< Jérémie 41 >
1 Au septième mois, Ismaël, fils de Nathanias, fils d’Elisama, de la race royale, vint, accompagné de grands officiers du roi et de dix hommes, vers Godolias, fils d’Ahicam, à Maspha; et ils mangèrent ensemble à Maspha,
१पण सातव्या महिन्यात असे झाले की, अलीशामाचा मुलगा नथन्या, याचा मुलगा इश्माएल, जो राजघराण्यातला होता आणि राजाचे काही अधिकारी, त्याच्याबरोबर त्याच्या दहा मनुष्यांना घेऊन मिस्पात अहीकामाचा मुलगा गदल्याकडे आले. त्यांनी मिस्पा येथे एकत्रित बसून भोजन केले.
2 Et Ismaël, fils de Nathanias, se leva, lui et les dix hommes qui étaient avec lui, et ils frappèrent avec l’épée Godolias, fils d’Ahicam, fils de Saphan, et ils le firent mourir — lui que le roi de Babylone avait établi gouverneur du pays,
२पण नथन्याचा मुलगा इश्माएल व त्याच्याबरोबरची दहा माणसे होते त्यांनी उठून शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या, ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले.
3 — ainsi que tous les judéens qui étaient avec lui, — avec Godolias, — à Maspha; Ismaël tua aussi les Chaldéens qui se trouvaient là, les gens de guerre.
३नंतर जे सर्व यहूदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खास्दी लढणारे ते तेथे त्यांना सापडले त्यांना इश्माएलाने ठार मारले.
4 Le second jour après le meurtre de Godolias, avant que personne le sût,
४गदल्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, परंतु कोणालाही माहीत नसता असे झाले की,
5 des hommes vinrent de Sichem, de Silo et de Samarie, au nombre de quatre-vingts, la barbe rasée, les vêtements déchirés et le corps couvert d’incisions; ils portaient des offrandes et de l’encens, pour les présenter à la maison de Yahweh.
५शखेमातून काही माणसे, शिलोतून व शोमरोनातून ऐंशी माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या, त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले, परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती.
6 Ismaël, fils de Nathanias, sortit de Maspha à leur rencontre, tout en pleurant; et, quand il les eut atteints, il leur dit: « Venez vers Godolias, fils d’Ahicam. »
६तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले, चालत व रडत गेले. नंतर असे झाले की, जसा त्यांच्याशी सामना होताच, तो त्यांना म्हणाला, “अहीकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या.”
7 Mais dès qu’ils furent entrés au milieu de la ville, Ismaël, fils de Nathanias, les égorgea et les jeta au milieu de la citerne, lui et les hommes qui étaient avec lui.
७मग असे झाले की, जेव्हा ते नगराच्या मध्ये आले असता नथन्याचा मुलगा इश्माएल याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी त्यांची कत्तल करून आणि त्यांना खड्ड्यात फेकून दिले.
8 Mais il se trouva parmi eux dix hommes qui dirent à Ismaël: « Ne nous fais pas mourir, car nous avons dans les champs des provisions cachées de froment, d’orge, d’huile et de miel. » Alors il s’arrêta et ne les fit pas mourir au milieu de leurs frères.
८पण त्यांच्यातील दहा माणसे इश्माएलाला म्हणाली, “आम्हास मारु नको, कारण आमच्याजवळ गहू व सातू, तेल व मध यांचे साठे आम्ही शेतात लपवून ठेवले आहेत.” म्हणून त्याने त्यांना इतर सहकाऱ्यासारखे मारले नाही.
9 La citerne dans laquelle Ismaël jeta les cadavres des hommes qu’il avait frappés à cause de Godolias, est celle que le roi Asa avait faite en vue de Baasa, roi d’Israël; c’est elle qu’Ismaël, fils de Nathanias, remplit de cadavres.
९जी माणसे जिवे मारली त्या सर्वांची प्रेते इश्माएलाने गदल्याबरोबर त्या खड्ड्यात फेकून दिली होती हा मोठा खड्डा आसा राजाने खणला होता जेव्हा इस्राएलाचा राजा बाशा याने त्याच्यावर हल्ला केला होता. नथन्याचा मुलगा इश्माएल याने ज्यांना मारले होते त्यांनी तो भरला.
10 Et Ismaël emmena prisonnier le reste du peuple qui était à Maspha, les filles du roi et tout le peuple qui était resté à Maspha, auxquels Nabuzardan, chef des gardes, avait donné pour chef Godolias, fils d’Ahicam; Ismaël, fils de Nathanias, les emmena prisonniers, et partit pour passer chez les fils d’Ammon.
१०पुढे जे मिस्पात होते त्या इतर सर्व लोकांस इश्माएलाने पकडले, राजाच्या मुली व जे सर्व लोक मागे मिस्पात राहिले होते ज्यांना अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला त्यावर नेमले होते. म्हणून नथन्याचा मुलगा इश्माएल याने त्यांना पकडून आणि अम्मोनी लोकांकडे पार जाण्यास निघाला.
11 Johanan, fils de Carée, et tous les chefs de troupes qui étaient avec lui, ayant appris tout le mal qu’Ismaël, fils de Nathanias, avait fait,
११पण कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी नथन्याचा मुलगा इश्माएल यानी त्यांच्याबरोबर केलेली सर्व दुष्कृत्ये ऐकली.
12 prirent tous leurs hommes et se mirent en marche pour combattre Ismaël, fils de Nathanias; ils l’atteignirent près du grand étang de Gabaon.
१२म्हणून त्यांनी त्यांची सर्व माणसे घेतली व नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी लढायला गेले. गिबोनाचे जे मोठे तलाव आहे तेथे त्यांना तो सापडला.
13 Et quand tout le peuple qui était avec Ismaël, vit Johanan, fils de Carée, et tous les chefs des troupes qui étaient avec lui, il s’en réjouit.
१३मग असे झाले की, जे सर्व लोक इश्माएलाबरोबर होते त्यांनी जेव्हा कारेहाचा मुलगा योहानान याला व जे सर्व सैन्याधिकारी त्याच्याबरोबर होते त्यांना पाहिले, ते खूप आनंदीत झाले.
14 Et tout le peuple qu’Ismaël emmenait prisonnier de Maspha se retourna et vint se joindre à Johanan, fils de Carée.
१४नंतर मिस्पाहून इश्माएलाने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कारेहाचा मुलगा योहानानाकडे गेले.
15 Mais Ismaël, fils de Nathanias, s’échappa avec huit hommes devant Johanan, et alla chez les fils d’Ammon.
१५पण नथन्याचा मुलगा इश्माएल आठ मनुष्यासहीत योहानानापासून पळून गेला. ते अम्मोनी लोकांकडे गेला.
16 Et Johanan, fils de Carée, et tous les chefs des troupes qui étaient avec lui, prirent tout le reste du peuple qu’Ismaël, fils de Nathanias, avait emmené de Maspha, après avoir tué Godolias, fils d’Ahicam, hommes de guerre, femmes, enfants et eunuques, et ils les ramenèrent de Gabaon.
१६नथन्याचा मुलगा इश्माएल याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला जिवे मारल्यावर लोकांतले जे सर्व राहिलेले मिस्पा येथून नेले होते, जे कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी सर्वांना सोडविले. गिबोनाहून योहानाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बलवान माणसे, लढणारे माणसे, स्त्रिया व मुले आणि षंढ यांना सोडवले.
17 Ils allèrent et s’arrêtèrent au caravansérail de Chamaam, près de Bethléem, pour se retirer ensuite en Égypte,
१७मग ते गेले आणि बेथलेहेमाजवळ गेरूथ किम्हाम येथे थोड्या वेळेसाठी राहिले. ते मिसरात जाण्यासाठी जात होते
18 loin des Chaldéens qu’ils craignaient, parce qu’Ismaël, fils de Nathanias, avait tué Godolias, fils d’Ahicam, que le roi de Babylone avait établi gouverneur du pays.
१८खास्द्यांच्या भीतीमुळे त्यांनी असे केले. कारण अहीकामाचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास नथन्याचा मुलगा इश्माएल याने जिवे मारले होते.