< Psaumes 88 >
1 Éternel, Dieu de ma délivrance, je crie jour et nuit devant toi.
१कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.
2 Que ma prière parvienne en ta présence; incline ton oreille à mon cri.
२माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
3 Car mon âme est rassasiée de maux, et ma vie touche au séjour des morts. (Sheol )
३कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. (Sheol )
4 Je suis compté parmi ceux qui descendent dans la fosse; je suis comme un homme sans vigueur,
४खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; मी असहाय्य मनुष्यासारखा आहे.
5 Gisant parmi les morts, tel que les blessés à mort, qui sont couchés dans le tombeau, dont tu ne te souviens plus, et qui sont séparés de ta main.
५मला मृतामध्ये सोडून दिले आहे; अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
6 Tu m'as mis dans la fosse la plus basse, dans les lieux ténébreux, dans les abîmes.
६तू मला त्या खड्यांतल्या खालच्या भागात, काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस.
7 Ta colère pèse sur moi, et tu m'accables de tous tes flots. (Sélah)
७तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत.
8 Tu as éloigné de moi ceux que je connais; tu m'as rendu pour eux un objet d'horreur; je suis enfermé et je ne puis sortir.
८तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.
9 Mon œil se consume par l'affliction; je t'invoque, ô Éternel, tous les jours; j'étends mes mains vers toi.
९कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे.
10 Feras-tu quelque merveille pour les morts? Ou les trépassés se lèveront-ils pour te louer? (Sélah)
१०तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय?
11 Annoncera-t-on ta bonté dans le tombeau, et ta fidélité dans l'abîme?
११तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा मृतांच्या जागी घोषणा होईल का?
12 Connaîtra-t-on tes merveilles dans les ténèbres, et ta justice dans la terre d'oubli?
१२तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय?
13 Et moi, Éternel, je crie à toi; ma prière te prévient dès le matin.
१३परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
14 Éternel, pourquoi rejettes-tu mon âme, et me caches-tu ta face?
१४हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस?
15 Je suis affligé et comme expirant dès ma jeunesse; je suis chargé de tes terreurs, je suis éperdu.
१५मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.
16 Tes fureurs ont passé sur moi; tes épouvantes me tuent.
१६तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे.
17 Elles m'environnent comme des eaux chaque jour; elles m'enveloppent toutes à la fois.
१७त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.
18 Tu as éloigné de moi amis et compagnons; ceux que je connais, ce sont les ténèbres.
१८तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. माझा परिचयाचा केवळ काळोख आहे.