< 2 Timothée 3 >
1 Or, sache qu’à la fin des jours, viendront des temps périlleux.
१परंतु शेवटच्या काळामध्ये संकटाचा दिवस आपल्यावर येईल हे समजून घे.
2 Il y aura des hommes s’aimant eux-mêmes, avides, arrogants, orgueilleux, blasphémateurs, n’obéissant pas à leurs parents, ingrats, couverts de crimes,
२लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक
3 Sans affection, implacables, calomniateurs, dissolus, durs, sans bonté,
३इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी.
4 Traîtres, insolents, enflés d’orgueil, aimant les voluptés plus que Dieu;
४विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील;
5 Ayant toutefois une apparence de piété, mais en repoussant la réalité. Evite encore ceux-là;
५ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
6 Car il y en a parmi eux qui pénètrent dans les maisons et traînent captives de jeunes femmes chargées de péchés, et mues par toute sorte de désirs,
६मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वाईट अभिलाषांनी भरलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवतात.
7 Lesquelles apprennent toujours, et ne parviennent jamais à la connaissance de la vérité.
७अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
8 Or, de même que Jannès et Mambrès résistèrent à Moïse, de même ceux-ci résistent à la vérité; hommes corrompus d’esprit, qui n’ont pas été éprouvés dans la foi.
८यान्नेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी माणसे आहेत.
9 Mais ils n’iront pas au-delà; car leur folie sera connue de tout le monde, comme celle de ces hommes le fut aussi.
९ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत कारण जसा त्यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.
10 Pour toi, tu as compris ma doctrine, ma manière de vivre, mon but, ma foi, ma longanimité, ma charité, ma patience,
१०तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे, ही ओळखून आहेस,
11 Mes persécutions, mes souffrances, comme celles que j’ai éprouvées à Antioche, à Icone et à Lystre; quelles persécutions j’ai subies; mais le Seigneur m’a délivré de toutes.
११अंत्युखिया, इकुन्या आणि लुस्र या शहरांमध्ये ज्या गोष्टी माझ्याबाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे, परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.
12 Ainsi tous ceux qui veulent vivre pieusement en Jésus-Christ souffriront persécution.
१२खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.
13 Mais les hommes méchants et séducteurs s’enfonceront toujours plus dans le mal, s’égarant et égarant les autres.
१३पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.
14 Pour toi, demeure ferme dans ce que tu as appris, et qui t’a été confié, sachant de qui tu l’as appris,
१४पण तुझ्याबाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा.
15 Et que dès l’enfance, tu as connu les saintes lettres qui peuvent l’instruire pour le salut par la foi qui est en Jésus-Christ.
१५तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
16 Toute Ecriture divinement inspirée est utile pour enseigner, pour reprendre, pour corriger, pour former à la justice,
१६प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
17 Afin que l’homme de Dieu soit parfait et préparé à toute bonne œuvre.
१७यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.