< Sophonie 1 >
1 La parole de l'Éternel qui fut adressée à Sophonie, fils de Cusi, fils de Gédalia, fils d'Amaria, fils d'Ézéchias, au temps de Josias, fils d'Amon, roi de Juda.
१यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा योशीया याच्या दिवसात, परमेश्वराचे हे वचन सफन्या जो कूशीचा मुलगा, जो गदल्याचा मुलगा, जो अमऱ्याचा मुलगा, जो हिज्कीयाचा मुलगा, याजकडे आले. ते असे,
2 Je vais tout enlever de la surface de la terre, dit l'Éternel,
२परमेश्वर असे म्हणतो की, “मी पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा पूर्णपणे नाश करीन.
3 enlever hommes et bêtes, enlever les oiseaux des Cieux et les poissons de la mer, et les scandales avec les impies, et j'exterminerai les hommes de la surface du sol, dit l'Éternel.
३मी मनुष्य व प्राणी यांचा नाश करीन; मी आकाशांतले पक्षी व समुद्रातील मासे आणि दुष्ट व त्याचे अडखळणे नष्ट करीन. मनुष्य पृथ्वीवरून मी नाहीसा करून टाकीन, असे परमेश्वर म्हणतो.
4 Et j'étendrai ma main sur Juda, et sur tous les habitants de Jérusalem, et j'exterminerai de ce lieu les restes de Baal, le nom des prêtres avec les sacrificateurs,
४मी आपला हात यहूदावर आणि यरूशलेमवासीयांवर लांब करीन व बआलमूर्तीचे उरलेले आणि याजकांमधील मूर्तीपूजक लोक यांचे नाव मी या जागेवरून नष्ट करीन.
5 et ceux qui adorent sur les toits l'armée des Cieux, et ceux qui adorent l'Éternel, lui prêtent serment et jurent par leur roi,
५जे घरावर स्वर्गातल्या सैन्यांचे भजन करतात ते, जे आणि परमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिल्कोमाची ही शपथ वाहतात,
6 et ceux qui ont déserté l'Éternel et qui ne cherchent point l'Éternel, et ne se soucient pas de lui.
६आणि जे परमेश्वरास अनुसरण्यापासून मागे फिरले आहेत, आणि त्यांनी परमेश्वराचा शोध घेतला नाही व त्याचे मार्गदर्शन घेतले नाही, त्यांना मी या स्थानातून नष्ट करून टाकीन.”
7 Silence devant le Seigneur, l'Éternel! car la journée de l'Éternel est proche; car l'Éternel a préparé un sacrifice, Il a sanctifié ses conviés.
७प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीत शांत राहा, कारण परमेश्वराच्या न्यायाचा दिवस जवळ येत आहे; कारण परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे, आणि त्याने आपल्या पाहुण्यांना पवित्र केले आहे.
8 Et il arrivera au jour du sacrifice de l'Éternel que je châtierai les princes et les fils du roi et tous ceux qui revêtent les vêtements de l'étranger;
८“परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, असे होईल की, मी राजाची मुले व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन आणि परदेशीय वस्रे घातलेल्यांनाही मी शिक्षा देईन.
9 et je châtierai tous ceux qui franchissent le seuil, en cette journée-là, et remplissent les maisons de leurs maîtres de rapine et de fraude.
९तेव्हा उंबऱ्यावरुन उडी मारणाऱ्यांना आणि जे आपल्या धन्याचे घर फसवणूक व हिंसाचाराने भरतात त्यांना मी त्या दिवशी शिक्षा देईन.”
10 En cette journée-là, dit l'Éternel, des cris retentiront de la porte des poissons, et des gémissements de la ville basse et un grand fracas des collines.
१०परमेश्वर असेही म्हणाला, त्या दिवशी, मासळी दारातून आक्रंदनाचा आवाज येईल, दुसऱ्या भागातून आकांत आणि टेकड्यांवरून मोठा धडाक्याचा आवाज होईल.
11 Gémissez, habitants du mortier! Car c'en est fait de tout le peuple des Cananéens, et tous les hommes chargés d'argent seront exterminés.
११मक्तेशातल्या रहिवाश्यांनो गळा काढून रडा, कारण सर्व व्यापाऱ्यांचा नाश झाला आहे, चांदीने लादलेले सर्व नाहीसे झाले आहेत.
12 Et dans ce temps-là je fouillerai Jérusalem aux lanternes et châtierai tous ces hommes assis sur leurs lies, qui disent en leur cœur: « L'Éternel ne fait point de bien et point de mal. »
१२“तेव्हा मी एक दिवा घेऊन यरूशलेमेतून शोध करीन, जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे स्वस्थ बसले आहेत, त्यांना मी शिक्षा करीन. ते आपल्या मनात असे बोलतात, ‘परमेश्वर काहीही चांगले किंवा वाईट करणार नाही.’
13 Et leur opulence sera une proie, et leurs maisons une ruine; et ils ont bâti des maisons, mais ils ne les habiteront pas, et planté des vignes, mais ils n'en boiront pas le vin.
१३त्यांची संपत्ती लूट अशी होईल, आणि त्यांच्या घरांचा त्याग करण्यात येईल. ते घरे बांधतील पण त्या घरात राहणार नाहीत आणि ते द्राक्षमळे लावतील, पण त्यांना द्राक्षरस प्यायला मिळणार नाही.
14 La journée de l'Éternel, la grande journée est proche, elle est proche, et s'avance rapidement; on entend la journée de l'Éternel; alors le héros poussera des cris amers.
१४परमेश्वराचा महान दिवस जवळ येत आहे. तो जवळ आहे आणि वेगाने येऊ पाहत आहे! परमेश्वराच्या दिवसाचा आवाज होतो, तेथे वीर दु: खाने ओरडत आहे.
15 Ce jour-là est un jour de colère, un jour de détresse et d'angoisse, un jour de dévastation et de désolation, un jour de ténèbres et d'obscurité, un jour nuageux et sombre,
१५तो दिवस क्रोधाचा, दु: खाचा व क्लेशाचा दिवस आहे, वादळ व नासधूस ह्यांचा दिवस आहे, उजाडीचा व ओसाडीचा दिवस, अभ्रांचा व अंधाराचा दिवस आहे.
16 un jour de bruit de trompettes et de cris de guerre contre les villes fortes et les tours élevées.
१६तो दिवस तटबंदीच्या शहरांविरूद्ध आणि उंच बूरूजांविरूद्ध तुतारीच्या शब्दाचा व गजराचा असा आहे.
17 Et je mettrai les hommes à la gêne, et ils iront comme des aveugles, car ils péchèrent contre l'Éternel, et leur sang sera répandu comme de la poussière, et leur chair comme de l'ordure.
१७मी मनुष्यजातीवर पीडा आणीन, तेव्हा ते अंधळ्यांप्रमाणे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे. त्याचे रक्त धूळीसारखे ओतले जाईल, व त्यांचे मांस शेणासारखे फेकले जाईल.
18 Ni leur argent, ni leur or ne pourra les sauver au jour de la colère de l'Éternel, et par le feu de son courroux tout le pays sera consumé; car c'est d'une ruine, oui, d'une ruine soudaine, qu'il frappera tous les habitants du pays.
१८परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे सोनेचांदी त्यांना वाचवू शकणार नाही. तर त्याच्या क्रोधाच्या अग्नीने सारी भूमी खाऊन टकली जाईल, कारण देशांतल्या सर्व राहणाऱ्यांविरुद्ध जो नाश तो आणणार आहे, तो भयानक असेल!”