< Matthieu 4 >
1 Alors Jésus fut emmené par l'Esprit au désert, pour être tenté par le diable.
१मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले.
2 Il jeûna quarante jours et quarante nuits, après quoi il eut faim.
२चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली.
3 Et le tentateur l'ayant abordé, lui dit: «Si tu es Fils de Dieu, ordonne que ces pierres se changent en pains.»
३तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.”
4 Mais Jésus répondit: Il est écrit: «l’homme ne vivra pas de pain seulement, mais de toute parole qui sort de la bouche de Dieu.»
४परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’”
5 Alors le diable le transporta dans la ville sainte, le posa à l'extrémité de l'aile du temple,
५मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले.
6 et lui dit: «Si tu es Fils de Dieu, jette-toi en bas; car il est écrit: «Il donnera des «ordres à ses anges, à ton sujet; et ils te porteront sur leurs bras, de peur que ton pied ne heurte contre une pierre.»
६आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की; ‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’”
7 Jésus lui dit: Il est écrit aussi: «Tu ne tenteras point le Seigneur ton Dieu.»
७येशूंनी त्यास म्हटले, “असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’”
8 Le diable le transporta encore sur une montagne très-haute, lui montra tous les royaumes du monde et leur gloire,
८मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली.
9 et lui dit: «Je te donnerai tout cela, si, te jetant à mes pieds, tu m'adores.»
९आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.”
10 Jésus lui dit: Retire-toi, Satan; car il est écrit: «Tu adoreras le Seigneur ton Dieu, et tu le serviras lui seul.»
१०येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’”
11 Alors le diable le quitta; et des anges s'approchèrent, et ils le servirent.
११मग सैतान येशुंना सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशुंची सेवा करू लागले.
12 Jésus ayant appris que Jean avait été mis en prison, se retira en Galilée.
१२योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला.
13 Il quitta Nazareth et alla s'établir à Capernaoum, ville située au bord de la mer, dans le territoire de Zabulon et de Nephthali,
१३नासरेथ सोडून जबुलून व नफताली यांच्या सीमेतील, गालीलच्या सरोवराच्या कफर्णहूमात तो जाऊन राहिला.
14 afin que s'accomplît ce qui a été dit par Esaïe, le prophète:
१४यशया संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. ते असे होते की,
15 «La terre de Zabulon et la terre de Nephthali, ce pays qui s’étend vers la mer jusqu'au delà du Jourdain, la Galilée des Gentils,
१५“जबुलून आणि नफताली हा प्रांत, सरोवराच्या किनाऱ्यावरील, यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व परराष्ट्रीय गालील
16 ce pays, qui était plongé dans les ténèbres, a vu une grande lumière, et la lumière s'est levée sur ceux qui étaient dans la région et dans l’ombre de la mort.»
१६जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.”
17 Dès lors Jésus se mit à prêcher, disant: «Repentez-vous, car le royaume des cieux est proche.»
१७तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.”
18 Comme il cheminait le long de la mer de Galilée, il vit deux frères, Simon, appelé Pierre, et André, son frère, qui jetaient leurs filets dans la mer, car ils étaient pêcheurs.
१८नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते.
19 Et il leur dit: «Venez, suivez-moi, et je vous ferai pêcheurs d'hommes.»
१९येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”
20 Aussitôt ils quittèrent leurs filets, et le suivirent.
२०मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले.
21 Puis, un peu plus loin, il vit deux autres frères, Jacques, fils de Zébédée, et Jean, son frère, qui raccommodaient leurs filets dans leur barque avec Zébédée leur père, et il les appela.
२१येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले,
22 Aussitôt ils quittèrent leur barque et leur père, et le suivirent.
२२तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले.
23 Jésus allait par toute la Galilée, enseignant dans les synagogues, prêchant la bonne nouvelle du royaume et guérissant
२३गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले.
24 toute maladie et toute infirmité parmi le peuple. Sa renommée se répandit dans toute la Syrie, et on lui amena tous ceux qui se portaient mal, qui étaient affligés de maladies et de douleurs diverses, des démoniaques, des lunatiques, des paralytiques, et il les guérit.
२४येशूविषयीची बातमी सर्व सिरीया प्रांतभर पसरली; मग जे आजारांनी व अनेक प्रकारच्या रोगांनी पीडीत होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षघात झाला होता अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले.
25 Une grande foule le suivit de la Galilée, de la Décapole, de Jérusalem, de la Judée et d'au delà du Jourdain.
२५मग गालील प्रांत, दकापलीस नगर, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालू लागले.