< Deutéronome 1 >
1 Voici les paroles que Moïse dit à tout Israël au-delà du Jourdain au désert, dans la plaine, contre la mer Rouge, entre Pharan, Thophel, Laban et Haséroth, où il y a beaucoup d’or;
१यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात अराबामध्ये सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दि-जाहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्राएलाशी वचने बोलला ती ही.
2 À onze journées d’Horeb, par la voie de la montagne de Séir jusqu’à Cadesbarné.
२होरेबपासून कादेश-बर्ण्यापर्यंतचा प्रवास सेईर डोंगरामार्गे अकरा दिवसाचा आहे.
3 En la quarantième année, au onzième mois, au premier jour du mois. Moïse dit aux enfants d’Israël tout ce que le Seigneur lui avait ordonné de leur dire;
३हे मिसर सोडल्यानंतर चाळीसाव्या वर्षी घडले, अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला, परमेश्वराने जे काही सांगायची आज्ञा केली; ते सर्व त्याने सांगितले.
4 Après qu’il eut battu Séhon, roi des Amorrhéens, qui habitait à Hésébon, et Og, roi de Basan, qui demeurait à Astaroth et à Edraï,
४अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्यावर परमेश्वराने हल्ला केल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहत असे. ओग बाशानाचा राजा होता. तो अष्टारोथ व एद्रई येथे राहणारा होता.)
5 Au delà du Jourdain, dans la terre de Moab. Moïse commença donc à expliquer la loi et à dire:
५परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पलीकडे पुर्वेस मवाबाच्या देशात नियमांचे विवरण करू लागला. तो म्हणाला,
6 Le Seigneur notre Dieu nous a parlé à Horeb disant: Vous avez suffisamment demeuré près de cette montagne;
६आपला देव परमेश्वर होरेबात आपल्याशी बोलला, या डोंगरात तुम्ही पुष्कळ दिवस राहीला आहात.
7 Retournez, et venez à la montagne des Amorrhéens et dans tous les lieux qui l’avoisinent, les plaines, les montagnes et les vallées, contre le midi et sur le rivage de la mer, dans la terre des Chananéens et du Liban, jusqu’au grand fleuve d’Euphrate.
७आता तुम्ही येथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा यार्देनेच्या खोऱ्यात, अराबाच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेबमध्ये समुद्रकिनारी कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.
8 Voilà, dit-il, que je vous l’ai livrée; entrez, et possédez cette terre, au sujet de laquelle le Seigneur a juré à vos pères, Abraham, Isaac et Jacob, qu’il la leur donnerait, à eux et à leur postérité après eux.
८पाहा हा प्रदेश मी तुम्हास देऊ करत आहे जा आणि त्यावर ताबा मिळवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते.
9 Et je vous ai dit en ce temps-là:
९तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही.
10 Je ne puis seul vous soutenir, parce que le Seigneur votre Dieu vous a multipliés, et que vous êtes aujourd’hui comme les étoiles du ciel, en très grand nombre.
१०आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे.
11 (Que le Seigneur Dieu de vos pères ajoute à ce nombre beaucoup de milliers, et qu’il vous bénisse, comme il a dit.)
११तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, ह्याच्या कृपेने आणखी वाढून आताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हास मिळो.
12 Je ne puis seul soutenir vos affaires, et leur poids, et vos querelles.
१२परंतु मी एकटा तुमचा भार तसेच तुमची आपापसांतली भांडणे कोठवर सहन करू?
13 Présentez d’entre vous des hommes sages et habiles et d’une conduite éprouvée dans vos tribus, afin que je les établisse vos princes.
१३म्हणून मी तुम्हास सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना तुमचे प्रमुख म्हणून नेमतो.”
14 Alors vous m’avez répondu: C’est une bonne chose que tu veux faire.
१४त्यावर, “हे चांगलेच झाले असे” तुम्ही मला उत्तर देऊन म्हणालात.
15 Et je pris de vos tribus des hommes sages et nobles, et je les ai établis princes, tribuns, chefs de cent, de cinquante et de dix hommes, pour vous enseigner toutes ces choses.
१५म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासांवर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.
16 Puis, je leur ordonnai, disant: Ecoutez-les, et jugez selon ce qui est juste, que ce soit un citoyen ou un étranger.
१६या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा.
17 Il n’y aura aucune différence de personnes; vous écouterez le petit comme le grand; vous n’aurez égard à la personne de qui que ce soit, parce que c’est le jugement de Dieu. Que si quelque chose vous paraît difficile, rapportez-le-moi, et moi, je l’entendrai.
१७न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हास विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.
18 Et je vous ai ordonné tout ce que vous deviez faire.
१८तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हास आज्ञा केली होती.
19 Or, partis d’Horeb, nous passâmes par le désert terrible et très grand que vous avez vu, par la voie de la montagne de l’Amorrhéen, comme nous avait ordonné le Seigneur notre Dieu. Et lorsque nous fûmes venus à Cadesbarné,
१९मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो तेव्हा वाटेत तुम्हास ते विस्तीर्ण आणि भयंकर रान लागले ते सर्व ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोहचलो.
20 Je vous dis: Vous êtes parvenus à la montagne de l’Amorrhéen que le Seigneur notre Dieu doit nous donner.
२०मी तुम्हास म्हणालो की पाहा, “अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोहोचलात आपला देव परमेश्वर तुम्हास हा प्रदेश देत आहे.
21 Vois la terre que le Seigneur ton Dieu te donne: monte, et possède-la, comme a dit le Seigneur notre Dieu à tes pères: ne crains point, et n’aie frayeur de rien.
२१पाहा हा प्रदेश तुझा देव परमेश्वर याने पुढे ठेवला आहे. पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरू नका व कशाचीही भीती बाळगू नका.”
22 Alors vous vous approchâtes tous de moi, et vous dites: Envoyons des hommes, qui considèrent la terre, et qu’ils nous disent par quel chemin nous devons monter, et vers quelles villes nous devons marcher.
२२पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात, “आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील.”
23 Et comme ce discours me plut, j’envoyai d’entre vous douze hommes, un de chaque tribu;
२३मलाही ते पटले म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली.
24 Lesquels s’étant mis en chemin et ayant monté à travers les montagnes, ils vinrent jusqu’à la vallée de la Grappe de raisin; et, la terre considérée,
२४ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोहचले व त्यांनी तो देश हेरला.
25 Prenant de ses fruits, pour montrer sa fertilité, ils nous les apportèrent, et dirent: Elle est bonne, la terre que le Seigneur notre Dieu doit nous donner.
२५येताना त्यांनी तिकडची काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहिती सांगितली व ते म्हणाले, “आपला देव परमेश्वर देत असलेला देश हा उत्तम आहे.”
26 Et vous ne voulûtes point monter, mais incrédules à la parole du Seigneur notre Dieu,
२६तथापि तुम्ही तेथे हल्ला करण्याचे नाकारले आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले.
27 Vous murmurâtes dans vos tentes, et vous dites: Le Seigneur nous hait, et c’est pour cela qu’il nous a retirés de l’Egypte, afin de nous livrer à la main de l’Amorrhéen, et de nous détruire.
२७तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात परमेश्वर आमचा द्वेष करतो अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हास त्याने मिसर देशातून बाहेर काढले आहे.
28 Où monterons-nous? les envoyés ont épouvanté nos cœurs, disant: C’est une très grande multitude, et leur stature est plus haute que la nôtre: les villes sont grandes et fortifiées jusqu’au ciel; nous avons vu là les enfants d’Enac.
२८आता आम्ही कोठे जाणार? आमच्या या भावांच्या बातम्यांमुळे घाबरून आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे. त्यांच्यानुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाकी वंशाचे महाकाय आहेत.
29 Et je vous répondis: N’ayez pas peur, et ne les craignez point:
२९तेव्हा मी तुम्हास म्हणालो, “भिऊ नका, त्या लोकांस घाबरू नका.
30 Le Seigneur Dieu qui est votre guide, combattra lui-même pour vous, comme il a fait en Egypte, tous le voyant.
३०स्वत: परमेश्वर देव तुमच्यापुढे जात आहे. मिसर देशात तुमच्यासमोर त्याने जे केले तेच तो येथेही करील, तो तुमच्यासाठी लढेल;
31 Et dans le désert (toi-même tu l’as vu) le Seigneur ton Dieu t’a porté, comme un homme a coutume de porter son petit enfant, dans toute la voie par laquelle vous avez marché, jusqu’à ce que vous soyez venus en ce lieu.
३१तसेच रानातल्या वाटचालीतही तुम्ही पाहीले, त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुमच्यापुढे होता. मनुष्य आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हास येथपर्यंत सांभाळून आणले.”
32 Et même alors vous n’avez pas cru au Seigneur votre Dieu,
३२तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही.
33 Qui vous a précédés dans la voie, et a mesuré le lieu dans lequel vous deviez planter vos tentes, la nuit, vous montrant le chemin par le feu, et le jour, par la colonne de nuée.
३३परमेश्वर प्रवासात तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हास मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे.
34 Et lorsque le Seigneur eut entendu la voix de vos discours, irrité, il jura et dit:
३४परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला शपथपूर्वक तो म्हणाला,
35 Nul des hommes de cette génération très méchante ne verra la terre bonne, que sous le serment, j’ai promis à vos pères,
३५“तुमच्या पूर्वजांना शपथ वाहून देवू केलेला हा उत्तम प्रदेश या दुष्ट पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही,
36 Excepté Caleb, fils de Jéphoné; car lui la verra, et c’est à lui que je donnerai la terre qu’il a foulée, et à ses enfants, parce qu’il a suivi le Seigneur.
३६यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्यास व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.”
37 Et elle n’est pas étonnante, cette indignation contre le peuple, puisque irrité même contre moi, à cause de vous, le Seigneur a dit: Tu n’y entreras pas non plus.
३७तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, मोशे, “तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस.
38 Mais Josué, fils de Nun, ton serviteur, entrera lui-même au lieu de toi; exhorte-le et le fortifie, car lui-même partagera au sort la terre à Israël.
३८पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल त्यास तू प्रोत्साहन दे, कारण तो इस्राएलांना देश वतन म्हणून मिळवून देईल.
39 Vos petits enfants, dont vous avez dit qu’ils seraient emmenés captifs, et les enfants qui aujourd’hui ignorent la différence du bien et du mal, ceux là entreront; et c’est à eux que je donnerai la terre, et ils la posséderont.
३९परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात ती आज जी तुमची मुले बरे किंवा वाईट जाणत नाहीत ती मात्र या देशात जातील आणि त्यांना मी तो देश देईन व ते देश ते हस्तगत करतील.
40 Mais vous, retournez et allez au désert par la voie de la mer Rouge.
४०पण तुम्ही परत फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.”
41 Et vous me répondîtes: Nous avons péché contre le Seigneur; nous monterons et nous combattrons, comme a ordonné le Seigneur notre Dieu. Et comme vous marchiez en armes vers la montagne,
४१मग तुम्ही मला असे उत्तर दिले की “आमच्या हातून परमेश्वराविरुध्द पाप घडले आहे आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू.” मग प्रत्येक मनुष्याने आपली शस्त्रास्त्रे घेतली. आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशावर चढावयला तयार झाला.
42 Le Seigneur me dit: Dis-leur: Ne montez point, ni ne combattez, car je ne suis pas avec vous: ne tombez point devant vos ennemis.
४२परमेश्वर मला म्हणाला, “त्यांना तेथे सांग युद्ध करू नका. कारण मी त्यांच्या बरोबर नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.”
43 Je vous parlai, et vous ne m’écoutâtes point; mais vous opposant au commandement du Seigneur, et enflés d’orgueil, vous vous montâtes sur la montagne.
४३त्याप्रमाणे तुम्हास मी सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढाई करून गेलात.
44 C’est pourquoi l’Amorrhéen, qui habitait dans les montagnes, étant sorti et venant au-devant de vous, vous poursuivit, comme les abeilles ont coutume de poursuivre, et il vous tailla en pièces depuis Séir jusqu’à Horma.
४४तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हास पिटाळून लावले.
45 Et comme, étant retournés, vous pleuriez devant le Seigneur, il ne vous écouta point, et il ne voulut pas acquiescer à votre voix.
४५मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे रडू लागला. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही.
46 Vous demeurâtes donc à Cadesbarné durant un long temps.
४६तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिला ते तुम्हास माहितच आहे.