< Zacharie 3 >

1 Et Il me fit voir Josué, le grand sacrificateur, debout devant l'ange de l'Éternel, et Satan debout à sa droite pour l'attaquer.
देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.
2 Et l'Éternel dit à Satan: Que l'Éternel te tance, Satan, que l'Éternel te tance, lui qui a choisi Jérusalem! Celui-ci n'est-il pas un tison sauvé du feu?
मग परमेश्वराचा दूत सैतानाला म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला धमकावो. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरूशलेमची निवड केली आहे, तो तुला धमकावो. आगीतून कोलीत ओढून काढावे, तसा हा नाही काय?”
3 Et Josué était vêtu d'habits sales, et se tenait debout devant l'ange;
यहोशवा देवदूतापुढे मळकट वस्त्रे घालून उभा होता.
4 lequel prit la parole et dit à ceux qui étaient debout devant lui: Otez-lui ses habits sales! et lui dit: Voici! je te décharge de ton crime, et te revêts de superbes habits.
म्हणून जवळ उभ्या असलेल्या इतरांना हा देवदूत म्हणाला, “याच्यावरची मळकट वस्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत यहोशवाला बोलला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि मी तुला भरजरी वस्त्रे नेसवत आहे.”
5 Et je dis: Qu'on pose une tiare pure sur sa tête! Et ils posèrent une tiare pure sur sa tête et lui mirent des habits. Et l'ange de l'Éternel y présidait.
तो म्हणाला, “त्यांनी त्याच्या डोक्यावर स्वच्छ फेटा बांधावा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला आणि परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्यास स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली.
6 Et l'ange de l'Éternel lit à Josué cette déclaration solennelle:
पुढे परमेश्वराच्या दूताने यहोशवाला गंभीरतेने आज्ञा केली आणि म्हणाला,
7 Ainsi parle l'Éternel des armées: Si tu suis mes voies et observes mes ordonnances, tu jugeras aussi ma maison, et garderas mes parvis, et je te donnerai des guides parmi ceux qui sont ici présents.
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या मार्गात चालशील, आणि तू माझ्या आज्ञा पाळशील, तर तूच माझ्या मंदिराचा मुख्य अधिकारी होशील आणि मंदिराच्या अंगणाची तू निगा राखशील. माझ्यासमोर उभ्या असलेल्यामध्ये तुला जाता-येता येईल असे मी करीन.
8 Écoute donc, Josué, grand sacrificateur, toi et tes collègues siégeant devant toi! (Car ce sont des hommes figuratifs; car, voici, je fais arriver mon serviteur, le Germe.)
तेव्हा हे यहोशवा मुख्य याजका, तू स्वत: व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका! ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील.
9 Car, voici, la pierre que j'ai placée devant Josué, sur cette seule pierre sept yeux sont fixés et j'en graverai les traits, dit l'Éternel des armées, et j'enlèverai le crime de ce pays en un jour.
आता मी यहोशवापुढे ठेवलेला दगड पाहा. या एका दगडाला सात बाजू आहेत, आणि मी त्यावर एक शिलालेख कोरीन. ‘हा सेनाधीश परमेश्वर आहे’ आणि मी एका दिवसात या देशातील अधर्म नाहीसा करीन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
10 En ce jour-là, dit l'Éternel des armées, vous vous crierez l'un à l'autre: Sous la vigne et sous le figuier!
१०सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.”

< Zacharie 3 >