< 2 Samuel 5 >
1 Et toutes les tribus d’Israël vinrent vers David à Hébron, et parlèrent, disant: Voici, nous sommes ton os et ta chair.
१इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीदाजवळ एकत्र आले आणि त्यास म्हणाले, आपण इस्राएल लोक एकाच कुटुंबातले, एकाच हाडामांसाचेआहोत.
2 Et autrefois, quand Saül était roi sur nous, c’était toi qui faisais sortir et qui faisais entrer Israël; et l’Éternel t’a dit: Tu paîtras mon peuple Israël, et tu seras prince sur Israël.
२शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तुम्हीच युध्दात आमचे नेतृत्व करत होता. इस्राएलांना युध्दावरून तुम्हीच परत आणत होता. खुद्द परमेश्वर तुम्हास म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.”
3 Et tous les anciens d’Israël vinrent vers le roi à Hébron; et le roi David fit alliance avec eux à Hébron, devant l’Éternel; et ils oignirent David pour roi sur Israël.
३मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
4 David était âgé de 30 ans lorsqu’il devint roi; il régna 40 ans.
४दावीद राज्य करायला लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
5 Il régna à Hébron, sur Juda, sept ans et six mois; et, à Jérusalem, il régna 33 ans sur tout Israël et Juda.
५हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरूशलेमेमधून राज्य केले.
6 Et le roi alla avec ses hommes à Jérusalem contre les Jébusiens, habitants du pays; et ils parlèrent à David, disant: Tu n’entreras point ici; mais les aveugles et les boiteux te repousseront; – pour dire: David n’entrera pas ici.
६राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरूशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात प्रवेश करू शकणार नाहीस, आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हास थोपवतील. दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले.”
7 Mais David prit la forteresse de Sion: c’est la ville de David.
७तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीदपुर असे त्याचे नाव पडले.
8 Et David dit en ce jour-là: Quiconque frappera les Jébusiens et atteindra le canal, et les boiteux et les aveugles qui sont haïs de l’âme de David…! C’est pourquoi on dit: L’aveugle et le boiteux n’entreront pas dans la maison.
८दावीद त्या दिवशी आपल्या लोकांस म्हणाला, “यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा. यावरूनच, आंधळे पांगळे यांना या देवाच्या घरात येता यायचे नाही अशी म्हण पडली.”
9 Et David habita dans la forteresse, et l’appela ville de David; et David bâtit tout autour, depuis Millo vers l’intérieur.
९दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या.
10 Et David allait grandissant de plus en plus; et l’Éternel, le Dieu des armées, était avec lui.
१०सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला.
11 Et Hiram, roi de Tyr, envoya des messagers à David, et des bois de cèdre, et des charpentiers, et des tailleurs de pierres pour les murailles; et ils bâtirent une maison à David.
११सोरेचा राजा हिराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले.
12 Et David connut que l’Éternel l’avait établi roi sur Israël, et qu’il avait élevé son royaume à cause de son peuple Israël.
१२तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे, हे ही त्यास उमगले.
13 Et David prit encore des concubines et des femmes de Jérusalem, après qu’il fut venu de Hébron, et il naquit encore à David des fils et des filles.
१३हेब्रोनहून आता दावीद यरूशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि स्त्रिया होत्या. यरूशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला.
14 Et ce sont ici les noms de ceux qui lui naquirent à Jérusalem: Shammua, et Shobab, et Nathan, et Salomon,
१४त्याच्या या यरूशलेम येथे जन्मलेल्या पुत्रांची नावे अशी. शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
15 et Jibkhar, et Élishua, et Népheg, et Japhia,
१५इभार, अलीशवा, नेफेग, याफीय,
16 et Élishama, et Éliada, et Éliphéleth.
१६अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.
17 Et les Philistins apprirent qu’on avait oint David pour roi sur Israël, et tous les Philistins montèrent pour chercher David; et David l’apprit, et descendit à la forteresse.
१७दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्यास शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरूशलेम येथील किल्ल्यात आला.
18 Et les Philistins vinrent et se répandirent dans la vallée des Rephaïm.
१८पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
19 Et David interrogea l’Éternel, disant: Monterai-je contre les Philistins? Les livreras-tu en ma main? Et l’Éternel dit à David: Monte, car certainement je livrerai les Philistins en ta main.
१९दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू का? तुझे साहाय्य मला लाभेल काय?” परमेश्वर उत्तरला, “होय पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”
20 Et David vint à Baal-Peratsim; et là David les frappa, et il dit: L’Éternel a fait une brèche au milieu de mes ennemis devant moi, comme une brèche faite par les eaux; c’est pourquoi il appela le nom de ce lieu Baal-Peratsim.
२०तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घूसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजे, खिंडार पाडणारा प्रभू, असे ठेवले.
21 Et ils laissèrent là leurs idoles, et David et ses hommes les emportèrent.
२१पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ती त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या मनुष्यांनी त्या तेथून हलवल्या.
22 Et les Philistins montèrent encore de nouveau, et se répandirent dans la vallée des Rephaïm.
२२पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
23 Et David interrogea l’Éternel. Et il dit: Tu ne monteras pas; tourne-les par-derrière, et tu viendras contre eux vis-à-vis des mûriers;
२३दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर.
24 et aussitôt que tu entendras sur le sommet des mûriers un bruit de gens qui marchent, alors tu t’élanceras, car alors l’Éternel sera sorti devant toi pour frapper l’armée des Philistins.
२४तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हास झाडाच्या शेंड्यावरून ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वरच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”
25 Et David fit ainsi, comme l’Éternel lui avait commandé; et il frappa les Philistins depuis Guéba jusqu’à ce que tu viennes vers Guézer.
२५दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गिबापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.