< 1 Chroniques 6 >
1 Fils de Lévi: Gerson, Caath et Mérari.
१गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
2 Fils de Caath: Amram et Isaar, Hébron et Oziel.
२अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
3 Enfants d'Amram: Aaron, Moïse et Marie. Fils d'Aaron: Nadab et Abiud, Eléazar et Ithamar.
३अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र.
4 Eléazar engendra Phinéès, et Phinéès engendra Abisué.
४एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा.
5 Abisué engendra Bocci, et Bocci engendra Ozi.
५अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी.
6 Ozi engendra Zaraïas, et Zaraïas engendra Mariel.
६उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला.
7 Mariel engendra Amarias, et Amarias engendra Achitob.
७मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.
8 Achitob engendra Sadoc, et Sadoc engendra Achimaas.
८अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास.
9 Achimaas engendra Azarias, et Azarias engendra Johanan,
९अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान.
10 Johanan engendra Azarias; ce fut lui qui exerça le sacerdoce dans le temple que Salomon bâtit à Jérusalem.
१०योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.
11 Azarias engendra Amarias, et Amarias engendra Achitob.
११अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.
12 Achitob engendra Sadoc, et Sadoc engendra Salom.
१२अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम.
13 Salom engendra Helcias, et Helcias engendra Azarias.
१३शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.
14 Azarias engendra Saraias, et Sareas engendra Josadac.
१४अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
15 Josadac fut enlevé, avec Juda et Jérusalem, par Nabuchodonosor.
१५परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरूशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला.
16 Fils de Lévi: Gerson, Caath et Mérari.
१६गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
17 Fils de Gerson: Lobeni et Sémei.
१७लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र.
18 Fils de Caath: Amram et Isaac, Hébron et Oziel.
१८अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
19 Fils de Mérari: Mooli et Musi; voici les familles de Lévi, désignées par les noms de leurs pères.
१९महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
20 A Gerson et Lobeni son fils succèdent Jeth fils de ce dernier, Zamath son fils,
२०गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. लिब्नीचा पुत्र यहथ. यहथया पुत्र जिम्मा.
21 Joab son fils, Addi son fils, Zara son fils, Jethri son fils.
२१जिम्माचा पुत्र यवाह. यवाहाचा इद्दो. इद्दोचा पुत्र जेरह. जेरहचा यात्राय.
22 De Caath descendent: Aminadab son fils, Coré son fils, Aser son fils,
२२कहाथाचे वंशज असे, कहाथचा पुत्र अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा पुत्र अस्सीर.
23 Elcana son fils, Abisaph son fils, Aser son fils,
२३अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर.
24 Thaat son fils, Uriel son fils, Saül son fils.
२४अस्सीरचा पुत्र तहथ, तहथचा पुत्र उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.
25 D'Elcana descendent encore: Amessi et Achimoth.
२५अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे पुत्र.
26 Elcana son fils, Saphi son fils, Cénaath son fils,
२६एलकानाचा पुत्र सोफय. सोफयचा पुत्र नहथ.
27 Eliab son fils, Jéroboam son fils, Elcana son fils.
२७नहथचा पुत्र अलीयाब. अलीयाबाचा यरोहाम. यरोहामाचा एलकाना. एलकानाचा पुत्र शमुवेल.
28 Fils de Samuel: Sari, premier-né, et Ables.
२८थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र.
29 Fils de Mérari: Mooli son fils, Lobeni son fils, Sémei son fils, Oza son fils,
२९मरारीचे पुत्र, मरारीचा पुत्र महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा पुत्र शिमी. शिमीचा उज्जा.
30 Samaa son fils, Aggia son fils, Asaïas son fils.
३०उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
31 Et voici ceux que David institua chefs des chœurs du tabernacle, lorsqu'il eut transféré l'arche à Jérusalem.
३१कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
32 Et ils s'accompagnaient avec des instruments, devant le tabernacle du témoignage, jusqu'à ce que Salomon eût bâti le temple du Seigneur à Jérusalem. Et ils servaient, chacun selon la fonction qui lui était assignée.
३२यरूशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत.
33 Voici leurs noms et ceux de leurs pères: de Caath descendait: Hëman, chantre et harpiste, fils de Johel, fils de Samuel,
३३गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज, हेमान हा गवई. हा योएलाचा पुत्र. योएल शमुवेलचा पुत्र.
34 Fils d'Elcana, fils de Jéroboam, fils d'Eliel, fils de Thoü,
३४शमुवेल एलकानाचा पुत्र. एलकाना यरोहामाचा पुत्र. यरोहाम अलीएलचा पुत्र. अलीएल तोहाचा पुत्र.
35 Fils de Suph, fils d'Elcana, fils de Maath, fils d'Amathi,
३५तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र. एलकाना महथचा पुत्र. महथ अमासयाचा पुत्र.
36 Fils d'Elcana, fils de Johel, fils d'Azarias, fils de Saphanie,
३६अमासय एलकानाचा पुत्र. एलकाना योएलाचा पुत्र. योएल अजऱ्याचा पुत्र. अजऱ्या सफन्याचा पुत्र.
37 Fils de Thaath, fils d'Aser, fils d'Abiasaph, fils de Coré,
३७सफन्या तहथचा पुत्र. तहथ अस्सीरचा पुत्र. अस्सीर एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र.
38 Fils d'Isaar, fils de Caath, fils de Lévi, fils d'Israël.
३८कोरह इसहारचा पुत्र. इसहार कहाथचा पुत्र. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा पुत्र.
39 Et Asaph, chantre comme lui, qui se tenait à sa droite, était fils de Barachias, fils de Samaa,
३९आसाफ हेमानाचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा पुत्र. बरेख्या शिमाचा पुत्र.
40 Fils de Michel, fils de Baasie, fils de Melchias,
४०शिमा मीखाएलचा पुत्र. मिखाएल बासेया याचा पुत्र. बासेया मल्कीया याचा पुत्र.
41 Fils d'Athani, fils de Zaaraï, fils d'Adaï,
४१मल्कीया एथनीचा पुत्र, एथनी जेरहचा पुत्र जेरह हा अदाया याचा पुत्र.
42 Fils d'Etham, fils de Zamnaam, fils de Sémeï,
४२अदाया एतानाचा पुत्र. एथाना हा जिम्मा याचा पुत्र. जिम्मा शिमीचा पुत्र.
43 Fils de Jeth, petit-fils de Gerson, fils de Lévi.
४३शिमी यहथ याचा पुत्र. यहथ हा गर्षोम याचा पुत्र. गर्षोम लेवीचा पुत्र.
44 Et de Mérari descendaient les chantres qui se tenaient à gauche, dont le chef était: Ethan, fils de Cisa, fils d'Abe, fils de Maloch,
४४मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र. किशी अब्दीचा पुत्र. अब्दी मल्लूखचा पुत्र.
४५मल्लूख हशब्याचा पुत्र. हशब्या अमस्याचा पुत्र. अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र.
46 Fils d'Amessias, fils de Bani, fils de Semer,
४६हिल्कीया अमसीचा पुत्र. अमसी बानीचा पुत्र. बानी शेमर पुत्र.
47 Fils de Mooli, fils de Musi, fils de Mérari, fils de Lévi.
४७शेमेर महलीचा पुत्र. महली मूशीचा पुत्र, मूशी मरारीचा पुत्र मरारी हा लेवीचा पुत्र.
48 Et les lévites leurs frères, selon leurs familles paternelles, étaient attachés aux divers services du tabernacle de Dieu.
४८आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते.
49 Aaron, et, après lui, ses fils sacrifiaient sur l'autel des holocaustes et sur l'autel des parfums; ils remplissaient toutes les fonctions relatives au Saint des saints; et ils priaient pour Israël, conformément à ce que leur avait commandé Moïse serviteur de Dieu.
४९अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत.
50 Voici les fils d'Aaron: Eléazar son fils, Phinéès son fils, Abisué son fils,
५०अहरोनाचे वंशज असे मोजले, अहरोनाचा पुत्र एलाजार. एलाजाराचा पुत्र फिनहास. फिनहासचा पुत्र अबीशूवा.
51 Bocci son fils, Ozi son fils, Saraïa son fils,
५१अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या.
52 Mariel son fils, Amarias son fils, Achitob son fils,
५२जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब.
53 Sadoc son fils, Achimais son fils.
५३अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास.
54 Voici les demeures, les bourgs et les territoires, assignés par le sort, selon leurs familles, aux fils d'Aaron, et aux fils de Caath.
५४अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली.
55 Il leur fut donné Hébron, en la terre de Juda, et sa banlieue tout alentour.
५५यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली.
56 Mais les champs de la ville et ses bourgs appartenaient à Caleb, fils de Jéphoné.
५६त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली.
57 Les villes de refuge furent aussi concédées aux fils d'Aaron, savoir: Hébron, Lobna et sa banlieue, Selna et sa banlieue, Esthamo et sa banlieue,
५७अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
58 Jethar et sa banlieue, Dabir et sa banlieue,
५८हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह.
59 Asan et sa banlieue, Bethsamys et sa banlieue.
५९आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली.
60 Et, dans la tribu de Benjamin, Gabée et sa banlieue, Galemath et sa banlieue, Anathoth et sa banlieue. En tout treize villes par familles.
६०बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
61 Et le sort assigna au reste des fils de Caath, par familles, dix villes de la demi-tribu de Manassé, en deçà du Jourdain.
६१कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
62 Et aux fils de Gerson, par familles, treize villes des tribus d'Issachar, d'Aser, de Nephthali et de la demi-tribu de Manassé en Hasan.
६२गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
63 Et aux fils de Mérari, par familles, douze villes des tribus de Ruben, de Gad et de Zabulon.
६३मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
64 Et les fils d'Israël accordèrent aux lévites ces villes et leurs banlieues.
६४ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली.
65 Le sort désigna dans les tribus de Juda, de Siméon et de Benjamin, les villes auxquelles les lévites donnèrent leurs noms,
६५यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली.
66 D'après les familles des fils de Caath. Et ils eurent aussi des villes du territoire d'Ephraïm,
६६एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
67 Y compris les villes de refuge: Sichem et sa banlieue, dans la montagne d'Ephraïm, Gazer et sa banlieue,
६७एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण,
68 Jecmaan et sa banlieue, Béthoron et sa banlieue.
६८यकमाम, बेथ-होरोन,
69 Et, en d'autres territoires, Aïlon et sa banlieue, Gethremmon et sa banlieue.
६९अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली.
70 Et de la demi-tribu de Manassé: Anar et sa banlieue, Jemblaan et sa banlieue, selon les familles du reste des fils de Caath.
७०मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली.
71 Les fils de Gerson, par familles, eurent dans l'autre demi-tribu de Manassé, Golan en Basan et sa banlieue, Aseroth et sa banlieue.
७१गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
72 Et dans la tribu d'Issachar: Cédés et sa banlieue, Deberi et sa banlieue, Dabor et sa banlieue,
७२त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली.
73 Ramoth, Aïnan et sa banlieue.
७३रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह.
74 Et dans la tribu d'Aser: Maasal et sa banlieue, Abdon et sa banlieue,
७४माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली.
75 Acac et sa banlieue, Rhoob et sa banlieue.
७५हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली.
76 Et dans la tribu de Nephthali: Cédés en Gaulée et sa banlieue, Hamoth et sa banlieue, Cariathaïm et sa banlieue.
७६गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली.
77 Et dans la tribu de Zabulon: le sort attribua au reste des fils de Mérari, Remmon et sa banlieue, Thabor et sa banlieue.
७७आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
78 Et dans la vallée du Jourdain à l'occident du fleuve: Jéricho, et dans la tribu de Ruben: Bosor dans le désert et sa banlieue, Jasa et sa banlieue,
७८यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट,
79 Cadmoth et sa banlieue, Maephla et sa banlieue.
७९कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली.
80 Dans la tribu de Gad: Ramoth-Galaad et sa banlieue, Maanaïm et sa banlieue,
८०मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट;
81 Esébon et sa banlieue, Jazer et sa banlieue.
८१हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली.