< Genèse 23 >

1 Or Sara vécut cent vingt-sept ans.
सारा एकशे सत्तावीस वर्षे जगली; ही सारेच्या आयुष्याची वर्षे होती.
2 Et elle mourut dans la ville d’Arbée, qui est Hébron, dans la terre de Chanaan; et Abraham vint pour faire le deuil et pour la pleurer.
सारा कनान देशातील किर्याथ-आर्बा, म्हणजे, कनान देशातले हेब्रोन येथे मरण पावली. अब्राहामाने सारेसाठी शोक केला आणि तिच्यासाठी तो रडला.
3 Et lorsqu’il se fut levé après les devoirs funéraires, il parla aux fils de Heth, disant:
मग अब्राहाम उठला आणि आपल्या मृत पत्नीपासून गेला, व हेथीच्या मुलांकडे जाऊन म्हणाला,
4 Je suis parmi vous étranger et voyageur: donnez-moi le droit de sépulture chez vous, afin que j’ensevelisse mon mort.
“मी तुमच्यात परदेशी आहे. कृपा करून मृताला पुरण्यासाठी मला तुमच्यामध्ये माझ्या मालकीची अशी जागा मंजूर करा, म्हणजे मी माझ्या मृताला पुरू शकेन.”
5 Les fils de Heth répondirent, disant:
हेथीच्या मुलांनी अब्राहामाला म्हटले,
6 Ecoute-nous, seigneur, tu es un prince de Dieu au milieu de nous; ensevelis ton mort dans le plus beau de nos sépulcres; nul ne pourra t’empêcher d’ensevelir ton mort dans son tombeau.
“माझ्या स्वामी, आमचे ऐका. तुम्ही आमच्यामध्ये देवाचे सरदार आहात. आमच्याकडे असलेल्या उत्तम थडग्यात तुमच्या मयताला पुरा. आमच्यातील कोणीही आपले थडगे तुम्हास द्यायला मना करणार नाही.”
7 Abraham se leva, et se prosterna devant le peuple de ce pays, c’est-à-dire, les fils de Heth;
अब्राहाम उठला व त्याने हेथीच्या मुलांना आणि देशातील लोकांस नमन केले.
8 Et il leur dit: S’il plaît à votre âme que j’ensevelisse mon mort, écoutez-moi et intercédez pour moi auprès d’Ephron, fils de Séor,
तो त्यांना म्हणाला, “जर माझ्या मयताला पुरण्यासाठी तुम्ही सहमत आहात, तर मग माझे ऐका आणि माझ्याबरोबर सोहराचा मुलगा एफ्रोन याला माझ्यासाठी विनंती करा.
9 Afin qu’il me donne la caverne double qu’il a à l’extrémité de son champ; que pour un prix convenable, il me la livre devant vous, afin que j’y possède un sépulcre.
त्याच्या मालकीची शेताच्या एका टोकाला असलेली मकपेलाची गुहा मला विकत द्यायला सांगा. ती त्याने पूर्ण किंमतीस मला उघडपणे माझ्या मालकीची मृतांना पुरण्याची जागा म्हणून विकत द्यावी.”
10 Or, Ephron habitait au milieu des fils de Heth. Ephron répondit donc à Abraham, devant tous ceux qui entraient à la porte de la ville, disant:
१०तेथे एफ्रोन हा हेथीच्या मुलांबरोबर बसलेला होता, आणि हेथीची मुले व त्याच्या नगराच्या वेशीत येणारे सर्व ऐकत असता, एफ्रोन हित्ती याने अब्राहामाला उत्तर दिले, तो म्हणाला,
11 Non, il n’en sera pas ainsi, mon seigneur; mais toi, écoute plutôt ce que je dis: Je te livre le champ et la caverne qui est dans ce champ, en présence des fils de mon peuple; ensevelis ton mort.
११“नाही, माझे स्वामी, माझे ऐका. मी ते शेत आणि त्यामध्ये असलेली गुहा तुम्हास देतो. येथे माझ्या लोकांच्या मुलांसमक्ष मी ते शेत व ती गुहा मी तुम्हास देतो. तुमच्या मृताला पुरण्यास मी ते तुम्हास देतो.”
12 Abraham se prosterna devant le peuple de ce pays,
१२मग अब्राहामाने देशातील लोकांसमोर स्वतः वाकून नमन केले.
13 Et dit à Ephron, le peuple l’environnant: Je te prie de m’écouter; je donnerai l’argent pour le champ; prends-le, et ainsi j’y ensevelirai mon mort.
१३देशातले लोक ऐकत असता तो एफ्रोनास म्हणाला, “परंतु जर तुझी इच्छा आहे, तर कृपा करून माझे ऐक. मी शेताची किंमत तुला देईन. माझ्याकडून त्याचे पैसे घे, आणि मग मी आपल्या मयतास तेथे पुरेन.”
14 Et Ephron répondit:
१४एफ्रोनाने अब्राहामाला उत्तर दिले, तो म्हणाला,
15 Mon seigneur, écoute-moi: la terre que tu demandes vaut quatre cents sicles d’argent; c’est le prix entre moi et toi; mais qu’est-ce que cela? ensevelis ton mort.
१५“माझे स्वामी, कृपया माझे जरा ऐका. जमिनीचा हा एक तुकडा चारशे शेकेल रुपे किंमताचा, तो माझ्या व तुमच्यामध्ये एवढा काय आहे? तुमच्या मृताला पुरा.”
16 Ce qu’Abraham ayant entendu, il fit peser l’argent qu’Ephron avait demandé, en présence des fils de Heth, quatre cents sicles d’argent en monnaie de bon aloi et ayant cours.
१६तेव्हा अब्राहामाने एफ्रोनाचे ऐकले आणि हेथीची मुले ऐकत असता त्याने जितके रुपे सांगितले होते तितके, म्हणजे व्यापाऱ्याकडचे चलनी चारशे शेकेल रुपे एफ्रोनाला तोलून दिले.
17 Et le champ jadis d’Ephron, dans lequel était une caverne double, en face de Mambré, aussi bien que la caverne et tous les arbres qui bordaient le champ de tous côtés, fut assuré
१७एफ्रोनाचे जे शेत मम्रे शेजारी मकपेला येथे होते, ते शेत, व त्यामध्ये असलेली गुहा व त्याच्यासभोवती सीमेतील सर्व झाडे,
18 A Abraham comme propriété sous les yeux des fils de Heth et de tous ceux qui entraient à la porte de la ville.
१८ही हेथीच्या मुलांसमक्ष व त्याच्या नगराच्या वेशीत जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामाने विकत घेतली.
19 Et ainsi Abraham ensevelit Sara sa femme dans la caverne double du champ, en face de Mambré; c’est Hébron, dans la terre de Chanaan.
१९त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी सारा हिला कनान देशातील मम्रे म्हणजे हेब्रोन शहराच्या शेजारी मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले.
20 Le champ donc et la caverne qui étaient dans le champ furent assurés à Abraham comme propriété de tombeau, par les fils de Heth.
२०ते शेत व त्यातील गुहा ही मृतांना पुरण्याची जागा म्हणून हेथीच्या मुलांकडून अब्राहामाच्या मालकीची झाली.

< Genèse 23 >