< 1 Samuel 22 >

1 David s’en alla donc de là, et il s’enfuit dans la caverne d’Odollam. Lorsque ses frères l’eurent appris et toute la maison de son père, ils descendirent vers lui en cet endroit.
मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले.
2 Et se réunirent auprès de lui tous ceux qui étaient dans la détresse, accablés de dettes, et mécontents; et il devint leur chef; et il y eut avec lui environ quatre cents hommes.
कोणी अडचणीत पडलेले कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला; सुमारे चारशे माणसे त्याच्याजवळ होती.
3 Et David partit de là pour Maspha qui est en Moab; et il dit au roi de Moab: Que mon père et ma mère, je vous prie, demeurent avec vous, jusqu’à ce que je sache ce que fera Dieu à mon égard.
दावीद तेथून मवाबातील मिस्पा येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “मी तुला विनंती करतो परमेश्वर माझ्यासाठी काय करील हे मला कळेल तोपर्यंत माझ्या आई-वडीलांना तुझ्याजवळ येऊन राहू दे.”
4 Et il les laissa auprès du roi de Moab, et ils demeurèrent auprès de lui pendant tous les jours que David fut dans la forteresse,
मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले.
5 Cependant Gad le prophète dit à David: Ne demeure point dans la forteresse, pars, et va dans la terre de Juda. Et David partit, et il vint dans la forêt de Haret.
मग गाद भविष्यवादी दावीदाला म्हणाला, “गडात राहू नको तर तू निघून यहूदा देशात जा.” तेव्हा दावीद निघून हरेथ रानात आला.
6 Et Saül apprit que David avait paru, ainsi que des hommes qui étaient avec lui. Or, lorsque Saül demeurait à Gabaa, et qu’il était dans le bois qui est à Rama, tenant sa lance à la main, et que tous ses serviteurs l’environnaient,
दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता; त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते.
7 Il dit à ses serviteurs qui étaient auprès de lui: Ecoutez maintenant, enfants de Jémini: Est-ce que le fils d’Isaï vous donnera à tous des champs et des vignes, et vous fera-t-il tous tribuns et centurions,
तेव्हा शौल आपल्याजवळ जे आपले चाकर उभे होते त्यांना म्हणाला, “अहो बन्यामिनी लोकांनो ऐका हा इशायाचा मुलगा तुम्हा प्रत्येकाला शेते व द्राक्षमळे देणार आहे काय? तो तुम्हा सर्वांना हजाराचे व शंभराचे सरदार करणार आहे काय?
8 Puisque vous avez tous conspiré contre moi, et qu’il n’y a personne qui me renseigne; surtout quand mon fils même a fait alliance avec le fils d’Isaï? Il n’en est pas d’entre vous qui plaigne mon sort, ni qui m’avertisse; à cause que mon fils a suscité contre moi mon serviteur, qui me dresse des embûches jusqu’aujourd’hui.
म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहा आणि माझा मुलगा इशायाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हातला कोणी माझ्यासाठी दुखीत होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही.”
9 Mais, répondant, Doëg l’Iduméen qui était présent, et le premier entre les serviteurs de Saul: J’ai vu, dit-il, le fils d’Isaï à Nobé, chez Achimélech, le prêtre, fils d’Achitob,
मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरांसोबत उभा होता, त्याने उत्तर देऊन म्हटले, “मी इशायाच्या मुलाला नोब येथे अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याच्याकडे येताना पाहिले;
10 Lequel a consulté le Seigneur pour lui, lui a donné des vivres, et lui a même donné le glaive de Goliath le Philistin.
१०त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.”
11 Le roi donc envoya chercher Achimélech, le prêtre, fils d’Achitob, et toute la maison de son père, des prêtres qui étaient à Nobé; lesquels tous vinrent vers le roi.
११तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या वडिलाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलवायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले.
12 Et Saül dit à Achimélech: Ecoute, fils d’Achitob. Et Achimélech répondit: Je suis présent, seigneur.
१२तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.”
13 Et Saül lui dit: Pourquoi as-tu conspiré contre moi, toi et le fils d’Isaï? Pourquoi lui as-tu donné des pains et un glaive, et as-tu consulté Dieu pour lui, afin qu’il s’élevât contre moi, insidiateur persévérant jusqu’aujourd’hui?
१३शौल त्यास म्हणाला, “तू आणि इशायाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली तू त्यास भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की, त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी टपून बसावे?”
14 Et Achimélech, répondant au roi, dit: Qui parmi vos serviteurs est comme David, fidèle, gendre du roi, marchant à votre commandement, et honorable dans votre maison?
१४तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, “तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे.
15 Est-ce aujourd’hui que j’ai commencé à consulter Dieu pour lui? Loin de moi! Que le roi ne soupçonne point son serviteur, ni toute la maison de mon père d’une pareille chose; car votre serviteur ne sait de cette affaire rien de petit ou de grand.
१५आजच मी त्याच्यासाठी परमेश्वरास विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो; राजाने आपल्या दासास किंवा माझ्या वडिलाच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये कारण या सर्वांतले अधिक उणे काहीच तुझ्या दासास ठाऊक नाही.”
16 Et le roi dit: Tu mourras de mort, Achimélech, toi et toute la maison de ton père.
१६राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे; तुला व तुझ्या वडिलाच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे”
17 Puis le roi dit aux gardes qui l’environnaient: Tournez-vous, et tuez les prêtres du Seigneur; car leur main est avec David; sachant qu’il s’était enfui, ils ne me l’ont point déclaré. Mais les serviteurs du roi ne voulurent pas étendre leurs mains sur les prêtres du Seigneur.
१७मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला, “परमेश्वराच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही.” परंतु राजाचे चाकर परमेश्वराच्या याजकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात.
18 Alors le roi dit à Doëg: Tourne-toi, et jette-toi sur les prêtres. Et, s’étant tourné, Doëg l’Iduméen se jeta sur les prêtres, et il tua en ce jour-là quatre-vingt-cinq hommes vêtus d’un éphod de lin.
१८मग राजाने दवेगाला म्हटले, “तू याजकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला.” त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले.
19 Ensuite il frappa Nobé, la cité des prêtres, du tranchant du glaive, égorgeant hommes et femmes, petits enfants et les enfants à la mamelle, bœuf, âne et brebis.
१९त्याने याजकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला; पुरुष स्त्रिया बालके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जिवे मारली.
20 Mais un des fils d’Achimélech, dont le nom était Abiathar, s’étant échappé, s’enfuit vers David.
२०तेव्हा अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याचा अब्याथार नांवाचा एक मुलगा सुटून दावीदाकडे पळून गेला.
21 Et il lui annonça que Saül avait tué les prêtres du Seigneur.
२१शौलाने परमेश्वराच्या याजकांना जिवे मारले हे अब्याथाराने दावीदाला कळवले.
22 Et David dit à Abiathar: Je savais en ce jour que puisque Doëg l’Iduméen était là, il avertirait certainement Saül: c’est moi qui suis coupable de la mort de toutes les âmes de la maison de ton père.
२२तेव्हा दावीदाने अब्याथाराला म्हटले, “दवेग अदोमी येथे होता, त्याच दिवशी मला समजले की, तो शौलाला खचित सांगेल. मी तुझ्या वडिलाच्या घराण्याच्या सर्व मनुष्यांस मरणास कारण झालो आहे.
23 Demeure avec moi, et ne crains point: si quelqu’un cherche mon âme, il cherchera aussi ton âme, et tu seras sauvé avec moi.
२३माझ्याजवळ राहा भिऊ नको; कारण जो मला जिवे मारायला पाहतो तोच तुला जिवे मारायला पाहतो आहे. पण माझ्याजवळ तुझे रक्षण होईल.”

< 1 Samuel 22 >