Mechmas, Haï, Béthel et ses filles,
३१गिबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी
32 Anathoth, Nob, Anania
३२अनाथोथ, नोब, अनन्या,
33 Asor, Rama, Géthaïm,
३३हासोर, रामा, गित्तइम,
34 Hadid, Séboïm, Neballat, Lod,
३४हादीद, सबोइम, नबल्लट,
35 Et Ono, la vallée des Ouvriers.
३५लोद, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहत होते.
36 Et les Lévites avaient des portions de Juda et de Benjamin.
३६लेवीच्या कुळातील यहूदाचे काही गट बन्यामीनांच्या प्रदेशात गेले.

< Néhémie 11 >