< 1 Timothée 4 >
1 Or l’Esprit dit manifestement que, dans les derniers temps, quelques-uns abandonneront la foi, s’attachant à des esprits d’erreur, et à des doctrines de démons,
१देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
2 Parlant le mensonge avec hypocrisie, et ayant la conscience cautérisée;
२ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.
3 Défendant le mariage, et ordonnant de s’abstenir des aliments que Dieu a créés pour être reçus avec actions de grâces par les fidèles et par ceux qui ont connu la vérité;
३ते लोकांस लग्न करण्यास मना करतील व जे अन्न विश्वास ठेवणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकारस्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वांत आणली ती वर्ज्य करावी असे सांगतील.
4 Car toute créature de Dieu est bonne, et on ne doit rien rejeter de ce qui se prend avec actions de grâces,
४तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही.
5 Parce qu’il est sanctifié par la parole de Dieu et par la prière.
५कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
6 Enseignant ces choses à nos frères, tu seras un bon ministre du Christ Jésus, nourri des paroles de la foi et de la bonne doctrine que tu as reçue.
६जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
7 Mais les contes insensés des vieilles femmes, rejette-les, et exerce-toi à la piété.
७परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.
8 Car les exercices corporels servent peu; mais la piété est utile à tout, ayant les promesses de la vie présente et de celle à venir.
८कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.
9 C’est une vérité certaine et digne d’être entièrement reçue.
९हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे.
10 Car, si nous prenons tant de peine, si nous sommes maudits, c’est que nous espérons dans le Dieu vivant, qui est le Sauveur de tous les hommes, et principalement des fidèles.
१०याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.
11 Commande et annonce ces choses.
११या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव.
12 Que personne ne méprise ta jeunesse; mais sois l’exemple des fidèles, dans les discours, dans la manière d’agir, dans la charité, dans la foi, dans la chasteté.
१२कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.
13 Jusqu’à ce que je vienne, applique-toi à la lecture, à l’exhortation et à l’enseignement.
१३मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव.
14 Ne néglige pas la grâce qui est en toi, qui t’a été donnée en vertu d’une prophétie avec l’imposition des mains des prêtres.
१४तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशाच्या द्वारे देण्यात आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको.
15 Médite ces choses, sois-y tout entier, afin que ton avancement soit connu de tous.
१५या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी.
16 Veille sur toi-même et sur la doctrine; veilles-y sans relâche. Car agissant ainsi, tu te sauveras toi-même et ceux qui t’écoutent.
१६आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील.