< 1 Samuel 11 >

1 Et il arriva environ un mois après que Naas, roi des Ammonites, monta et commença à combattre contre Jabès-Galaad. Et tous les hommes de Jabès dirent à Naas: Acceptez-nous comme alliés, et nous vous servirons.
मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.”
2 Et Naas, l’Ammonite, leur répondit: L’alliance que je ferai avec vous, sera que je vous arracherai à tous l’œil droit et que je vous rendrai l’opprobre de tout Israël.
तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हाशी अशा अटीवर करार करीन की, मी तुम्हातील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्राएलाची मानहानी करीन.”
3 Et les anciens de Jabès lui répliquèrent: Accordez-nous sept jours, afin que nous envoyions des messagers dans tous les confins d’Israël, et s’il n’y a personne pour nous défendre, nous viendrons à vous.
तेव्हा याबेशच्या वडिल जनांनी त्यास म्हटले, “आम्हांला सात दिवसाचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हास सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.”
4 Les messagers vinrent donc à Gabaa, patrie de Saül, et rapportèrent ces paroles, le peuple l’entendant; alors tout le peuple éleva sa voix, et pleura.
आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे येऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हा सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले.
5 Et voilà que Saul venait de la campagne, suivant les bœufs, et il dit: Qu’a le peuple, qu’il pleure? Et on lui raconta les paroles des hommes de Jabès.
आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला, “लोकांस काय झाले? म्हणून ते रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्यास याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले.
6 Or, l’esprit du Seigneur se saisit de Saül, lorsqu’il eut entendu ces paroles, et sa fureur fut très irritée.
तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला.
7 Et prenant l’un et l’autre bœufs, il les coupa en morceaux, et les envoya dans tous les confins d’Israël par la main des messagers, disant: Quiconque ne sortira pas et ne suivra pas Saül et Samuel, c’est ainsi qu’il sera fait à ses bœufs. Ainsi la crainte du Seigneur saisit le peuple, et ils sortirent comme un seul homme.
मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले.
8 Et Saül en fit la revue à Bézech, et il y eut trois cent mille enfants d’Israël; mais des hommes de Juda, trente mille.
मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते.
9 Et ils dirent aux messagers qui étaient venus: C’est ainsi que vous direz aux hommes qui sont à Jabès-Galaad: Demain, le salut sera pour vous, lorsque le soleil sera devenu chaud. Les messagers vinrent donc, et apportèrent cette nouvelle aux hommes de Jabès, qui se livrèrent à la joie.
तेव्हा जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले, “याबेश-गिलादाच्या मनुष्यांना असे सांगा की, उद्या सूर्य तापेल तेव्हा तुमची सुटका होईल.” मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हा ते आनंदीत झाले.
10 Et ils dirent: Demain nous nous donnerons à vous, et vous nous ferez tout ce qui vous plaira.
१०मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.”
11 Or, il arriva, que lorsque le lendemain fut venu, Saül partagea le peuple en trois parties; et il entra au milieu du camp pendant la veille du matin, et il battit Ammon, jusqu’à ce que le soleil fût devenu chaud. Ceux qui échappèrent furent dispersés, de manière qu’il n’en resta pas deux ensemble.
११मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली.
12 Alors le peuple dit à Samuel: Quel est celui qui a dit: Est-ce que Saul régnera sur nous? Donnez-nous ces hommes, et nous les tuerons.
१२मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.”
13 Et Saül répondit: Personne ne sera mis à mort en ce jour, parce que le Seigneur a accordé aujourd’hui le salut dans Israël.
१३तेव्हा शौल बोलला, “आज कोणाही मनुष्यास जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्वराने इस्राएलास सोडवले आहे.”
14 Mais Samuel dit au peuple: Venez, et allons à Galgala, et proclamons-y de nouveau la royauté.
१४तेव्हा शमुवेलाने लोकांस म्हटले, “चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.”
15 Et tout le peuple alla à Galgala, et ils y firent Saul roi devant le Seigneur, à Galgala; et ils immolèrent là des victimes pacifiques devant le Seigneur. Et Saül se livra là, ainsi que tous les peuples d’Israël, à une joie très grande.
१५मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हा तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.

< 1 Samuel 11 >