< Genèse 18 >
1 Et Dieu lui apparut près du chêne de Membré, tandis qu'il était assis sur la porte de sa tente à midi.
१परमेश्वराने मम्रेच्या एलोन झाडांजवळ अब्राहामाला दर्शन दिले, तेव्हा तो दुपारच्या उन्हाच्या वेळी तंबूच्या दाराशी बसला होता.
2 Comme il levait les yeux, il aperçut trois hommes placés au-dessus de lui; et les ayant vus, il courut de la porte de sa tente à leur rencontre, et il se prosterna jusqu'à terre,
२त्याने वर पाहिले आणि, पाहा, आपल्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याने पाहिले. अब्राहामाने जेव्हा त्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना भेटण्यासाठी तंबूच्या दारापासून पळत गेला आणि त्याने त्यांना जमिनीपर्यंत खाली वाकून नमन केले.
3 En disant: Seigneur, si j'ai trouvé grâce devant vous, ne passez point outre devant votre serviteur.
३तो म्हणाला, “प्रभू, जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुझ्या सेवकाला सोडून पुढे जाऊ नका.
4 Que l'on prépare l'eau, que mes serviteurs vous lavent les pieds et rafraîchissez-vous sous le chêne.
४थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा.
5 Pour moi, j'apporterai du pain, et vous mangerez; puis, vous poursuivrez votre voyage: c'est pour cela que vous êtes venus vers votre serviteur. Le Seigneur dit: Qu'il soit fait comme tu le demandes.
५मी तुमच्यासाठी थोडे अन्न आणतो, जेणेकरून तुम्हास ताजेतवाने वाटेल. मग तुम्ही तुमच्या मार्गाने जा, यासाठीच तुमच्या या सेवकाकडे तुमचे येणे झाले असावे.” आणि ते म्हणाले, “तू म्हणतोस तसे कर.”
6 Abraham se hâta donc d'entrer sous sa tente vers Sarra, et il lui dit: Dépêche-toi, pétris trois mesures de fleur de farine, et fais-nous cuire des pains sous la cendre.
६अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”
7 Puis, Abraham courut aux bœufs, et prit un beau petit veau bien tendre, qu'il donna au serviteur, en le pressant de l'apprêter.
७नंतर अब्राहाम गुरांच्या कळपाकडे पळत गेला आणि त्यातून त्याने कोवळे आणि चांगले वासरू घेतले आणि सेवकाजवळ देऊन त्याने त्यास ते लवकर तयार करण्यास सांगितले.
8 De son côté, il prit du beurre et du lait, ainsi que le veau qu'il avait fait préparer, et il plaça le tout devant ses hôtes qui mangèrent. Lui-même cependant se tenait devant eux sous le chêne.
८त्याने तयार केलेले वासरू, तसेच दूध व लोणी त्यांच्यापुढे खाण्यासाठी ठेवले आणि ते जेवत असता तो झाडाखाली त्यांच्याजवळ उभा राहिला.
9 Le Seigneur lui dit: Où est Sarra ta femme? Il répondit: La voici sous la tente.
९ते त्यास म्हणाले, “तुझी पत्नी सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.”
10 Je reviendrai, dit le Seigneur, vers toi à pareille époque, et Sarra ta femme aura un fils. Or, Sarra entendit derrière la porte de la tente où elle était.
१०त्यांच्यातील एक म्हणाला, “मी वसंतऋतूच्या वेळी तुझ्याकडे नक्की परत येईन, आणि पाहा तेव्हा तुझी पत्नी सारा हिला मुलगा होईल.” तेव्हा त्याच्यामागे असलेल्या तंबूच्या दारामागून सारेने हे ऐकले.
11 Or, Abraham et Sarra étaient vieux, ayant vécu bien des jours; Sarra avait même cessé d'avoir ce qui arrive aux femmes.
११आता अब्राहाम व सारा म्हातारे झाले होते, त्यांचे वय बरेच झाले होते, आणि स्त्रीला ज्या वयात मुले होऊ शकतात, ते साराचे वय निघून गेले होते.
12 Sarra rit donc en elle-même, disant: Cela ne m'est point encore arrivé jusqu'ici, et mon seigneur est un vieillard.
१२म्हणून सारा स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा पतीही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?”
13 Mais le Seigneur dit à Abraham: Pourquoi Sarra a-t-elle ri en elle-même, disant: Enfanterai-je véritablement, moi qui suis devenue vieille?
१३परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली?
14 Est-ce que rien est impossible à Dieu? Je reviendrai près de toi à pareille époque, et Sarra aura un fils.
१४परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.”
15 Alors Sarra nia, disant: Je n'ai point ri, car elle eut peur; et le Seigneur lui dit: Non, mais tu as ri.
१५नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”
16 Et, s'étant levés de ce lieu, les trois hommes regardèrent du côté de Sodome et de Gomorrhe, et Abraham partit avec eux pour les reconduire.
१६नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे जाण्यास निघाले. अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर गेला.
17 Bientôt le Seigneur dit: Ne dévoilerai-je point les choses que je fais à Abraham, mon serviteur,
१७परमेश्वर देव म्हणाला, “मी जे काही करणार आहे ते अब्राहामापासून लपवू काय?
18 A lui qui doit devenir père d'une nation grande et nombreuse, et en qui seront bénies toutes les nations de la terre?
१८कारण अब्राहामापासून खरोखर एक महान व समर्थ राष्ट्र होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील.
19 Car je sais qu'il donnera ses ordres à ses fils et à sa maison après lui; et ils garderont les voies du Seigneur en pratiquant l'équité et la justice, afin que le Seigneur accomplisse, en faveur d'Abraham, toutes les choses qu'il lui a dites.
१९मी त्यास यासाठी निवडले आहे की, त्याने आपल्या मुलांना व कुटुंबाला अशी शिकवण द्यावी की, त्यांनी त्याच्यामागे न्यायीपणाने व धार्मिकतेने परमेश्वराचा मार्ग अनुसरावा, म्हणजे मग परमेश्वराने अब्राहामाविषयी जे सांगितले आहे ते तो त्यास प्राप्त करून द्यावे.”
20 Le Seigneur ajouta: Le cri de Sodome et de Gomorrhe s'est élevé jusqu'à moi, et leurs péchés sont énormes.
२०मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्या कारणाने,
21 Étant donc descendu, je verrai si leurs actions répondent à ce cri qui m'est parvenu; et si non, je le saurai...
२१मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.”
22 S'étant alors éloignés, les hommes s'en allèrent à Sodome, et Abraham resta devant le Seigneur.
२२मग ती माणसे तेथून वळून आणि सदोम नगराकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला.
23 Abraham s'approcha et dit: Perdrez-vous le juste avec les impies, et le juste sera-t-il comme l'impie?
२३मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय?
24 S'il y a cinquante justes dans la ville, les perdrez-vous? Ne ferez-vous point grâce à toute la contrée, à cause des cinquante justes, s'ils sont dans la ville?
२४कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय?
25 Non, vous ne ferez point cette action de tuer le juste avec les impies, car le juste serait comme l'impie; il n'en sera point ainsi; vous qui jugez toute la terre, vous ne rendriez point justice!
२५असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?”
26 Le Seigneur repartit: S'il y a cinquante justes en la ville de Sodome, j'épargnerai, à cause d'eux, toute la ville et la contrée entière.
२६परमेश्वर म्हणाला, “या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.”
27 Et Abraham répondant: Maintenant, dit-il, j'ai commencé à parler à mon Seigneur, moi, terre et poussière!
२७अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, “पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो!
28 Si les cinquante justes se réduisent à quarante-cinq, détruirez-vous toute la ville à cause des cinq? Le Seigneur dit: S'il s'y trouve quarante- cinq justes, je ne la détruirai pas.
२८समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?” आणि तो म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.”
29 Et Abraham, continuant de parler au Seigneur, dit: S'il s'en trouve quarante? Le Seigneur reprit: En faveur des quarante, je ne la détruirai pas.
२९पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.”
30 Abraham dit ensuite: Qu'en sera-t-il, Seigneur, si je parle encore? S'il s'en trouve trente? Le Seigneur dit: En faveur des trente, je ne la détruirai pas.
३०तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.”
31 Abraham ajouta: Puisqu'il m'est donné de parler au Seigneur, s'il s'en trouve vingt? Et le Seigneur répondit: Si j'en trouve vingt, je ne la détruirai pas.
३१तो म्हणाला, “मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?” परमेश्वराने उत्तर दिले, “त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
32 Et Abraham dit: Seigneur, parlerai-je encore une seule fois? S'il s'en trouve dix? Et le Seigneur dit: En faveur des dix, je ne la détruirai pas.
३२शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
33 Lorsqu'il eut cessé de parler à Abraham, le Seigneur partit, et celui-ci retourna au lieu qu'il habitait.
३३मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला.