< Genèse 37 >
1 Mais Jacob habita dans la terre de Chanaan, dans laquelle son père avait été comme étranger.
१याकोब कनान देशात जेथे त्याचा बाप वस्ती करून राहिला होता त्या देशात राहिला.
2 Et voici ses générations: Joseph, lorsqu’il avait seize ans, paissait le troupeau de son père, avec ses frères, étant encore enfant: et il était avec les fils de Bala et de Zelpha, femmes de son père; et il accusa ses frères auprès de son père d’un crime détestable.
२याकोबासंबंधीच्या घटना या आहेत. योसेफ सतरा वर्षांचा तरुण होता. आपल्या भावांबरोबर तो कळप सांभाळीत असे. तो आपल्या वडिलाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर होता. त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले.
3 Or Israël aimait Joseph par-dessus tous ses fils, parce que c’est dans sa vieillesse qu’il l’avait engendré: et il lui fit une tunique d’un tissu de diverses couleurs.
३इस्राएल सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक सुंदर पायघोळ झगा बनवून दिला होता.
4 Ses frères donc voyant qu’il était aimé par son père plus que tous ses autres frères, le haïssaient, et ne pouvaient rien lui dire avec douceur.
४आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते त्याचा द्वेष करीत आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत नसत.
5 Il arriva aussi qu’il raconta à ses frères un songe qu’il avait vu; prétexte qui fut la semence d’une plus grande haine.
५योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
6 Il leur dit donc: Ecoutez mon songe que j’ai vu:
६तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न कृपा करून ऐका:
7 Je croyais que nous étions à fier des gerbes dans le champ, et que ma gerbe se levait et se tenait comme debout, et que les vôtres, étant autour, se prosternaient devant ma gerbe.
७पाहा, आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो, तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला खाली वाकून नमन केले.”
8 Ses frères lui répondirent: Est-ce que tu seras notre roi? ou serons-nous soumis à ta puissance? Ainsi ce prétexte de songes et de discours fournit un aliment à leur envie et à leur haine.
८हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार काय? आणि खरोखर तू आम्हावर अधिकार करशील काय?” त्याच्या या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
9 Il vit encore un autre songe qu’il raconta à ses frères, disant: J’ai vu en songe comme le soleil et la lune et onze étoiles se prosterner devant moi.
९नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.”
10 Lorsqu’il l’eut rapporté à son père et à ses frères, son père le reprit, et dit: Que veut dire ce songe que tu as vu? est-ce que moi, ta mère et tes frères, nous nous prosternerons devant toi sur la terre?
१०त्याने आपल्या पित्यासही या स्वप्नाविषयी सांगितले. परंतु त्याच्या वडिलाने त्यास दोष देऊन म्हटले, “असले कसले हे स्वप्न आहे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करू काय?”
11 Ainsi ses frères lui portaient envie, mais son père considérait la chose en silence.
११योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीत राहिले. परंतु त्याच्या वडिलाने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.
12 Et comme ses frères s’étaient arrêtés à Sichem pour paître les troupeaux de leur père,
१२एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले.
13 Israël lui dit: Tes frères paissent les brebis dans les pâturages de Sichem: viens, je t’enverrai vers eux. Joseph répondant:
१३इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपली मेंढरे चारावयास गेले आहेत ना? चल, मी तुला तेथे पाठवत आहे.” योसेफ त्यास म्हणाला, “मी तयार आहे.”
14 Je suis prêt, il lui dit: Va, et vois si tout va bien pour tes frères et pour les troupeaux, et rapporte-moi ce qui se fait. Envoyé de la vallée d’Hébron, il vint à Sichem:
१४तो त्यास म्हणाला, “आता जा आणि तुझे भाऊ व माझी मेंढरे ठीक आहेत सुखरुप आहेत का? ते पाहा व मला त्यांच्यासंबंधी बातमी घेऊन ये.” अशा रीतीने याकोबाने त्यास हेब्रोनातून शखेमास पाठवले आणि योसेफ शखेमास गेला.
15 Et un homme le trouva errant dans la campagne, et lui demanda ce qu’il cherchait.
१५योसेफ शेतात भटकत होता. पाहा, तो कोणा मनुष्यास दिसला. त्या मनुष्याने त्यास विचारले, “तू काय शोधत आहेस?”
16 Et lui répondit: Ce sont mes frères que je cherche; dis-moi où ils paissent les troupeaux.
१६योसेफ म्हणाला, “मी माझ्या भावांना शोधत आहे, ते कोठे कळप चारीत आहेत, हे कृपा करून मला सांगता का?”
17 Et cet homme lui dit: Ils sont partis d’ici; et je les ai entendus, disant: Allons à Dothaïn. Joseph alla donc après ses frères, et il les trouva à Dothaïn.
१७तो मनुष्य म्हणाला, “ते येथून गेले आहेत. आपण दोथान गावामध्ये जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले.
18 Lorsque ceux-ci l’eurent vu de loin, avant qu’il approchât d’eux, ils projetèrent de le tuer:
१८त्याच्या भावांनी योसेफाला दुरून येताना पाहिले आणि कट करून त्यास ठार मारण्याचे ठरवले.
19 Et ils se disaient mutuellement: Voici le songeur qui vient;
१९त्याचे भाऊ एकमेकांना म्हणाले, “हा पाहा, स्वप्ने पाहणारा इकडे येत आहे.
20 Venez, tuons-le, et jetons-le dans une vieille citerne; nous dirons: Une bête sauvage l’a dévoré; et alors on verra ce que lui servent ses songes.
२०आता चला, आपण त्यास ठार मारून टाकू आणि त्यास एका खड्ड्यात टाकून देऊ. आणि त्यास कोणा एका हिंस्र पशूने खाऊन टाकले असे आपल्या बापाला सांगू. मग त्याच्या स्वप्नांचे काय होईल ते आपण पाहू.”
21 Mais entendant cela, Ruben s’efforçait de le sauver de leurs mains, et disait:
२१रऊबेनाने ते ऐकले आणि त्यास त्यांच्या हातातून सोडवले. तो म्हणाला, “आपण त्यास ठार मारू नये.”
22 Ne tuez pas son âme et ne versez pas son sang; mais jetez-le dans cette citerne qui est dans le désert, et conservez vos mains pures. Or il disait cela, voulant l’arracher de leurs mains, et le rendre à son père.
२२रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्त पाडू नका. त्यास रानातल्या या खड्ड्यात टाका, परंतु त्याच्यावर हात टाकू नका.” आपल्या भावांच्या हातातून सोडवून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा त्याचा बेत होता.
23 Aussitôt donc qu’il fut arrivé près de ses frères, ils le dépouillèrent de sa tunique longue, tissue de diverses couleurs.
२३योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला.
24 Et ils le jetèrent dans la vieille citerne, où il n’y avait pas d’eau.
२४नंतर त्यांनी त्यास एका खोल खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा रिकामा होता, त्यामध्ये पाणी नव्हते.
25 Puis s’asseyant pour manger du pain, ils virent des voyageurs Ismaélites qui venaient de Galaad, et leurs chameaux portant des aromates, de la résine et du stacté en Égypte.
२५ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहीत गिलाद प्रदेशाहून येत होता. ते खाली मिसर देशाकडे चालले होते.
26 Juda dit alors à ses frères: Que nous servira si nous tuons notre frère et nous cachons son sang?
२६तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा?
27 Il vaut mieux qu’il soit vendu aux Ismaélites, et que nos mains ne soient pas souillées; car il est notre frère et notre chair. Ses frères acquiescèrent à ses discours.
२७चला, आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू, आपण आपल्या भावावर हात टाकू नये. कारण तो आपला भाऊ आहे, आपल्याच हाडामांसाचा आहे.” त्याच्या भावांनी त्याचे ऐकले.
28 Et des marchands Madianites passant, ils le retirèrent de la citerne, et le vendirent vingt pièces d’argent aux Ismaélites qui le menèrent en Égypte.
२८ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले.
29 Cependant Ruben étant revenu à la citerne, n’y trouva pas l’enfant;
२९रऊबेन त्या खड्ड्याकडे परत गेला, तेव्हा पाहा, त्यामध्ये त्यास योसेफ दिसला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडली.
30 Alors, ses vêtements déchirés, il retourna vers ses frères et dit: L’enfant ne paraît pas, et moi, où irai-je?
३०तो भावांकडे येऊन म्हणाला, “मुलगा कोठे आहे? आणि मी, आता मी कोठे जाऊ?”
31 Ils prirent donc sa tunique et la trempèrent dans le sang d’un chevreau qu’ils avaient tué,
३१त्यांनी एक बकरा मारला आणि योसेफाचा झगा त्या रक्तात बुडवला.
32 Envoyant des gens pour la porter à leur père, et pour lui dire: Nous l’avons trouvée; vois si c’est la tunique de ton fils, ou non.
३२नंतर तो झगा आणून, आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हांला हा सापडला. हा झगा तुमच्या मुलाचा आहे की काय तो पाहा.”
33 Quand le père l’eut reconnue, il dit: C’est la tunique de mon fils; une bête farouche et cruelle l’a dévoré, une bête a dévoré Joseph.
३३याकोबाने तो ओळखला आणि तो म्हणाला, “हा माझ्याच मुलाचा झगा आहे. हिंस्र पशूने त्यास खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यामध्ये संशय नाही.”
34 Et, ses vêtements déchirés, il se couvrit d’un cilice, pleurant son fils pendant longtemps.
३४याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दुःख झाले, एवढे की, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि त्याने पुष्कळ दिवस आपल्या मुलासाठी शोक केला.
35 Or, tous ses enfants s’étant rassemblés pour adoucir la douleur de leur père, il ne voulut pas recevoir de consolation, mais il dit: Je descendrai pleurant vers mon fils dans l’enfer. Et lui persévérant dans son pleur, (Sheol )
३५याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलींनी त्याचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो समाधान पावला नाही. तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याचा बाप त्याच्याकरता रडला. (Sheol )
36 Les Madianites vendirent Joseph en Égypte à Putiphar, eunuque de Pharaon, chef des soldats.
३६त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात पोटीफर नावाचा फारो राजाचा अधिकारी, अंगरक्षकाचा सरदार याला विकून टाकले.