< Psaumes 121 >
1 Cantique pour les montées. Je lève les yeux vers les montagnes: d’où me viendra le secours?
१मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल?
2 Mon secours viendra de Yahweh, qui a fait le ciel et la terre.
२परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.
3 Il ne permettra pas que ton pied trébuche; celui qui te garde ne sommeillera pas.
३तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
4 Non, il ne sommeille ni ne dort, celui qui garde Israël.
४पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
5 Yahweh est ton gardien; Yahweh est ton abri, toujours à ta droite.
५परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
6 Pendant le jour le soleil ne te frappera point, ni la lune pendant la nuit.
६दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.
7 Yahweh te gardera de tout mal, il gardera ton âme:
७परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
8 Yahweh gardera ton départ et ton arrivée maintenant et à jamais.
८परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.