< Psaumes 143 >
1 Psaume de David, quand son fils le poursuivait. Seigneur, écoute ma prière; prête l'oreille à ma prière en ta vérité; exauce-moi en ta justice.
१दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे. तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे.
2 Et n'entre point en jugement avec ton serviteur; car nul homme vivant ne sera justifié devant toi.
२तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस. कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही.
3 L'ennemi a poursuivi mon âme; il a humilié ma vie jusqu'à terre; il m'a mis dans un lieu de ténèbres, comme les morts du siècle passé;
३शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत; त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे.
4 Et mon esprit a été dans l'anxiété, et moi, mon cœur a été troublé.
४माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे; माझे हृदय घाबरे झाले आहे.
5 Je me suis souvenu des jours antiques, et j'ai médité sur toutes tes actions; j'ai médité sur les œuvres de tes mains.
५मी पूर्वीचे दिवस आठवतो; मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.
6 Et j'ai étendu les mains vers toi; mon âme est devant toi comme une terre sans eau.
६मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे.
7 Seigneur, exauce-moi au plus tôt; mon esprit a défailli; ne détourne pas de moi ta face, car je serais semblable à ceux qui descendent dans le lac.
७हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन.
8 Fais que dès l'aurore j'entende ta miséricorde; car j'ai espéré en toi. Fais-moi connaître, Seigneur, la voie où je dois marcher; car j'ai élevé vers toi mon âme.
८सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
9 Délivre-moi de mes ennemis, Seigneur; car je me suis réfugié vers toi.
९हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो.
10 Enseigne-moi à faire ta volonté; car tu es mon Dieu. Ton Esprit, plein de bonté, me guidera dans la droiture.
१०मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो.
11 Pour l'amour de ton nom, Seigneur, tu me vivifieras en ta justice; tu retireras mon âme de la tribulation.
११हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ.
12 Et dans ta miséricorde tu extermineras mes ennemis; tu détruiras tous ceux qui tourmentent mon âme, car je suis ton serviteur.
१२तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर; आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे.