< Psaumes 51 >
1 Psaume de David, au maître chantre. Touchant ce que Nathan le Prophète vint à lui, après qu'il fut entré vers Bathsebah. Ô Dieu! aie pitié de moi selon ta gratuité, selon la grandeur de tes compassions efface mes forfaits.
१मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे. हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.
2 Lave-moi parfaitement de mon iniquité, et me nettoie de mon péché.
२देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.
3 Car je connais mes transgressions, et mon péché est continuellement devant moi.
३कारण माझे अपराध मला माहित आहेत. आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत.
4 J'ai péché contre toi, contre toi proprement, et j'ai fait ce qui déplaît à tes yeux: afin que tu sois connu juste quand tu parles, [et] trouvé pur, quand tu juges.
४तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.
5 Voilà, j'ai été formé dans l'iniquité, et ma mère m'a échauffé dans le péché.
५पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
6 Voilà, tu aimes la vérité dans le cœur, et tu m'as enseigné la sagesse dans le secret [de mon cœur].
६पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.
7 Purifie-moi du péché avec de l'hysope, et je serai net; lave-moi, et je serai plus blanc que la neige.
७मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
8 Fais-moi entendre la joie et l'allégresse, et fais que les os que tu as brisés se réjouissent.
८आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
9 Détourne ta face de mes péchés, et efface toutes mes iniquités.
९माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
10 Ô Dieu! crée-moi un cœur net, et renouvelle au dedans de moi un esprit bien remis.
१०देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
11 Ne me rejette point de devant ta face, et ne m'ôte point l'Esprit de ta Sainteté.
११तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 Rends-moi la joie de ton salut, et que l'Esprit de l'affranchissement me soutienne.
१२तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
13 J'enseignerai tes voies aux transgresseurs, et les pécheurs se convertiront à toi.
१३तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
14 Ô Dieu! Dieu de mon salut, délivre-moi de tant de sang, [et] ma langue chantera hautement ta justice.
१४हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन.
15 Seigneur, ouvre mes lèvres, et ma bouche annoncera ta louange.
१५प्रभू, माझे ओठ उघड, आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल.
16 Car tu ne prends point plaisir aux sacrifices, autrement j'en donnerais; l'holocauste ne t'est point agréable.
१६कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही.
17 Les sacrifices de Dieu sont l'esprit froissé: ô Dieu! tu ne méprises point le cœur froissé et brisé.
१७देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
18 Fais du bien selon ta bienveillance à Sion, [et] édifie les murs de Jérusalem.
१८हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध.
19 Alors tu prendras plaisir aux sacrifices de justice, à l'holocauste, et aux sacrifices qui se consument entièrement par le feu; alors on offrira des veaux sur ton autel.
१९तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.