< Psaumes 69 >
1 Sauve-moi, ô Dieu, car les eaux ont atteint ma vie!
१दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला तार; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन पोहचले आहे.
2 Je suis plongé dans un bourbier profond, où je ne puis prendre pied; je suis entré dans l'abîme des eaux, et les flots m'ont submergé.
२मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.
3 Je suis las de crier; ma gorge est desséchée; mes yeux se consument à attendre mon Dieu.
३माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत.
4 Ceux qui me haïssent sans cause, passent en nombre les cheveux de ma tête; ceux qui m'attaquent et qui sont mes ennemis sans sujet, se renforcent; je dois alors rendre ce que je n'ai pas ravi.
४विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत; जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले.
5 O Dieu! tu connais ma folie, et mes fautes ne te sont point cachées.
५हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत.
6 Que ceux qui s'attendent à toi ne soient pas honteux à cause de moi, Seigneur, Éternel des armées! Que ceux qui te cherchent ne soient pas confus à mon sujet, ô Dieu d'Israël!
६हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.
7 Car c'est pour toi que je porte l'opprobre, et que la honte a couvert mon visage.
७कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; लाजेने माझे तोंड झाकले आहे.
8 Je suis devenu un étranger pour mes frères, et un inconnu pour les fils de ma mère.
८मी आपल्या बंधूला परका झालो आहे, आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे.
9 Car le zèle de ta maison m'a dévoré, et les outrages de ceux qui t'outragent sont tombés sur moi,
९कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत.
10 Et j'ai pleuré en jeûnant; mais cela même m'a été un opprobre.
१०जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली, तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती.
11 J'ai aussi pris le sac pour vêtement; mais j'ai été l'objet de leurs railleries.
११जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले, तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो.
12 Ceux qui sont assis à la porte s'entretiennent de moi; les buveurs de boissons fortes font de moi le sujet de leurs chansons.
१२जे नगराच्या वेशीत बसतात; ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो.
13 Pour moi, ma prière s'adresse à toi, ô Éternel, dans le temps de ta faveur. O Dieu, selon ta grande bonté, réponds-moi et me délivre, selon ta fidélité!
१३पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
14 Tire-moi du bourbier, et que je n'enfonce pas; que je sois délivré de mes ennemis et des eaux profondes!
१४मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस; माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ.
15 Que le courant des eaux ne me submerge pas, que je ne sois pas englouti par le gouffre, et que la fosse ne referme pas sa bouche sur moi!
१५पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, खोल डोह मला न गिळो. खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो.
16 Éternel, réponds-moi, car ta faveur est bonne; selon la grandeur de tes compassions, tourne-toi vers moi!
१६हे परमेश्वरा, मला उत्तर दे, कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे.
17 Et ne cache pas ta face à ton serviteur, car je suis en détresse; hâte-toi, réponds-moi!
१७आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस, कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे.
18 Approche-toi de mon âme, rachète-la; à cause de mes ennemis, délivre-moi!
१८माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे; माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव.
19 Toi, tu sais mon opprobre, et ma honte, et ma confusion; tous mes adversaires sont devant tes yeux.
१९तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे; माझे विरोधक माझ्यापुढे आहेत;
20 L'opprobre m'a brisé le cœur, et je suis languissant; j'ai attendu de la compassion, mais il n'y en a point; des consolateurs, mais je n'en trouve pas.
२०निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही.
21 Ils mettent du fiel dans ma nourriture, et dans ma soif ils m'abreuvent de vinaigre.
२१त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; मला तहान लागली असता आंब दिली
22 Que leur table devienne un piège devant eux, et un filet dans leur sécurité!
२२त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.
23 Que leurs yeux s'obscurcissent pour ne plus voir; et fais trembler continuellement leurs reins!
२३त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर.
24 Répands sur eux ton indignation, et que l'ardeur de ton courroux les atteigne!
२४तू त्यांच्यावर आपला संताप ओत, आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो.
25 Que leur demeure soit déserte, et que personne n'habite dans leurs tentes!
२५त्यांची ठिकाणे ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.
26 Car ils persécutent celui que tu as frappé, et ils racontent la douleur de ceux que tu as blessés.
२६कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात; तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात.
27 Ajoute iniquité à leurs iniquités, et qu'ils n'aient point de part à ta justice.
२७ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव; तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको.
28 Qu'ils soient effacés du livre de vie, et ne soient pas inscrits avec les justes!
२८जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत.
29 Pour moi, je suis affligé et dans la douleur; ta délivrance, ô Dieu, me mettra dans une haute retraite!
२९पण मी गरीब आणि दु: खी आहे; हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.
30 Je célébrerai le nom de Dieu par des chants; je le magnifierai par des louanges.
३०मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.
31 Et cela plaira mieux à l'Éternel qu'un taureau, qu'un veau ayant des cornes et l'ongle divisé.
३१ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.
32 Les humbles le verront et se réjouiront; votre cœur revivra, vous qui cherchez Dieu.
३२लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो.
33 Car l'Éternel écoute les misérables, et il ne dédaigne point ses captifs.
३३कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.
34 Que les cieux et la terre le louent, les mers et tout ce qui s'y meut!
३४आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा.
35 Car Dieu sauvera Sion et bâtira les villes de Juda; on y habitera, on la possédera.
३५कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील; लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल.
36 La race de ses serviteurs l'aura pour héritage; ceux qui aiment son nom, y auront leur demeure.
३६त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील; आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील.